Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भरकटलेल्या जहाजासाठी अलिबागमध्ये रेस्क्यू ऑपरेशन, ८ कर्मचाऱ्यांची सुटका

Rescue Operations: लाटांचा मारा सहन करीत गेल्या 24 तासांपासून हे जहाज कुलाबा किल्ला लगत अलिबाग येथील तुषार सरकारी विश्रामगृहासमोर अडकून बसले होते. जे एस डब्ल्यू या कंपनीचे हे जहाज आहे. जहाजातील आठ कर्मचाऱ्यांची सुटका करण्यात आली आहे.

भरकटलेल्या जहाजासाठी अलिबागमध्ये रेस्क्यू ऑपरेशन, ८ कर्मचाऱ्यांची सुटका
Rescue Operations
Follow us
| Updated on: Jul 26, 2024 | 11:07 AM

अलिबाग येथील समुद्र किनाऱ्यावर भरकटलेल्या जहाजासाठी शुक्रवारी सकाळी रेस्कू ऑपरेशन राबवण्यात आले. त्यानंतर आठ कर्मचाऱ्यांनाची सुखरुप सुटका करण्यात आली. त्यांना कोस्ट गार्डच्या हेलिकॉप्टरने अलिबाग किनाऱ्यावर सोडण्यात आले. या जहाजावर १४ कर्मचारी असून इतर कर्मचारी सुरक्षित आहे. त्यांनाही किनाऱ्यावर आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. जे एस डब्ल्यू कंपनीचे हे जहाज होते. दरम्यान, कोकणात मुसळधार पाऊस सुरु असल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यास रेड अलर्ट दिला आहे.

24 तासांपासून जहाज अडकले

प्रवासी जहाज आणि बोटींना समुद्रमार्गे वाहतूक करण्यासाठी समुद्र खवळला असताना बंदी करण्यात आली आहे. फक्त व्यापारी तसेच मालवाहू जहाजे बार्जेस आणि बोटी या जलवाहतुकीला पूर्ण परवानगी आहे. मात्र गुरुवारी सकाळी हे जहाज लाटांसोबत कुलाबा किल्ल्याच्या अगदी पाचशे मीटर अंतरापर्यंत उथळ समुद्रात येऊन रुतले आहे. त्यामुळे या जहाजाची हालचाल बंद झाली.

लाटांचा मारा सहन करीत गेल्या 24 तासांपासून हे जहाज कुलाबा किल्ला लगत अलिबाग येथील तुषार सरकारी विश्रामगृहासमोर अडकून बसले होते. जे एस डब्ल्यू या कंपनीचे हे जहाज आहे. त्या जहाजावरील कर्मचाऱ्यांची सुटका करण्यासाठी भारतीय तटरक्षक दलाने रेस्क्यू शुक्रवारी सकाळी नऊ वाजता ऑपरेशन राबवले. त्यानंतर आठ कर्मचाऱ्यांची सुटका झाली.

हे सुद्धा वाचा

सहा कर्मचाऱ्यांसाठी प्रयत्न सुरुच

जेएसडब्लू कंपनीचे अधिकाऱ्यांनी या अडकलेल्या जहाजाची पाहणी केली. त्यानंतर हे जहाज पुन्हा खोल समुद्रात ओढून घेण्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न करावे लागतील, याबाबत चर्चा केली. जहाजावरील आठ कर्मचारी सुखरुप परतले आहे. परंतु सहा कर्मचारी अडकले आहे. त्यांना मुसळधार पाऊस, भरती-ओहोटी आणि जोरदार वारा या आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. त्यांनाही वाचवण्याचे प्रयत्न सुरु आहे.

VIDEO हातात खुर्च्या अन् बदडलं, घाटकोपरच्या कबड्डी स्पर्धेत हाणामारी
VIDEO हातात खुर्च्या अन् बदडलं, घाटकोपरच्या कबड्डी स्पर्धेत हाणामारी.
'बांगर बोलतोय', डेंगूच्या रुग्ण अन् बिल 6 लाख...डॉक्टरलाच धरलं धारेवर
'बांगर बोलतोय', डेंगूच्या रुग्ण अन् बिल 6 लाख...डॉक्टरलाच धरलं धारेवर.
भारतात लांब कानाचे कुत्रे कुठे? वाघ्याला फेकून द्या, राजेंचा संताप अन्
भारतात लांब कानाचे कुत्रे कुठे? वाघ्याला फेकून द्या, राजेंचा संताप अन्.
'...तेव्हा कोकणाला काय दिलं?', एकच सवाल अन् राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
'...तेव्हा कोकणाला काय दिलं?', एकच सवाल अन् राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल.
मुंबईतील वाहतुकीचे पर्याय अधिक सक्षम होणार! फडणवीसांची मुंबईसाठी घोषणा
मुंबईतील वाहतुकीचे पर्याय अधिक सक्षम होणार! फडणवीसांची मुंबईसाठी घोषणा.
'माझ्या वक्तव्यावर मी ठाम', मंगेशकर कुटुंबीयांवर वडेट्टीवारांचा घणाघात
'माझ्या वक्तव्यावर मी ठाम', मंगेशकर कुटुंबीयांवर वडेट्टीवारांचा घणाघात.
मुंबईकरांनो 'या' मार्गावरून प्रवास करताय? मेगाब्लॉकमुळे 334 लोकल रद्द
मुंबईकरांनो 'या' मार्गावरून प्रवास करताय? मेगाब्लॉकमुळे 334 लोकल रद्द.
एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात परिवहन मंत्र्यांकडून मोठी अपडेट
एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात परिवहन मंत्र्यांकडून मोठी अपडेट.
रुग्णला अमृत पाजलं का? शिंदेंच्या आमदारानं डॉक्टरला झापलं,ऑडिओ व्हायरल
रुग्णला अमृत पाजलं का? शिंदेंच्या आमदारानं डॉक्टरला झापलं,ऑडिओ व्हायरल.
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण; तिसरा अहवाल सरकारला सादर, काय म्हटलंय?
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण; तिसरा अहवाल सरकारला सादर, काय म्हटलंय?.