‘या’ जिल्ह्याला मिळणार अहिल्यानगर नाव; ‘या’ नेत्यानं राज्य सरकारपासून केंद्रापर्यंत केला पाठपुरावा

अहमदनगर जिल्ह्याला जर अहिल्यादेवी यांचे नाव मिळणार असेल तर ते नक्कीच भूषणावह असणार आहे. अहिल्यादेवींचे कर्तृत्व फार मोठे आहे.

'या' जिल्ह्याला मिळणार अहिल्यानगर नाव; 'या' नेत्यानं राज्य सरकारपासून केंद्रापर्यंत केला पाठपुरावा
Follow us
| Updated on: Feb 25, 2023 | 8:11 PM

लोणी/अहमदनगरः औरंगाबाद शहराचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असं नामाकरण केले आहे. त्यानंतर आता अहमदनगर जिल्ह्यासाठी नामकरणाचा मुद्दा पुढे आला आहे. त्यामुळे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या जिल्ह्यांचे ज्या प्रमाणे नामकरण करण्यात आले आहे, त्याच प्रमाणे आता अहमदनगर जिल्ह्यालाला अहिल्यानगर नाव देणं हा भूषणावह असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करणे म्हणजे ते भूषणावह असल्याचे सांगितले. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबरोबरच भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनीही ट्विट करत अहिल्यादेवी यांचे नाव या जिल्ह्याला देण्याची मागणी केली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडूनही अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यानगर नाव देण्याची मागणी करण्यात येत होती.

त्यानंतर आता राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्या मागणीचे समर्थन करत अहमदनगरला जिल्ह्याला अहिल्यादेवींचे नाव देणे म्हणजे भूषणावह असणार असल्याचेही त्यांनी सांगितल आहे.

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी गेल्या काही दिवसांपासून त्यांनी ही मागणी लावून धरली होती. त्यातच आता औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यांचे नामकरण केल्यानंतर आता अहमदनगर जिल्ह्याच्या नामाकरणासाठीही आग्रह वाढला आहे. त्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील अहमदनगरच्या नामकरणाला समर्थन असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

अहमदनगर जिल्ह्याला जर अहिल्यादेवी यांचे नाव मिळणार असेल तर ते नक्कीच भूषणावह असणार आहे. अहिल्यादेवींचे कर्तृत्व फार मोठे आहे. त्यामुळे जर अहिल्यादेवींचे नाव नगर जिल्ह्याला मिळत असले तर त्याचे आम्ही स्वागतच करू असंही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यादेवींचे नाव देण्यासाठी आता आम्ही केंद्राकडे पाठपुरावा करणार आहे. राज्य सरकारच्या माध्यमातूनही नामकरण लवकर व्हावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांंनी सांगितले.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.