Cyclone Tauktae | मालवणचा समुद्र खवळला, सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस, सिंधुदुर्गात रेड अलर्ट, मुंबईपासून संकट 450 किमीवर

अरबी समुद्रात घोंघावणारं ‘तौत्के’ चक्रीवादळाने आता रौद्र रुप धारण करण्यास सुरुवात केली आहे (Red Alert in Sidhudurga due to Cyclone Tauktae)

Cyclone Tauktae | मालवणचा समुद्र खवळला, सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस, सिंधुदुर्गात रेड अलर्ट, मुंबईपासून संकट 450 किमीवर
Follow us
| Updated on: May 16, 2021 | 2:57 PM

सिंधुदुर्ग : अरबी समुद्रात घोंघावणारं ‘तौत्के’ चक्रीवादळाने आता रौद्र रुप धारण करण्यास सुरुवात केली आहे. या वादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रचंड मुसळधार पाऊस सुरु आहे. चक्रीवादळाचा वेग वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. किनारपट्टी भागात ताशी 150 ते 180 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्गात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आलं आहे (Red Alert in Sidhudurga due to Cyclone Tauktae).

हवामान विभागाकडून काळजी घेण्याचं आवाहन

हवामान विभागाचे अधिकारी के एस होसाळीकर यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परिस्थिती विषयी माहिती दिली आहे. सिंधुर्गात आज दिवसभर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. वादळी वाऱ्यांमुळे सिंधुदुर्गात काही झाडे, विजेचे पोल उन्मळून पडल्याच्याही घटना समोर आल्या आहेत. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर होसाळीकर यांनी सर्वांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे Red Alert in (Sidhudurga due to Cyclone Tauktae).

किनारपट्टीवरील 68 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं

तौक्ते चक्रीवादळ सध्या सिंधुदुर्गाच्या मालवण किनारपट्टीजवळ आहे. मालवणचा समुद्र सकाळपासून खवळलेला आहे. मालवणच्या किनारपट्टीवर सकाळी अकरा वाजेपासून दोन ते तीन मीटरच्या उंचीपर्यंत लाटा उसळत होत्या. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन देखील सतर्क झालं आहे. जिल्हा प्रशासनाने किनारपट्टीरील 68 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे.

मुंबईतही जोरदार वारे वाहण्याचा इशारा

तौक्ते चक्रीवादळ मुंबईपासून जवळपास 450 किमी लांब आहे. या चक्रीवादळामुळे मुंबईतही दुपारनंतर जोरदार वारे वाहणार आहेत. तसेच या चक्रीवादळामुळे मुंबईत किनारपट्टी भागातही सकाळी आणि काल रात्रीही पाऊस पडला होता. हे वादळ सध्यातरी मुंबईच्या किनारपट्टीवर धडकणार नसल्याचा अंदाज आहे. मात्र, या चक्रीवादळामुळे मुंबईसह ठाण्यातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

संबंधित व्हिडीओ :

संबंधित बातमी : Tauktae Cyclone | जम्बो कोव्हिड सेंटरमधील रुग्णांचे स्थलांतर ते रुग्णालयात बॅकअप यंत्रणा, राज्य शासनाची नेमकी तयारी काय?

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.