AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बीडमध्ये आकाशातून पडले दगड, अचानक घडलेल्या घटनेने गावकरी दहशतीत; महाराष्ट्रात काय घडतंय?

बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील लिमगाव येथे आकाशातून अचानक दगड पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तहसील प्रशासन आणि भूवैज्ञानिकांनी घटनास्थळी पाहणी केली आहे. मात्र, दगड पडण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

बीडमध्ये आकाशातून पडले दगड, अचानक घडलेल्या घटनेने गावकरी दहशतीत; महाराष्ट्रात काय घडतंय?
बीडमध्ये आकाशातून पडले दगड
Follow us
| Updated on: Mar 05, 2025 | 1:43 PM

गुन्ह्यांच्या घटनांमुळे देशभरात चर्चेत असलेल्या बीडमध्ये आणखी एक खळबळजनक घटना घडली आहे. बीडच्या वडवणी तालुक्यातील लिमगावात आकाशातून अचानक दगड पडले. आकाशातून दगड पडल्याने मोठ्ठा आवाज झाला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तहसील प्रशासनाने हे दगड ताब्यात घेतले आहेत. तसेच छत्रपती संभाजी नगर येथील भूवैज्ञानिकांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे. मात्र, गावात अचानक आकाशातून दगड पडल्याने गावकरी दहशतीखाली आहेत.

काल दुपाराच्या दरम्यान आकाशात प्रचंड मोठा आवाज होऊन दोन ते चार दगड पडले असल्याची घटना मौजे खळवट लिंमगांव येथे घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच तहसिल प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी भेट देत पाहणी आणि पंचनामा केला आहे. आकाशातून पडलेले दगड देखील ताब्यात घेतले आहेत. तर आज सकाळी छत्रपती संभाजी नगर येथील एमजीएम विद्यापीठाचे भूवैज्ञानिक शास्त्रज्ञांच्या टीमने घटनस्थळी जाऊन पाहणी केली. तसेच घटनेचा प्रकार लक्षात घेत गूढ काय ते लवकरच कळवू अशी माहिती दिली आहे. तर या घटनेमुळे ग्रामस्थांमधून भीती व्यक्त केली जात आहे.

मोठा आवाज आला

वडवणी तालुक्यातील खवळट लिमगावात काल दुपारी 2 वाजण्याच्या दरम्यान आकाशामध्ये तीन मोठे आवाज होऊन आकाशामधून दगड कोसळले. यातील एक दगड भिकाजी अंबुरे यांच्या घरावर पडला. हा दगड इतक्या वेगाने पडला की घरावरील पत्रा तुटून दगड खाली पडला. तसेच अन्य दोन दगड इतर शेतामध्ये पडले, अशी माहिती गावकऱ्यांनी दिली आली आहे. घरावर पडलेला दगड हा वेगळा असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.

गावकरी घाबरले

तसेच दगड ज्यावेळी घरावर पडला त्यावेळी हा दगड खूप गार असल्याचेही सांगण्यात आले. खवळट लिमगावच्या आजूबाजूच्या गावच्या नागरिकांनी देखील भला मोठा आवाज ऐकायला आल्याचे सांगितले. हा आवाज नेमका कशाचा झाला आणि दगड नेमके कुठून पडले? तसेच पुन्हा संध्याकाळीही घरावर दगड पडतील का? या भीतीने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. घटनास्थळी वडवणी तहसील प्रशासनाने भेट देऊन हा नेमका दगड कुठून आणि कसा पडला याची माहिती गावकऱ्यांकडून घेतली. त्यानंतर या घटनेचा पंचनामा करण्यात आला.

संशोधक घटनास्थळी

तर आज सकाळी छत्रपती संभाजी नगरमधील ए पी जे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे अभ्यासक श्रीनिवस औंधकर, अभिनव विटेकर यांच्या टीमने घटनास्थळाला भेट देत पाहाणी केली. हा आवाज कशामुळे झाला? दगड पडण्याचे कारण काय? याचे गूढ काय ते लवकरच कळवू, अशी माहिती या शास्त्रज्ञांनी दिली आहे. सदरील एक दगड तहसीलदाराकडून घेतला आहे. तर यातील एक दगड जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवणार असल्याचे सांगितले आहे.

राजस्थानात स्फोट, मध्यरात्री भारताच्या धमाक्यांनी पाक एअरबेस उद्ध्वस्त
राजस्थानात स्फोट, मध्यरात्री भारताच्या धमाक्यांनी पाक एअरबेस उद्ध्वस्त.
पाक सेनेसाठी 'तबाई'ची सकाळ, भारताने 'हे' 4 एअरबेस उद्ध्वस्त करत हादरवल
पाक सेनेसाठी 'तबाई'ची सकाळ, भारताने 'हे' 4 एअरबेस उद्ध्वस्त करत हादरवल.
पाकचा मोठा हल्ला, राजौरीमधील घरांची अवस्था बघा, विदारक VIDEO पाहून...
पाकचा मोठा हल्ला, राजौरीमधील घरांची अवस्था बघा, विदारक VIDEO पाहून....
पंतप्रधान नरेंद्र मोदींची तिन्ही सैन्य प्रमुखांसोबत महत्वाची बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदींची तिन्ही सैन्य प्रमुखांसोबत महत्वाची बैठक.
नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर; पाकिस्तानचं काळं सत्य
नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर; पाकिस्तानचं काळं सत्य.
400 ड्रोन, 36 ठिकाणी हल्ला; काय काय झालं? कुरेशींनी सगळंच सांगितलं
400 ड्रोन, 36 ठिकाणी हल्ला; काय काय झालं? कुरेशींनी सगळंच सांगितलं.
आम्ही भारतीय सैन्यासोबत; सीमेवरील नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
आम्ही भारतीय सैन्यासोबत; सीमेवरील नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
मुख्यमंत्र्यांची उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक; काय झाली चर्चा?
मुख्यमंत्र्यांची उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक; काय झाली चर्चा?.
जैसलमेरमध्ये ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, रामगडमध्येही सापडले बॉम्बचे तुकड
जैसलमेरमध्ये ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, रामगडमध्येही सापडले बॉम्बचे तुकड.
गरज पडल्यास आपात्कालीन...केंद्राचं सर्व राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र
गरज पडल्यास आपात्कालीन...केंद्राचं सर्व राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र.