Big News : तर राज्यातल्या नेत्यांच्या सुरक्षेबाबतही हा निर्णय घ्या, पंजाब ‘आप’च्या निर्णयावर पाऊल उचलण्याची रोहित पवारांची मागणी

पंजाबचे आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले की, पोलीस नेत्यांच्या घराबाहेर तंबू ठोकून त्यांची सुरक्षा करत आहेत. मात्र, त्यांना त्यांचे काम करू द्यावे. राज्यातील पावणेतीन कोटी लोकांना सुरक्षेची गरज आहे. सध्या पोलीस ठाणे ओस पडले आहेत. त्यामुळे काही लोकांच्या सुरक्षेपेक्षा मला पंजाबच्या जनतेची सुरक्षा महत्त्वाची वाटते.

Big News : तर राज्यातल्या नेत्यांच्या सुरक्षेबाबतही हा निर्णय घ्या, पंजाब 'आप'च्या निर्णयावर पाऊल उचलण्याची रोहित पवारांची मागणी
रोहित पवार, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस
Follow us
| Updated on: Mar 13, 2022 | 2:39 PM

मुंबईः पंजाबचे आम आदमी पक्षाचे (AAP) होणारे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी शपथविधीपूर्वीच 122 माजी मंत्र्यांची सुरक्षा काढून घेण्याचे निर्देश दिलेत. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी माजी मंत्री, आमदारांची सुरक्षा काढावी. त्यांच्या सुरक्षेचा फेरआढावा घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केली आहे. पंजाबचे आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी शनिवारी संगरूर गुरुद्वारा साहिबमध्ये जाऊन दर्शन घेतले. यावेळी ते म्हणाले की, पोलीस नेत्यांच्या घराबाहेर तंबू ठोकून त्यांची सुरक्षा करत आहेत. मात्र, त्यांना त्यांचे काम करू द्यावे. राज्यातील पावणेतीन कोटी लोकांना सुरक्षेची गरज आहे. सध्या पोलीस ठाणे ओस पडले आहेत. आम्ही पोलिसांकडूनच हे काम करूवून घेऊ. त्यामुळे काही लोकांच्या सुरक्षेपेक्षा मला पंजाबच्या जनतेची सुरक्षा महत्त्वाची वाटते, असा निर्धार त्यांनी आपल्या निर्णयानंतर व्यक्त केला होता. या निर्णयाचे अनेकांनी कौतुक केले आहे. महाराष्ट्रातही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

रोहित पवारांचे ट्वीट काय?

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या निर्णयानंतर रोहित पवार यांनी एक ट्वीट करून गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना साकडे घातले आहे. त्या ट्वीटमध्ये आमदार पवार म्हणतात की, माजी मंत्री, आमदार यांची सुरक्षा काढण्याचा पंजाबचे नियोजित मुख्यमंत्री भगवंत मान यांचा निर्णय स्वागतार्ह आहे. यामुळे पोलिसांवरचा ताण कमी होऊन विविध गुन्ह्यांच्या तपासाला मदत होणार असेल, तर राज्यातही अशा प्रकारे नेत्यांच्या सुरक्षेचा फेरआढावा घेण्याबाबत विचार व्हावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. आता या निर्णयानंतर राज्य सरकार खरेच महाराष्ट्रातील माजी मंत्री आणि आमदारांची सुरक्षा काढणार का, याची चर्चा सुरू झाली आहे.

या नेत्यांची सुरक्षा गेली?

पंजाबमध्ये मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या या निर्णयानंतर नवज्योत सिंग सिद्धू यांच्यासह त्यांची पत्नी नवज्योत कौर, मनप्रीत सिंग बादल, भारतभूषण आशू, रझिया सुलताना, परगट सिंग, राणा गुरजीत सिंग, सुखबिंदर सिंग सरकारिया, संजय तलवार, नथू राम, दर्शन लाल, धरमबीर अग्निहोत्री, अरुण नारंग, तरलोचन या नेत्यांची सुरक्षा जाणार आहे. मात्र, दुसरीकडे न्यायालयाच्या आदेशानुसार ज्यांना सुरक्षा पुरवण्यात आली आहे, ती तशीच कायम राहणार आहे.

इतर बातम्याः

Kumar Vishvas Birth Day Special | सृजन का बीज हूँ, जाया हो नही सकता, 10 वर्ष राजकारण, हजारो वर्ष कविता!!

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!

Nashik | महापालिकेच्या कोषागार विभागात घोटाळा, नियमित भरण्यावरच डल्ला, नेमके प्रकरण काय?

नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.