Sangli: निकालाच्या वेळी माझ्या बापाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही! रोहित पाटील यांची भावनिक साद
सांगलीतील कवठेमहांकाळ येथील नगरपंचायत निवडणुकीची जबाबदारी दिवंगत नेते आर आर पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. काल सांगलीत त्यांची अखेरची प्रचारसभा झाली, त्यावेळी त्यांनी केलेलं एक वक्तव्य सध्या राजकीय वर्तुळात चर्चेत आहे.
सांगलीः कवठेमहांकाळ नगरपालिका निवडणुकीत प्रचाराच्या तोफा रविवारी थंडावल्या. निवडणुकीच्या राष्ट्रवादीच्या प्रचााची सांगता सभा रोहित आर आर पाटील यांनी चांगलीच गाजवली. विशेष म्हणजे या सभेतील रोहित पाटील (Rohit Patil) यांचे एक वक्तव्य सध्या चांगलेच चर्चेत आहे. ते म्हणाले, 19 जानेवारीला निवडणुकीचा निकाल येईल, त्यावेळी माझ्या बापाची आठवण तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही.’ या वक्तव्याद्वारे रोहित पाटील यांनी मतदारांना भावनिक साद घातली असून त्याचे पडसाद मतपेटीवर कसे उमटतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
काय म्हणाले रोहित पाटील?
राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर आर पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील हे सध्या कवठेमहांकाळ नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात उतरले आहेत. शेवटच्या प्रचारसभेत ते म्हणाले, ‘आज मी जे पॅनल निवडलंय, त्यावर सर्वसामान्य लोक म्हणतातय की, तुम्ही आमच्या मनातील पॅनल निवडलं. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सर्वसामान्य माणसानं खांद्यावर घेतलं आहे. पक्षाची जबाबदारी सर्वसामान्यांनी घेतली आहे. 19 जानेवारी रोजी याचा निकाल लागल्यानंतर माझ्या बापाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. ‘
पुढच्या 25 वर्षांचं व्हिजन आमच्याकडे आहे
रोहित पाटील म्हणाले, राष्ट्रवादी पक्षाकडे पुढील 25 वर्षे सांगली कसे असेल, याचं व्हिजन तयार आहे. सध्या कोणती कामं सुरु आहेत, कोणती केली पाहिजेत, याची सर्व माहिती मला आहे. आपल्या कार्यकर्त्याचा, सामान्य माणसाचा विकास झाला पाहिजे, हीच आमची भावना आहे. पंधरा वर्षे ज्यांच्या हातात सत्ता होती, नगरपंचायत होती, तेच लोक आज पुन्हा एकदा आदर्श नगरपंचायत घडवण्यासाठी एकत्र आलो आहोत, असे म्हणतायत. मग एवढे दिवस यांनी काय केलं? मी इथल्या प्रत्येक वॉर्डात फिरलो, त्यामुळे इथले वास्तव मला माहिती आहे, असे वक्तव्य रोहित पाटील यांनी केले.
इतर बातम्या-