औरंगाबादच्या केळगावात दंगल, पोलिसांच्या गोळीबारानंतर काय आहे परिस्थिती?

आरोपीच्या घराबाहेर एवढ्या मोठ्या प्रमाणात गावकरी जमा झाले होते की हल्लेखोरांना पांगवण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला आहे.

औरंगाबादच्या केळगावात दंगल, पोलिसांच्या गोळीबारानंतर काय आहे परिस्थिती?
Follow us
| Updated on: Dec 12, 2020 | 10:47 AM

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील केळगावत दंगल उफाळली आहे. विनयभंगांतील आरोपीच्या घरावर गावकऱ्यांकडून हल्ला करण्यात आला आहे. दीडशे ते दोनशे गावकऱ्यांनी आरोपीच्या घरावर हल्ला केला असल्याची माहिती देण्यात आली आहे. आरोपीच्या घराबाहेर एवढ्या मोठ्या प्रमाणात गावकरी जमा झाले होते की हल्लेखोरांना पांगवण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. (Riots in Aurangabad Villagers attack accused house police fire in air)

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. पोलीस पाटील महिलेचा आरोपीने सातत्याने विनयभंग केला होता. त्यामुळे आरोपीच्या त्रासाला कंटाळवून पीडित महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे आत्महत्येपूर्वी पोलीस पाटील महिलेने व्हीडीओ केला होता. जो मोठ्या प्रमाणात व्हायरल आहे.

या जीवघेण्या घटनेमध्ये पीडित थोडक्यात बचावली असून त्यांच्यावर सिल्लोडच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खरंतर, या प्रकरणात पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करत आरोपीला ताब्यात घेतलं होतं. पण त्याला जामीन मिळाल्यामुळे गावकरी संतापले होते. त्यामुळे त्यांनी थेट घरावर हल्ला करण्यास सुरुवात केली.

मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यामध्ये आरोपीच्या घराची मोडतोड करण्यात आली आहे. संतप्त नागरिकांनी पोलीस व्हॅनवरही दगडफेक केल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना हवेत पाच राउंड फायर करत गोळीबार करण्यात आला. यामुळे सध्या गावाला छावणीचं स्वरूप आलं असून हल्लेखोरांची धरपकड सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. (Riots in Aurangabad Villagers attack accused house police fire in air)

इतर बातम्या –

महाराष्ट्र हादरला! विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार, अल्पवयीन मुलासह दोघांवर गुन्हा दाखल

नागपूरमधील रेडलाईट एरियात पोलिसांची मोठी कारवाई, 8 अल्पवयीन मुलींची सुटका, 100 ग्राहक ताब्यात

(Riots in Aurangabad Villagers attack accused house police fire in air)

PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'.
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?.
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक.
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!.
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?.
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.