Weather Report : विदर्भात मे महिन्यातही रखरखते ऊन! अवकाळीचे ढगही कायम राहणार
गेल्या काही दिवसांपासून उन्हामध्ये वाढ सुरु झाली आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांचा पारा हा 40 शी पार गेला आहे. विदर्भात कधी पावसामुळे तर आता वाढत्या उन्हामुळे हंगामी पिकांवर परिणाम होत आहे. यातच आता उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज नारपूर हवामान विभागाने वर्तवला आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांची हा अवस्था राहणार आहे.
नागपूर : (Meteorological Department) भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार एप्रिल महिन्याचा शेवट आणि मे महिन्याची सुरवात रखरखत्या उन्हाने झालेली आहे. मात्र, सुरवातच नाही तर सबंध महिना (Vidarbha) विदर्भात ऊन- पावासाचा खेळ हा कायम राहणार आहे. दिवसेंदिस तापमानात होत असलेल्या वाढीमुळे नागरिक त्रस्त आहेत. विदर्भात (Temperature) उन्हाचे प्रमाण अधिक असून आगामी काळात तर यामध्ये वाढ होणार असल्याचा अंदाज नागपूर हवामान विभागाने वर्तवलेला आहे. 3 मे पासून तर पुन्हा उष्णतेची लाट राहणार आहे. यामुळे शेती व्यवसयावर तर परिणाम होणारच आहे पण यंदाच्या उन्हाळ्यामध्ये उष्मघाताने नागपुरात 11 जणांचा मृत्यू झाला तर त्यापाठोपाठ जळगावात बळींची संख्या जास्त आहे. आता पुन्हा राज्यात निसर्गाचा लहरीपणा पाहवयास मिळतो की काय अशी शंका आहे.
चंद्रपूरकरांसाठी 5 दिवस धोक्याचेच
गेल्या काही दिवसांपासून उन्हामध्ये वाढ सुरु झाली आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांचा पारा हा 40 शी पार गेला आहे. विदर्भात कधी पावसामुळे तर आता वाढत्या उन्हामुळे हंगामी पिकांवर परिणाम होत आहे. यातच आता उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज नारपूर हवामान विभागाने वर्तवला आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांची हा अवस्था राहणार आहे. तर चंद्रपुरात 9 मे रोजी 45 अंश सेल्सिअस पेक्षाही अधिक्या तापमानाची नोंद होईल असा अंदाज आहे. एकीकडे ऊनापासून संरक्षणासाठी करण्याची धडपड सुरु झाली आहे तर दुसरीकडे अवकाळी पावसाचाही धोका कायम राहणार आहे.
तीन दिवसा पावसाचे
2 मे पासून तीन दिवस हे विदर्भात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे उन्हाळी हंगामातील पिकांना धोका निर्माण झाला आहे. आतापर्यंत निसर्गाच्या लहरीपणाचा परिणाम उत्पादनावर झाला आहे. यातच पुन्हा अवकाळीचा धोका असल्याचा अंदाज वर्तवल्याने अंतिम टप्प्यात असलेल्या उन्हाळी पिकांचे काय होणार याची धास्ती शेतकऱ्यांमध्ये आहे. सबंध उन्हाळ्यामध्ये अवकाळी पाऊस आणि कडाक्याचे ऊन असेच चक्र राहिले आहे.
नागपूरात 11 जणांचा उष्मघाताने मृत्यू
राज्यात गेल्या दोन महिन्याच्या कालावधीत उष्मघातामुळे 25 जणांचा बळी गेला आहे. यामध्ये सर्वाधिक प्रमाण हे नागपुरातील आहे. विदर्भात अकोला, ब्रम्हपूरी या भागात 45 अंशापेक्षाही अधिक तापमान गेले होते. गेल्या काही वर्षाच्या तुलनेत यंदाचा उन्हाळा अधिक तीव्र असल्याने उष्मघाताचे प्रमाण हे वाढले आहे. नागपुरात 11 तर जळगावमध्ये दोन महिन्यात 4 जणांचा उष्मघाताने मृत्यू झाल्याची नोंद आहे.
विर्दभासाठी हवामान ईशारे@RMC_Nagpur pic.twitter.com/7vSNuIR67t
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 1, 2022