AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्य शासनाचे आदेश आल्यानं ‘ती’ यंत्रणा अलर्ट मोडवर, नागरिकांनो तब्येत सांभाळा अन्यथा…

नाशिक महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाला राज्य शासनाकडून आरोग्य स्थितीचा तपशील विचारण्यात आला आहे. त्याचा अहवाल सादर करायचा असल्याने आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे.

राज्य शासनाचे आदेश आल्यानं 'ती' यंत्रणा अलर्ट मोडवर, नागरिकांनो तब्येत सांभाळा अन्यथा...
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Mar 07, 2023 | 12:30 PM

नाशिक : गेल्या काही दिवसांमध्ये ताप आणि सर्दी चे रुग्ण वाढत आहे. त्याच पार्श्‍वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ( Health News ) काही रुग्णांची कोरणा चाचणी करण्यात आली आहे. त्यामध्ये जवळपास 198 कोरोनाचे रुग्ण आढळून आलेले आहेत आणि इतरही अनेक जणांना कोरोना ची लक्षणे दिसून येत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा कोरोनाच्या ( Corona News ) पार्श्वभूमीवर राज्य शासनाचा आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आला आहे. राज्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आरोग्य विभागासह राज्याच्या आरोग्य विभागाला काही विशेष सूचना देण्यात आलेल्या आहेत. आयसीएमआरच्या सुचने नुसार वीस कॉन्टॅक्ट ट्रेसिंग शोधण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.

कोरोना च्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजन बेडची क्षमता आणि औषध साठा यांची स्थिती काय ? आहे यांसह रुग्णांच्या संदर्भातील अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. कोविड केअर सेंटर बाबतची स्थिती काय आहे याबाबतही अहवाल सादर करावा लागणार आहे.

राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने याबाबत तातडीने हा तपशील मागीवला आहे. त्यामध्ये महत्वाची बाब म्हणजे काही महिन्यांपासून सर्दी, ताप आणि खोकल्याचे रुग्ण आढळून आले आहे. त्यामध्ये नव्या विषणूच्या अनुषंगाने त्यांच्या तपासण्या देखील केल्या जात आहे. त्यामुळे आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आले आहे.

हे सुद्धा वाचा

राज्यातील कोरोनाची स्थिती पाहता मोजकेच कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहे. जवळपास कोरोना हद्दपार झाला आहे. त्यामुळे कोरोनाची चौथी लाट तर येणार नाही ना ? कोरोना चौथी लाट आली तर काय करायचे याबाबतची तयारी काय आहे. अशा सर्व बाजूने आरोग्य विभागाचा आढावा घेतला जात आहे.

मुंबई, ठाणे, नाशिक आणि धाराशीव येथे काही कोरोनाची लक्षणे असलेली रुग्ण आढळून आली आहे. त्यामध्ये त्यांचे केंद्राच्या आदेशानुसार वीस संपर्कात आलेला व्यक्तींची तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. त्यामुळे सरकारी पातळीवर याची अंमलबजावणी करण्याची तयारी सुरू झाली आहे.

नाशिक जिल्ह्यात खरंतर मालेगावसह शहरात कोरोनाचा मोठा मुक्काम राहिला आहे. दुसऱ्या लाटेत अनेकांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील परिस्थिती नेमकी काय आहे? रुग्णांची आकडेवारी किती आहे. त्या नुसार तपासणी केली जात आहे का ? या महत्वाच्या बाबी पुन्हा एकदा तपासल्या जात आहे.

राज्य शासनाकडून पुन्हा निर्बंध लागतील अशी स्थिती नाही. मात्र लक्षणे आढळून आल्यास तपासणी केली जाण्याची शक्यता आहे.

शाहिद आफ्रिदी मोठ्या भ्रमात... म्हणतो पाकचा विजय, रॅली काढली अन्...
शाहिद आफ्रिदी मोठ्या भ्रमात... म्हणतो पाकचा विजय, रॅली काढली अन्....
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता LIVE, नेमकं काय बोलणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता LIVE, नेमकं काय बोलणार?.
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, आधी युद्धविरामासाठी विनंती अन् आता म्हणताय
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, आधी युद्धविरामासाठी विनंती अन् आता म्हणताय.
जम्मूच्या एका गावातील भिंतीत आढळला जिवंत बॉम्ब
जम्मूच्या एका गावातील भिंतीत आढळला जिवंत बॉम्ब.
मोठी बातमी, भारत-पाकच्या DGMO च्या चर्चेची वेळी बदलली, आता कधी चर्चा?
मोठी बातमी, भारत-पाकच्या DGMO च्या चर्चेची वेळी बदलली, आता कधी चर्चा?.
भारताच्या हल्लावेळी गायब झालेला असीम मुनिर कुठे होता?
भारताच्या हल्लावेळी गायब झालेला असीम मुनिर कुठे होता?.
या पुढची लढाई झाली तर.. ; भारतीय सैन्य दलांचा थेट इशारा
या पुढची लढाई झाली तर.. ; भारतीय सैन्य दलांचा थेट इशारा.
पाकिस्तानला तीव्र भूकंपाचा धक्का, आठवड्यात तिसऱ्यांदा पाक हादरलं
पाकिस्तानला तीव्र भूकंपाचा धक्का, आठवड्यात तिसऱ्यांदा पाक हादरलं.
इशारा ही काफी है... भारत पुढील मिशनसाठी सज्ज, बघा 10 महत्त्वाचे मुद्दे
इशारा ही काफी है... भारत पुढील मिशनसाठी सज्ज, बघा 10 महत्त्वाचे मुद्दे.
शत्रूला जवळ येऊ न देता नौदलासह हवाई दलाने..व्हाइस अ‍ॅडमिरल ए.एन.प्रमोद
शत्रूला जवळ येऊ न देता नौदलासह हवाई दलाने..व्हाइस अ‍ॅडमिरल ए.एन.प्रमोद.