‘हजारो शेतकऱ्यांना घेऊन अरबी समुद्रात जलसमाधी घेणार’, महाराष्ट्रातील बड्या नेत्याचा शिंदे-फडणवीसांना मोठा इशारा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी शिंदे-फडणवीस सरकारला मोठा इशारा दिलाय.

'हजारो शेतकऱ्यांना घेऊन अरबी समुद्रात जलसमाधी घेणार', महाराष्ट्रातील बड्या नेत्याचा शिंदे-फडणवीसांना मोठा इशारा
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 16, 2022 | 4:51 PM

मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी राज्य सरकारला मोठा इशारा दिलाय. “सोयाबीन-कापूस प्रश्नांचं निरसन झालं नाही तर हजारो शेतकऱ्यांना घेऊन अरबी समुद्रात जलसमाधी घेणार”, असा इशारा देत रविकांत तुपकर यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. त्यांच्या या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कृषीमंत्री अब्दुल सत्तार नेमकी काय भूमिका घेतात ते देखील पाहणं महत्त्वाचं आहे. मुख्यमंत्री आणि कृषीमंत्री स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या इशाऱ्याची दखल घेतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. विशेष म्हणजे हजारो शेतकरी खरंच अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर आंदोलनासाठी आले तर पोलिसांवरील ताणही वाढू शकतो. त्यामुळे राज्य सरकार काय भूमिका घेतं याकडे अनेकांचं लक्ष आहे.

“सोयाबी-कापूस उत्पादक शेतकऱ्यांचं जगणं सरकार मान्य करणार आहे की नाही? हा खरा आमचा सरकारला प्रश्न आहे. सोयाबीनला आणि कापसाला जो दर खासगी बाजारात मिळतो त्यापेक्षा उत्पादन खर्च आम्ही जास्त लावलाय, अशी आमची परिस्थिती आहे”, असं रविकांत तुपकर म्हणाले.

“सरकार जाणीवपूर्वक आमच्याकडे दुर्लक्ष करतंय, अशी आमची भावना झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये 50 टक्के सोयाबीन उत्पादक शेतकरी आहेत. 18 टक्के कापूस उत्पादक शेतकरी आहेत. सरकार 68 टक्के शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळण्याचं काम करतंय”, असा आरोप तुपकर यांनी केला.

“आमची मागणी नेमकी काय आहे? आम्ही भीक मागतोय का? आम्ही इतकंच मागतोय की आम्हाला सोयाबीनला प्रतिक्विंटल किमान साडेआठ हजार भाव मिळावा. कापसाला प्रतिक्विंटल साडेबारा हजार रुपये भाव खासगी बाजारात मिळावा, अशी आमची मागणी आहे”, असं रविकांत तुपकर म्हणाले.

“पीकविमा कंपन्यांनी तातडीने आम्हाला नुकसान भरपाई दिली पाहिजे. सरकारने ओला दुष्काळ जाहीर करुन हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत दिली पाहिजे. रब्बी हंगामात आमचे ट्रान्सफॉर्मर जळतात ते महिना-महिना मिळत नाहीत. ते लगेच मिळाले पाहिजेत. आम्हाला रात्रीची वीज नको तर दिवसाची वीज द्या ही आमची मागणी आहे”, अशी भूमिका रविकांत तुपकर यांनी मांडली.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.