लोकसभा निवडणुकीवरुन महायुतीत घमासान, दिवसा स्वप्न पाहू नये… रवी राणा यांचा बच्चू कडू यांना टोला

बच्चू कडू यांचे विश्वासू म्हणून रवींद्र वैद्य यांना प्रहारची लोकसभेची उमेदवारी देणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. बच्चू कडू यांनी याबद्दल काल वक्तव्य केले होते. त्यावर आमदार रवी राणा यांनी जोरदार उत्तर दिलंय. त्यामुळे महायुतीचा वादा पुन्हा पेटणार आहे.

लोकसभा निवडणुकीवरुन महायुतीत घमासान, दिवसा स्वप्न पाहू नये... रवी राणा यांचा बच्चू कडू यांना टोला
Follow us
| Updated on: May 28, 2023 | 2:20 PM

स्वप्नील उमप, अमरावती : निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. भाजप-शिवसेना युतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी 22 जागांची मागणी केली असतानाच आता मित्र पक्षांनी देखील जागेची मागणी केली आहे. प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत 15 ते 16 जागांची मागणी केली आहे. तसेच अमरावती लोकसभा मतदार संघात प्रहारला उमेदवारी मिळावी यासाठी दावा ठोकणार असल्याच बच्चू कडू यांनी म्हटले आहे. दरम्यान बच्चू कडू यांनी दावा ठोकल्यानंतर आता आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाकडून रवींद्र वैद्य हे खासदार नवनीत राणा विरोधात रिंगणात उतरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

दोन्ही जण महायुतीत

बच्चू कडू यांचे अतिशय निकटवर्ती व विश्वासू म्हणून रवींद्र वैद्य यांची ओळख आहे. त्यामुळे बच्चू कडू हे रवींद्र वैद्य यांना खासदार नवनीत राणा विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी सुरू झालेली आहे. सध्या बच्चू कडू आणि आमदार रवी राणा हे महायुतीत आहे. दोघांनीही शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे, असे असताना आमदार बच्चू कडू यांनी अमरावती लोकसभेवर दावा ठोकल्याने बच्चू कडू विरुद्ध आमदार रवी राणा असा संघर्ष पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. मागील अनेक वर्षापासून अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी तयारी सुरू केली असल्याची प्रतिक्रिया ही रवींद्र वैद्य यांनी दिलेली आहे.

हे सुद्धा वाचा

कोण आहेत रवींद्र वैद्य?

रवींद्र वैद्य हे सामाजिक कार्यकर्ते असून वऱ्हाड नावाची सामाजिक संस्था ते चालवत आहे. याच वऱ्हाड संस्थेचे ते संस्थापक अध्यक्ष देखील आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते कारागृहातील कैद्यांच्या कुटुंबासाठी काम करत आहे .कोरोना काळात त्यांनी हजारो मजुरांच्या जेवणाची सोय केली होती. तसेच बच्चू कडू यांचे अतिशय निकटवर्ती व विश्वासू म्हणून त्यांची राजकीय व सामाजिक क्षेत्रात ओळख आहे.

मतदारसंघ राखीव

अमरावती लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव आहे. त्यामुळे या मतदारसंघातून खासदार नवनीत राणा या निवडून गेल्या आहे. यापूर्वी दोन वेळा शिवसेनेचे आनंदराव अडसूळ या ठिकाणाहून निवडून गेले. तसेच खासदार नवनीत राणा यांच जात प्रमाणपत्र खोटे आहे. आम्ही खरे शेड्युल कास्ट आहोत असं रवींद्र वैद्य म्हणाले.

…संधीच सोनं करेल.

गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात आम्ही काम करत आहोत. कोरोना काळात देखील आम्ही काम केलं त्यामुळे आमदार बच्चू कडू यांनी लोकसभा निवडणुकीची संधी दिल्यास त्याचं सोनं करेल, असा विश्वास रवींद्र वैद्य यांनी व्यक्त केला आहे.

वाद पेटण्याची पुन्हा शक्यता

आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यात मागील काही महिन्यांपूर्वी वाद झाला होता. बच्चू कडू हे खोके घेऊन गुहाटीला गेल्याचा गंभीर आरोप आमदार रवी राणा यांनी केला होता. त्यानंतर हे प्रकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गेल होत.त्यावेळेस एकमेकांवर मोठ्या प्रमाणात दोन्ही आमदारांनी टीका केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या मध्यस्थी हे हे प्रकरण मिटलं होतं दरम्यान आता पुन्हा एकदा आमदार रवी राणांना बच्चू कडूंनी आव्हान दिले आहे. त्यामुळे पुन्हा महायुतीतील दोन आमदार एकमेकां विरोधात उभे ठाकणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

कुणी कितीही दावा ठोको दावा खोडून काढणार.

दरम्यान बच्चू कडू यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघावर दावा टाकल्यानंतर आमदार रवी राणा यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. कोणी कितीही दावा ठोको तो दावा खोडून काढण्याची ताकद आमदार रवी राणांमध्ये आहे. तसेच दिवसा स्वप्न पाहू नये रात्री स्वप्न पहावे… असा टोलाही आमदार रवी राणा यांनी बच्चू कडू यांनी लगावला आहे. तसेच खासदार नवनीत राणांच्या प्रचारात आनंदराव अडसुळ आणि बच्चू कडू दिसतील असेही आमदार रवी राणा म्हणाले.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.