कसब्याचा निकाल उमेदवारानेच सांगून टाकला, कितीच्या फरकाने कोण निवडून येईल, काय म्हणाले रवींद्र धंगेकर
कसबा पोटनिवडणुकीत माझा विजय निश्चित असून किती मतांच्या फरकाने निवडून येणार असल्याचा दावा कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी केला असून थोड्याच वेळात निकाल स्पष्ट होणार आहे.
प्रदीप कापसे, टीव्ही 9 मराठी, पुणे : कसबा पोटनिवडणुकीच्या ( Kabsabyelection ) मतमोजणीला सुरुवात झालेली असतांना कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर ( Ravindra Dhnagekar ) यांनी माझा विजय निश्चित असल्याचा दावा केला आहे. खरंतर भाजपच्या उमेदवार हेमंत रासने यांनीही यापूर्वीही विजय माझाच होणार असा दावा केला आहे. मात्र रवींद्र धंगेकर यांनी 15 हजार मतांच्या फरकाने माझा विजय निश्चित होणार असल्याचे सांगून टाकलं आहे. खरंतर ज्या वेळी उमेदवारी अर्ज दाखल केला तेव्हाच माझा विजय निश्चित झाला होता. परंतु निवडणूक प्रक्रिया असल्याने सोपस्कार पार पाडावे लागले असेही रवींद्र धंगेकर यांनी म्हंटलं आहे. निकाल जाहीर होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिलेले असतांना रवींद्र धंगेकर यांनी हा दावा केला आहे.
दरम्यान काही खाजगी संस्थांनी निवडणुकीचे अंदाज व्यक्त केले होते. त्यामध्ये चार पैकी तीन संस्थांनी रवींद्र धंगेकर यांचा विजय निश्चित असल्याचे म्हंटले आहे. त्यामध्ये दोन संस्थांनी दहा हजार मतांच्या फरकाने विजय दाखविला आहे. तर एका संस्थेने पंधरा हजार मतांच्या फरकाने विजय दाखविला आहे.
कदाचित याच संस्थेच्या निवडणुकीच्या अंदाजावरुण रवींद्र धंगेकर यांनी आपला विजय निश्चित असल्याचा दावा केला आहे. याच दरम्यान रवींद्र धंगेकर यांनी महाविकास आघाडीने मला उमेदवारी दिली त्याच वेळी माझा विजय निश्चित झाला होता असंही म्हंटलं आहे.
अत्यंत चुरशीची आणि प्रतिष्ठेची मानली जाणाऱ्या या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. भाजप विरुध्द महाविकास आघाडी अशी सरळ लढत पाहायला मिळत आहे. याच निवडणूक काळात दिग्गज नेत्यांनी प्रचार करत कसबा पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केल्याचे पाहायला मिळत आहे.
कसबा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाल्यानंतर ही पोटनिवडणूक जाहीर झाली होती. यावेळी भाजपकडून उमेदवारी मिळावी यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात आले होते. त्यावेळी हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती.
भाजपचा बालेकिल्ला म्हणून कसबा मतदार संघ पहिला जातो. त्यामुळे कॉंग्रेसकडून कोणत्या दिग्गज नेत्याला उमेदवारी दिली जाईल याकडे लक्ष असतांना रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे अत्यंत चुरशीची अशी ही निवडणूक बघायला मिळाली आहे.
आज मतमोजणी होत असून थोड्याच वेळात निकाल स्पष्ट होणार असले तरी रवींद्र धंगेकर यांनी आपला विजय निश्चित असून 15 हजार मतांच्या फरकाने मी विजयी होणार असल्याचा दावा केला आहे.