Ravi Rana : ‘मुंबई महापालिकेनं आम्हाला फसवलं, आधी घराला परवानगी, आता सूडाचं राजकारण’, रवी राणांचा गंभीर आरोप, मुख्यमंत्र्यांवरही निशाणा
आ. रवी राणा यांनी, आम्ही आमचे घर बिल्डर कडून विकत घेतल्याचे सांगितले. तसेच आमच्या घराप्रमाणे तिथं अनेक घरे आहेत. मात्र त्यांना नोटीस नाही. फक्त आमच्यावर हनुमाण चालिसा पठणावरून ही कारवाई केली जात आहे.
नवी दिल्ली : राज्यात गेल्या काही दिवसांपासून हनुमाण चालिसा पठणावरून जारदार रणकंदण सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या घरासमोर चालिसा पठण करण्याच्या कारणामुळे खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्याचदरम्यान त्यांच्यावर मुंबई महापालिकेने अनधिकृत बांधकामावरून नोटीस काढली होती. त्यावरून आता राणा दाम्पत्य विरूद्ध शिवसेना नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर (Shiv Sena leader and former mayor Kishori Pednekar)यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. पेडणेकर यांनी राणा दाम्पत्यांचे ते घरातील बांधकाम हे अनधिकृत असल्याचे म्हटले होते. त्यावर आता पलटवार आ. रवी राणा (MLA Ravi Rana)यांनी करताना, आम्हाला मुंबई मनपाने फसवल्याचे म्हटले आहे. ते नवी दिल्लीत बोलत होते.
राणा दाम्पत्यात आणि शिवसेनेत वाद
हनुमाण चालिसा पठणावरून राज्यात राजकारण तापल्यानंतर खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी त्यात उडी घेतली होती. तसेच आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर चालिसा पठण करणारच असे म्हटले होते. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्याचदरम्यान त्यांच्या घरावरून बीएमसी ने त्यांना नोटीस काढली होती. तसेच घरात अनधिकृत बांधकाम केल्याचे म्हटले होते. त्यावरून राणा दाम्पत्यात आणि शिवसेनेत वाद होताना दिसत आहे. तर राणा दाम्पत्याने केलेल्या टीकेला शिवसेना नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर उत्तर देत आहेत.
बिल्डरांना पाठीशी घालणारी महापालिका
तसेच राणा दाम्पत्याच्या घरातील अनधिकृत बांधकाम झाल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यावर जोरदार प्रतित्यूत्तर देताना आ. रवी राणा यांनी, आम्ही आमचे घर बिल्डर कडून विकत घेतल्याचे सांगितले. घर घेतोना आम्ही सर्व कायदेशीर प्रोसेस केली आहे. तसेच आमच्या घराप्रमाणे तिथं 20-52 बिल्डिंग आहेत. ज्या त्याच बिल्डर ने बांधल्या आहेत. त्या सर्वांच मोजमाप करणार का? असा सवाल त्यांनी केला आहे. तर त्या बिल्डरला तुम्ही परवानगी कशी दिली? महापालिकेने 90 टक्के बिल्डरांकडून लाच घेऊन अनधिकृत बिल्ड़िंगना मान्यता दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्याचबोरबर बीएमसी ही बिल्डरांना पाठीशी घालणारी महापालिका असल्याचा घणाघात ही त्यांनी केला आहे.
आता कसली मोजमाप करताय?
तसेच आ. राणा यांनी म्हटलं आहे की, मुंबई मनपाने आमच्या घराला परवानगी दिलेली असे म्हणत आहे. मात्र त्या बिल्डरला परवानगी कशी मिळाली. तर ते बांधकाम आम्ही नाही तर केल त्या बिल्डरने केलं आहे. त्याला परवानगी महापालिकेने दिली आहे. मग आता कसली मोजमाप करताय? तसेच मुंबई मनपाने आपल्याला फसवल्याचा आरोप देखील यावेळी आमदार रवी राणा यांनी केला. तर किशोरीताईंनी मुख्यमंत्र्यांना सांगावं, द्वेषाच राजकारण करू नका. तसा सल्ला द्यावा त्यांनी द्यावा असेही आमदार रवी राणा यांनी किशोरी पेडणेकर यांना म्हटलं आहे. तर किशोरीताईंनी आम्हाला सांगावं की मुंबईतल्या सगळ्या इमारती या कायदेशीर आहेत का? असा सवाल ही त्यांनी केला आहे.