Rohit Pawar : पडळकरांचं भाषण हे 3rd ग्रेडचं, चौंडीतल्या नाट्यानंतर रोहित पवारांचं सणसणीत उत्तर

पडळकर खूप चांगली अँटिंग करतात, तसा व्यक्तिगत स्टंट पडळकरांनी केला. पडळकरांचे भाषण हे 3rd ग्रेडचे भाषण होतं. तसेच आम्हाल मातीत घालायचं की नाही ते लोकं ठरवतील. असा टोला त्यांनी लगावलाय.

Rohit Pawar : पडळकरांचं भाषण हे 3rd ग्रेडचं, चौंडीतल्या नाट्यानंतर रोहित पवारांचं सणसणीत उत्तर
आमदार रोहित पवारImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 31, 2022 | 5:11 PM

अहमदनगर : चौंडी येथे भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केलेल्या आरोपांवर आमदार रोहित पवारांनी (Rohit Pawar) सडेतोड उत्तर दिलाय. चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंती (Ahilyadevi Holkar Jayanti) उत्सवादरम्यान माजी मंत्री राम शिंदे, आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांसह रोहित पवारांवर जहरी टिका केली.. या टिकेला आमदार रोहित पवार यांनीही जोरदार प्रत्त्युत्तर दिलय.. काहीजण केवळ खालच्या दर्जाचं बोलण्यात धन्यता मानतात, त्यांच्या बोलण्याला फार महत्व देत नसल्याचं रोहित पवार यांनी म्हटलंय. तसेच पडळकर खूप चांगली अँटिंग करतात, तसा व्यक्तिगत स्टंट पडळकरांनी केला. पडळकरांचे भाषण हे 3rd ग्रेडचे भाषण होतं. तसेच आम्हाल मातीत घालायचं की नाही ते लोकं ठरवतील. असा टोला त्यांनी लगावलाय.

लोक पैसे घेऊन आले का ?

मागच्या वेळी राम शिंदे यांची सभा उधळून लावली. कारण तुम्हाला टीव्हीवर दिसायचं होत. तसेच 90 टक्के धनगर लोकं होती मग ते पैसे घेऊन आले असं म्हणायचं आहे का? असा सवालही त्यांनी केलाय. रोहित पवार लहानपणापासून किती वेळा इथे आला ते बघा. तसेच त्यांची मागच्या 4 दिवसांची भाषण ऐकली तर दगडफेक करा अशा स्वरूपाची होती, त्यामुळे पोलीस कारवाई करणारच की, असेही ते म्हणाले. इथली वस्तू ही भाजपच्या काळात झाली नाही. इथल्या भिंती पडायला लागल्या. त्यामुळे राम शिंदे यांना म्हणावं समोर येऊन बोला. इथं सगळ्यात चांगली वस्तू म्हणजे राम शिंदे यांचा बंगला आहे. जर तुम्हाला या गावासाठी काही तरी चांगलं केलं असतं. तर ते दिसलं असतं. तसेच ज्यांनी बिरोबाची शपथ घेऊन पाळली नाही त्यांना हिंदू धर्म काय कळला? असा टोलही त्यांनी पडळकरांनी लगावला आहे.

चौंडीत आज नेमकं काय घडला?

अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत चोंडीला जात होते. तेव्हा त्यांना तिथे जाण्यापासून पोलिसांकडून रोखण्यात आलं. यावेली एकच छंद गोपीचंदच्या घोषणेने परिसर दुमदुमून निघाला, तसेच पडळकर आणि खोत यांनी शरद पवारांवर यावेळी जोरदार टीका केली.

हे सुद्धा वाचा

काय म्हणाले पडळकर आणि खोत?

चौंडीत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी एक कार्यक्रम आयोजित केलाय, त्यासाठाी त्यांना परवानगी दिली जाते मग आम्हाला अभिवादन करण्यापासून रोखण्याचं कारण काय? असा सवाल यावेळी पडळकरांनी विचारलाय.रोहित आणि शरद पवार या आजोबा आणि नातवाने प्रशासनवर दबाव आणलाय. म्हणून पोलीस पक्षपातीपणा करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. तसेच सादाभाऊ खोत यांनी यावेळी पवारांवर निशाणा साधताना चौंडीचा सातबारा पवारांच्या नावावर नाही. ती पवारांची जहागिरी नाही, त्यामुळे आम्हाला अडवण्याचा त्यांना अधिकार नाही, असे म्हणत सदाभाऊ खोत यांनी हल्लाबोल चढवला.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.