AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Pawar | शरद पवार महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री? नातू रोहित पवार म्हणतात..

भाजपच्या (bjp) नेत्यांची अशी राजकीय वक्तव्य करण्याची पद्धत ही आताची नाही, तर ती फार जुनी आहे. ही भाजपच्या नेत्यांना लागलेली सवय लवकर जाईल अशी काही चिन्हं दिसत नाहीत, अशी घाणाघाती टीका आमदार रोहित पवारांनी (rohit pawar) केली आहे.

Rohit Pawar | शरद पवार महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री? नातू रोहित पवार म्हणतात..
rohit pawar
Follow us
| Updated on: Jan 12, 2022 | 6:42 PM

भाजपच्या नेत्यांची अशी राजकीय वक्तव्य करण्याची पद्धत ही आताची नाही, तर ती फार जुनी आहे. ही भाजपच्या नेत्यांना लागलेली सवय लवकर जाईल अशी काही चिन्हं दिसत नाहीत, अशी घाणाघाती टीका आमदार रोहित पवारांनी (rohit pawar) केली आहे. तसेच (gujrat) गुजरातच्या भूकंपावेळी सुध्दा शरद पवारांची (sharad pawar) मदत घेतली होती. तेव्हा ते भारताचे पंतप्रधान नव्हते, असा टोमनाही त्यांनी भाजपच्या नेत्यांना लगावला आहे. मागील दोन वर्षात कोरोनाच्या काळातही इतकं वय झालेला असताना सुध्दा शरद पवारांनी आराम केला नाही. तर प्रत्यक्ष जनतेत मिसळून त्यांना सहकार्य केलं आहे, आणि जनतेच्या मनात असलेली भीती त्यांनी दूर केली. शरद पवार साहेबांवरती भाजपकडून वारंवार अशा पध्दतीची टीका केली जाते. पण त्यांच्या टीकेत काहीचं अर्थ नसतो हे जनतेला सुध्दा माहित आहे असंही रोहित पवार म्हणाले.

काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत का? याला प्रत्युत्तर

शरद पवार हे महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत का? असं वक्तव्य भाजपकडून केल्यानंतर रोहित पवारांनी त्यांनी जोरादार प्रत्युत्तर दिले आहे, त्यामध्ये ते म्हणतात की “देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असताना सुध्दा पवार साहेब जनतेमध्ये मिसळून त्यांची मदत करताना दिसतात.” कोरोनाच्या काळात एकही दिवस घरी न बसता त्यांनी जनतेला मोठ्या प्रमाणात आधार दिला.

तसेच त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याही वक्तव्याचा कडकडून समाचार घेतला आहे. फडणवीस म्हणाले होते की, “जनमताची चोरी होऊ देणार नाही” त्यावर उत्तर देताना रोहित पवार म्हणतात की, “त्यांच्याकडे गोव्याची जबाबदारी असल्याने त्यांना अशी अर्थहीन वक्तव्य त्यांना करावी लागतात.” अनेक पक्षांची एकत्र लढण्याची पवार साहेबांची तयार सुरू असल्याचे सुध्दा रोहित पवारांनी म्हटलं आहे. गोव्यात शरद पवारांच्या विरोधात अपप्रचार केल्याशिवाय देवेंद्र फडणवीसांना पर्याय नाही. कारण त्यांच्याकडे बोलण्यासारखं काहीचं नसल्याने ते अशा पध्दतीची टीका वारंवार करत असतात. असेही ते म्हणाले.

Maharashtra Corona Update : राज्यात तब्बल 46 हजार नवे कोरोना रुग्ण! सेल्फ कोरोना टेस्ट करणाऱ्यांनाही आरोग्यमंत्र्यांचं आवाहन

UP Assembly Election 2022 : काल राजीनामा, आज अटक वॉरंट! स्वामी प्रसाद मौर्यांविरोधात ‘सोची समझी साजीश’?

राणेंसोबतच्या बैठकीनंतर नाराजीवर राजन तेली यांची पहिली प्रतिक्रिया…तेली म्हणाले…

'तुमच्या देशाचे बजेट आमच्या लष्करी बजेट इतकेही नाही' - असदुद्दीन ओवैसी
'तुमच्या देशाचे बजेट आमच्या लष्करी बजेट इतकेही नाही' - असदुद्दीन ओवैसी.
20 ते 22 तास चालून बैसरन खोऱ्यात पोहोचले; एनआयएच्या तपासात मोठे खुलासे
20 ते 22 तास चालून बैसरन खोऱ्यात पोहोचले; एनआयएच्या तपासात मोठे खुलासे.
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.