महाराष्ट्रात पुन्हा निर्बंध, दुकान सुरु करण्याच्या वेळेत बदल, कोल्हापूरसह नागपुरात व्यापारी संघटना आक्रमक
अत्यावश्यक आणि जीवनावश्यक वस्तूंची दुकान उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. पण यामुळे व्यापारी संघटना आक्रमक झाल्या आहेत. (Restrictions in Maharashtra again Kolhapur and Nagpur Trade unions are aggressive)
कोल्हापूर : महाराष्ट्रात अनलॉक केल्यानंतर काही शहरांमध्ये पुन्हा कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. याशिवाय कोरोनाच्या डेल्टा प्लस या व्हेरिएंट्सचा धोकादेखील वाढताना दिसत आहे. यामुळे प्रशासन आणि सरकार पुन्हा एकदा बॅकफूटवर आलं आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात पुन्हा निर्बंध लावण्यात आले आहेत. या दरम्यान अत्यावश्यक आणि जीवनावश्यक वस्तूंची दुकान उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. पण यामुळे व्यापारी संघटना आक्रमक झाल्या आहेत. (Restrictions in Maharashtra again Kolhapur and Nagpur Trade unions are aggressive)
कोल्हापुरात व्यापारी संघटना आक्रमक
कोल्हापूर जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा 16 टक्क्यांहून अधिक आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात चौथ्या स्तरावरील निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा अत्यावश्यक आणि जीवनावश्यक वस्तूची दुकान उघडायला परवानगी देण्यात आली आहे. मात्र असं असलं तरीही जिल्ह्यातील व्यापारी संघटना आक्रमक झाल्या आहेत. आज कोणत्याही परिस्थितीत इतर सर्व दुकान उघडणार असा पवित्रा या व्यापाऱ्यांनी घेतला आहे.
तर दुसरीकडे प्रशासनानेही दुकान उघडल्यास कडक कारवाई करु असा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे कोल्हापुरात व्यापारी आणि प्रशासनामध्ये संघर्षाची शक्यता निर्माण झाली आहे. काल झालेल्या बैठकीत आजपासून दुकान उघडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर अनेक व्यापाऱ्यांनी कोल्हापुरातील महाद्वार रोड या ठिकाणी गर्दी केली.
नागपुरात व्यापाऱ्यांमध्ये नाराजी
तर दुसरीकडे नागपुरातही व्यापाऱ्यांमध्ये नाराजीचे चित्र आहे. नागपुरात आजपासून नवीन निर्बंध लागू झाले आहेत. त्यामुळे नागपूरच्या सीताबर्डी मार्केटमध्ये आज सकाळपासून लगबग पाहायला मिळत आहे. आजपासून बाजार 4 वाजता पर्यंतच सुरू राहणार असल्याने अनेक व्यापारी सकाळी लवकर दुकानात पोहोचले आहेत.
नागपुरात सकाळी 11 च्या दरम्यान उघडणारा बाजार आज सकाळी उघडायला सुरुवात झाली आहे. वेळ कमी असल्याने व्यापाऱ्यांना लगबग करावी लागत आहे. या निर्बंधांमुळे व्यवसाय करायला कमी वेळ मिळत आहे. हे निर्बंध 5 जुलैपर्यंत लागू राहणार आहे. त्यामुळे व्यापारी नाराज असल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे.
Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत घट, कोरोनाबळी एक हजाराखाली https://t.co/mJmWwEkrw8 #CoronaPandemic | #CoronaVirusUpdates
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 28, 2021
(Restrictions in Maharashtra again Kolhapur and Nagpur Trade unions are aggressive)
संबंधित बातम्या :
फक्त 8 जिल्ह्यात डेल्टा प्लस मग संपूर्ण महाराष्ट्रात निर्बंध का? वाचा सविस्तर नेमकं काय घडलंय?