महाराष्ट्रात आज विक्रमी लसीकरण, एकाच दिवसात 5.52 लाख नागरिकांना लस

महाराष्ट्रात आज एकाच दिवशी तब्बल 5 लाख 52 हजार 909 जणांचे लसीकरण करून आतापर्यंतचा उच्चांक नोंदवण्यात आला आहे.

महाराष्ट्रात आज विक्रमी लसीकरण, एकाच दिवसात 5.52 लाख नागरिकांना लस
लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना निर्बंधांतून सूट
Follow us
| Updated on: Jun 22, 2021 | 11:57 PM

मुंबई : राज्यात आजपासून 18 वर्षांवरील नागरिकांच्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणास (Corona Vaccination) सुरुवात झाली आहे. राज्यात आज एकाच दिवशी तब्बल 5 लाख 52 हजार 909 जणांचे लसीकरण करून आतापर्यंतचा उच्चांक नोंदवण्यात आला आहे. आरोग्य यंत्रणेच्या या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी समाधान व्यक्त करत त्यांचे अभिनंदन केले आहे. (Recordbreak vaccination in Maharashtra, vaccinating 5.52 lakh citizens in a single day)

महाराष्ट्र कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात देशात अग्रेसर असून हे सातत्य टिकवत आतापर्यंत सुमारे 2 कोटी 85 लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे. आज दिवसभरात 5 लाख 52 हजार नागरिकांचे लसीकरण झाले. रात्री 8 वाजेपर्यंतची ही आकडेवारी असून त्यात अजून वाढ होऊ शकते, असे आरोग्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले. यापूर्वी 26 एप्रिल रोजी एकाच दिवशी 5 लाख 34 हजार नागरिकांना लस देण्यात आली होती, असेही डॉ. व्यास यांनी सांगितले.

देशात दिवसभरात 80 लाखांहून अधिक नागरिकांचं लसीकरण

द्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आज देशात 80 लाखांपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं. आजपासून देशातील 18 वर्षांवरील व्यक्तींना मोफत लस दिली जाणार आहे. 16 जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून आजच्या दिवशी सर्वाधिक व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार रात्री 8 वाजेपर्यंत 80,96,417 लोकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे.

आतापर्यंत 28 कोटी नागरिकांचं लसीकरण

आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार आतापर्यंत 28 कोटी 33 लाख13 हजार 942 लोकांना लस देण्यात आली आहे. त्यापैकी 23 कोटी 27 लाख 44 हजार 813 लोकांना पहिला डोस देण्यात आला आहे. तर, 5 कोटी 5 लाख 69 हजार हजार 129 लोकांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत.

विक्रमी लसीकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘केंद्र सरकार आजपासून प्रत्येक भारतीयांसाठी’ मोफत लसीकरण मोहीम ‘सुरू करीत आहे. भारताच्या लसीकरण मोहिमेच्या या टप्प्यातील सर्वाधिक लाभार्थी देशातील गरीब, मध्यमवर्गीय आणि तरुण असतील. आपण सर्वांनी स्वतःला लस घेण्याचा संकल्प केला पाहिजे. आपण देशातील नागरिक एकत्र येऊन कोरोनाचा पराभव करु, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

संबंधित बातम्या

Maharashtra Corona Vaccination : महाराष्ट्रात आता 18 वर्षांवरील सर्वांना कोरोना लस, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची मोठी घोषणा

Maharashtra Coronavirus LIVE Update : नागपूर जिल्ह्यातील व्यायामशाळा सुरू करण्यास परवानगी

(Recordbreak vaccination in Maharashtra, vaccinating 5.52 lakh citizens in a single day)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.