…अन् तुपकरांच्या आईने फोडला हंबरडा; माझ्या मुलाचे काही बरे-वाईट झाल्यास सरकार जबाबदार
सोयाबीनला 8 हजार तर कापसाला 12 हजार रुपये भाव मिळावा या मागणीसाठी गेल्या तीन दिवसांपासून तुपकर यांचे आंदोलन सूरू आहे. दरम्यान या आंदोलनाला तुपकर यांच्या आईने भेट दिली. यावेळी आपल्या मुलाची अवस्था पाहून त्यांनी हंबरडा फोडला.
बुलडाणा – सोयाबी आणि कापसाला योग्य भाव मिळावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरू आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी गेल्या दोन दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. सोयाबीनला 8 हजार तर कापसाला 12 हजार रुपये भाव मिळावा अशी मागणी तुपकर यांनी केली आहे. जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. दरम्यान माझ्या मुलाला काही झाल्यास त्याला सरकार जबाबदार असेल असा इशारा तुपकर यांच्या आईने दिला आहे.
गीताबाईंना आश्रू अनावर
रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. त्यांनी गेल्या तीन दिवसांमध्ये अन्नाचा एक कणही घेतलेला नाही. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे. मात्र अदयापही राज्य सरकारकडून त्यांच्या या आंदोलनाची दखल घेण्यात आली नाही. जीव केला तरी चालेल पण शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका तुपकर यांनी घेतली आहे. आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी तुपकर यांच्या आईने आंदोलनस्थळी येऊन, आपल्या मुलाची भेट घेतली. तुपकर यांची अवस्था पाहून आईला आश्रू अनावर झाले, त्यांनी अक्षरशः हंबरडा फोडला. माझ्या मुलाच्या आंदोलनाची तातडीने सरकारने दखल घ्यावी, अन्यथा माझ्या मुलाचे काही बरे वाईट झाल्यास त्याची जबाबदारी ही सरकारची असेल असा इशारा तुपकर यांच्या आई गीताबाई तुपकर यांनी दिला आहे.
आंदोलनाला हिंसक वळण
दरम्यान शुक्रवारी रात्री या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे पहायला मिळाले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी आंदोलस्थळी लावण्यात आलेल्या बंदोबस्तामध्ये वाढ केली आहे. पोलीस आणि कार्यकर्ते आमने-सामने आल्याने काही काळ आंदोलनस्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
काय आहेत मागण्या ?
कापसाला 12 हजार रुपये आणि सोयाबीनला 8 हजार रुपये भाव मिळावा, अशी संघटनेची प्रमुख मागणी आहे. सरकारने सोयापेंड आयात केल्यामुळं सोयाबीनचे भाव कमी झाले आहेत. पाऊस आणि अतिवृष्टीनं उत्पादनही प्रभावित झाले आहे. त्यामुळे सोयाबीन आणि कापसाचे भाव वाढून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई न देणाऱ्या पीकविमा कंपन्यांवर कारवाई करावी, वीजबिल थकलेल्या शेतकऱ्याचे वीज कनेक्शन कापू नये, अशा विविध मागण्यांसाठी तुपकर यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे.
Video | Buldana | स्वाभिमानीचे सोयाबीन, कापूस आंदोलन चिघळले, कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची@Ravikanttupkar1 #Buldana #RavikantTupkar #StateGovt #Maharashtra #Farmers pic.twitter.com/cSiOvDN7hu
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 19, 2021
संबंधित बातम्या
Special Report| ऐतिहासिक शेतकरी आंदोलनाचा धगधगता अंगारमळा; संघर्ष, क्रौर्य आणि सत्तेची पोळी!