खंत आहे पण नाराज नाही, मोदींना पंतप्रधान करण्यासाठी काम करणार – भावना गवळी

देशाचे पंतप्रधान मोदी यांचा नारा आहे ४०० पार त्याला साथ देण्यासाठी माझं कर्तव्य आहे ते काम मी करणार आहे. आजपासूनच आम्ही प्रचाराला सुरुवात करणार आहोत. जयश्री ताई .यांनी विजयी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं भावना गवळी यांनी म्हटले आहे.

खंत आहे पण नाराज नाही, मोदींना पंतप्रधान करण्यासाठी काम करणार - भावना गवळी
Follow us
| Updated on: Apr 13, 2024 | 4:56 PM

Bhavana Gawali : शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली आहे. यावेळी यवतमाळ व वाशिमचे जिल्हाप्रमुख उपस्थितीत होते. गेल्या पंचवीस वर्षांपासून मी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहे. माझ्या कार्यकाळात अनेक कामे मी केली. अकोला ते पूर्ण रेल मार्ग मी पुढाकार घेऊन ब्रोज गेज तयार केलं. वर्धा नांदेड रेल्वे मार्ग मी पुढाकार घेऊन काम मी केलं. मी नाराज नसल्याचं त्यांनी म्हटले आहे. पण मला या गोष्टीची खंत आहे. मी कुठे कमी पडली हे मला पाहावं लागेल असं देखील त्या म्हणाल्या आहेत.

नाराज नाही पण खंत आहे – गवळी

‘माझ्यासाठी पक्ष महत्त्वाचा आहे. पक्षाचे नेते महत्त्वाचे आहेत. माझ्यासाठी शिंदे साहेब महत्त्वाचे आहे. आदरनीय मोदी साहेब महत्त्वाचे आहेत. फडणवीस साहेबांनी मतदारसंघाच्या विकासासाठी पाठबळ दिलं. मुख्यमंत्री शिंदे साहेबांसोबत अनेक मुद्द्यावर पक्षाच्या दृष्टीकोनातून चर्चा झाली आहे. उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारी मला दिली आहे. त्यांच्यासाठी मी प्रचार करेल यात काही दुमत नाही. असं भावना गवळी म्हणाल्या.’

‘मी प्रचाराला जात नसल्याने नाराज असल्याच्या चर्चा आहे. मी नाराज होणारी नाही. मला खंत आहे. मी इतकी वर्ष कामे केली. तरीही तिकीट दिलं नाही. इतर खासदारांना उमेदवारी मिळाली. मला खंत वाटली. त्यामुळे मी बाहेर पडली नाही. मुख्यमंत्री माझ्या पक्षाचे सर्वेसर्वा आहेत. माझ्या वडिलांनी ८५ पासून शिवसेनेचं काम केलं. आमच्या घराणे पक्षासाठी योगदान दिलं आहे. मुख्यमंत्र्यांचे हात मजबूत करण्यासाठी मी मैदानात उतरणार आहे. जयश्री ताईंचे हात मजबूत करणार आहे. मोदींचे हात मजबूत करणार आहे.’

अनेक चढ-उतार पाहिले – गवळी

‘२५ वर्षापासून मी काम करत आहे. मी जिल्हाप्रमुख म्हणून काम केलं. लहानपणापासून शिवसेनेत काम करण्याचं बाळकडू होतं. काही तरी मिळतंय म्हणून मी काम करत नाही. मी २५ वर्ष खासदार आहे. आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला आहे की आपल्याला महायुतीच्या उमेदवाराचं काम करायचे आहे. २५ वर्ष परिवार म्हणून मी या मतदारसंघात काम केलंय.’

‘आता हा विषय संपलेला आहे. आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले आहे. लोकं म्हणत असतील सोन्याचा चमच घेऊन आले आहे. पण मी अनेक संघर्ष पाहिला आहे. पक्षाचा निर्णय आहे यामध्ये मला काही वाटत नाही की बोलले पाहिजे.’

‘पक्षश्रेष्ठींचा निर्णय महत्त्वाचा असतो. जे झालं ते भूतकाळ आहे. आता भविष्याकडे पाहते आहे. मी शिवसेनेसाठी काम करत राहणार. मी प्रसिद्धीच्या भांगडीत कधी पडली नाही. मी कधी सर्व्हे केला नाही. आता मी पक्षासाठी बांधिल आहे. माझी पुढची राजकीय वाटचाल हे मुख्यमंत्री शिंदे ठरवतील.  मी नाराज होणाऱ्यांपैकी नाही. संघर्ष करणारी मी आहे. संघर्ष करणारे नाराज होत नाही असं देखील भावना गवळी यांनी म्हटले आहे.’

बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'.
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्...
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्....
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका.
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट.
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा.
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?.
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्..
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्...