पाच ते साडेपाच हजारात मिळणारं रेमडेसीवीर इंजेक्शन जालन्यात अवघ्या 1400 रुपयात मिळणार
जालन्यामध्ये रेमडेसीवीर इंजेक्शन आता केवळ 1400 रुपयांना मिळणार आहे (Remdesivir injection in Jalna will be available in just Rs 1400).
जालना : कोरोना साथीने अनेक प्रकारच्या औषधांच्या मार्यादा स्पष्ट केल्या आहेत. काही औषधे या आजाराच्या उपचारप्रक्रियेत प्रभावी ठरली नाहीत. पण रेमडेसीवीर इंजेक्शनने संजीवनीची भूमिका बजावली. या इंजेक्शनची किंमत जास्त असल्याने सर्वच कारोना रुग्णांना हे इंजेक्शन घेणे परवडले नव्हते. सर्वसामान्य व्यक्तीलाही हे इंजेक्शन परवडावे यादृष्टीने जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांच्या पुढाकारातुन, तसेच अन्न व औषध विभागाच्या श्रीमती अंजली मिटकर यांच्या प्रयत्नातुन रेमडेसीवीर इंजेक्शन आता जालन्यामध्ये केवळ 1400 रुपयांना मिळणार आहे (Remdesivir injection in Jalna will be available in just Rs 1400).
जिल्हाधिकाऱ्यांची औषध विक्रेत्यांसोबत बैठक
रेमेडीसेवीर इंजेक्शनच्या आकारण्यात येणाऱ्या दराबाबत नुकतीच कोविड रुग्णालय संलग्न औषध विक्रेत्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये प्रशासनातर्फे रेमडेसिवीर इंजेक्शन सर्व कोविड संलग्ण औषध विक्रेत्यांनी मुळ किंमतीपेक्षा (MRP) पेक्षा कमीत कमी किंमतीत रुग्णांकरीता उपलब्ध करण्याचे आवाहन कण्यात आले (Remdesivir injection in Jalna will be available in just Rs 1400).
जालण्यात ‘या’ मेडिकलमध्ये मिळणार कमी किंमतीत इंजेक्शन
सर्व कोविड रुग्णालय संलग्न औषध विक्रेत्यांनी त्यास सहमती दाखवली. त्यामुळे पुरवठा धारकाच्या दरानुसार दर बदलन्याच्या शर्तीवर रेमडेसिवीर इंजेक्शन साधारणत: 1 हजार 400 रुपये प्रती व्हायल या किमतीला उपलब्ध करुन देण्याचा निर्णय कोविड रुग्णालय संलग्न औषध विक्रेत्यांकडुन घेण्यात आला. हे इंजेक्शन दीपक हॉस्पीटल, विवेकानंद हॉस्पीटल, जालना क्रिटीकल केअर सेंटर, जालना हॉस्पीटल, नवजीवन हॉस्पीटल, आस्था हॉस्पीटल, संजिवनी हॉस्पीटल, शतायु हॉस्पीटल, यासह सर्व कोविड रुग्णालय संलग्न औषध विक्रेत्यांकडे उपलब्ध असणार आहेत. तसेच प्रधानमंत्री भारतीय जनौषधी केंद्र, संभाजी नगर इथेही ही औषधे कमी दरात उपलब्ध करण्यात आले आहे.
इंजेक्शनची बाजारात किंमत तब्बल पाच ते साडे पाच हजार
रेमडेसीवीर इंजेक्शन हे कोरोना रुग्णांसाठी प्रभावी ठरले आहे. डॉक्टर प्रत्येक रुग्णाला या इंजेक्शनचे सहा डोज देतात. या औषधांचा सहा डोजचा कोर्स असतो. पण या एका इंजेक्शनची किंमत तब्बल साडेपाच हजार रुपये आहे. त्यामुळे एका रुग्णाला इंजेक्शनसाठी तब्बल 30 ते 35 हजार रुपये खर्च येतो. इतक्या रकमेचा उपचार करणं सर्वसामान्यांना परवडणार नाही.
हेही वाचा : Maharashtra Corona Update : राज्यात कोरोनाचा कहर, 25 हजार 833 नवे रुग्ण! कोणत्या शहरात चिंताजनक स्थिती?