प्रतीक्षा संपली, राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या सदस्यपदाच्या आरक्षणाची 13 जूनला सोडत, 208 नगरपरिषदा, 8 नगरपंचायतींचा समावेश
13 जून 2022 रोजी संबंधित ठिकाणी आरक्षण सोडत काढण्यात येईल. आरक्षण सोडतीच्या अनुषंगाने काही हरकती किंवा सूचना असल्यास त्या 15 ते 21 जून 2022 या कालावधीत दाखल करता येतील. संबंधित विभागीय आयुक्त सदस्यपदांच्या आरक्षणास मान्यता देतील.
मुंबई – राज्यभरातील 216 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या (Nagar parishad and Nagar panchayat) सार्वत्रिक निवडणुकीसाठी (elections)13 जून 2022 रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने 15 ते 21 जून 2022 या कालावधित हरकती व सूचना दाखल करता येतील, अशी घोषणा राज्य निवडणूक (state election commission)आयोगाने केली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या ठिकाणी निवडणुका होणे अपेक्षित होते. कोरोना काळामुळे अनेक ठिकाणच्या निवडणुकी रखडलेल्या होत्या. त्या नगरपरिषदांचा यात समावेश आहे.
एकूण 216 ठिकाणी आरक्षण सोडत
आरक्षणाची सोडत काढण्यात येणाऱ्या 216 मध्ये 208 नगरपरिषदा आणि 8 नगरपंचायती आहेत. त्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जामाती माहिला आणि सर्वसाधारण महिलांच्या सदस्यपदांसाठी ही सोडत काढण्यात येईल. आरक्षण सोडतीसाठी संबंधित जिल्हाधिकारी शुक्रवारी (ता. 10 जून) नोटीस प्रसिद्ध करतील. 13 जून 2022 रोजी संबंधित ठिकाणी आरक्षण सोडत काढण्यात येईल. आरक्षण सोडतीच्या अनुषंगाने काही हरकती किंवा सूचना असल्यास त्या 15 ते 21 जून 2022 या कालावधीत दाखल करता येतील. संबंधित विभागीय आयुक्त सदस्यपदांच्या आरक्षणास मान्यता देतील. आरक्षणाची अंतिम अधिसूचना 1 जुलै 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल, असेही आयोगाच्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
सोडतीनंतर निवडणुकीची तयारी सुरु
या नगरपरषिदांतील अनेक इच्छुक उमेदवारांनी गेल्या दोन वर्षांपासून प्रयत्न सुरु केले आहेत. त्या त्या प्रभागात त्यांनी काम करण्यासही सुरुवात केली आहे. आता सोडतीनंतर नेमके कुठले आरक्षण पडते की वॉ़र्ड ओपनमध्ये पडतो, याकडे अनेकांचे लक्ष असेल. त्यामुळे सोडतींचे चि६ स्पष्ट झाल्यानंतर प्रत्येक प्रभागातील राजकीय घडामोडींना वेग येणार आहे.