मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावर रोहित पवार म्हणाले मी पण गेलोय पण…
रोहित पवार म्हणाले, आयोध्या दौरा कोणाला करायचा असेल तर त्यांनी करावा, मी स्वतः गेलो आहे, मी जेव्हा गेलो तेव्हा कुटुंबासाठी गेलो होतो.
कुणाल जायकर, टीव्ही 9 मराठी, अहमदनगर : राज्यातील सत्तांतर झाल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि शिंदे गटाचे आमदार (Shinde Group MLA) हे नोव्हेंबर महिन्यात अयोध्येला (Ayodhya) जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाकडून याबाबत तयारी देखील केली जात आहे. शिंदे सरकार येऊन जवळपास साडेतीन महीने उलटून गेले आहेत. काही दिवसांपूर्वी अयोध्येतील हनुमान गढीचे प्रमुख महंत राजूदास महाराज यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येला येण्याचं आमंत्रण दिले होते. महंतांनी दिलेले निमंत्रण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वीकारले होते. त्यानुसार हा दौरा आयोजित केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, यावर राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे युवा आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यावर टीका केली आहे.
रोहित पवार म्हणाले, अयोध्या दौरा कोणाला करायचा असेल तर त्यांनी करावा, मी स्वतः गेलो आहे, मी जेव्हा गेलो तेव्हा कुटुंबासाठी गेलो होतो.
याशिवाय मी धर्मामध्ये राजकारण करत नाही तर अशा करूया अयोध्या दौऱ्याचे राजकारण त्यांच्या हातून घडणार नाही, अशी अपेक्षा रोहित पवार यांनी केली आहे.
मागे आमदार रोहित पवार हे देखील आपल्या कुटुंबासोबत अयोध्या दौऱ्यावर गेले होते, तिथे त्यांनी श्री रामाचे दर्शन घेतले होते.
हिंदुत्वाचे सरकार असा उल्लेख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेकदा केला आहे, त्यातच आता ते सर्व आमदारांना घेऊन अयोध्याला श्री रामाचे दर्शन घेण्यासाठी जाणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्व आमदारांना घेऊन दर्शनसाठी जाणार असल्याने विरोधकांकडून टोकदार टीका न होता, संयमाने प्रतिक्रिया दिली जात आहे.
देवाच्या ठिकाणी दर्शन घ्यायला जाणार असाल तर तिथे राजकारण होऊ नये अशी एकप्रकारे अशा रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे.