AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आणि फुगा फोडला… अजितदादा परखड आणि स्पष्टवक्ते; पुतण्याकडून पहिल्यांदाच काकाचं कौतुक

अजित पवार यांच्या कर्जत-जामखेड भेटीनंतर रोहित पवार यांनी ट्विट करून त्यांचे कौतुक केले आहे. त्यांनी राम शिंदे यांच्यावर निशाणा साधला असून अजित पवारांनी शिंदे यांच्या एमआयडीसीच्या दाव्याचा फुगा फोडल्याचे म्हटले आहे. रोहित पवारांनी आपल्या मतदारसंघातील विकासकामांसाठी अजित पवार यांच्याकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे.

आणि फुगा फोडला... अजितदादा परखड आणि स्पष्टवक्ते; पुतण्याकडून पहिल्यांदाच काकाचं कौतुक
रोहित यांनी काकांचं कौतुक केलं आहे. Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Apr 18, 2025 | 12:02 PM

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे काल कर्जत जामखेड येथे आले होते. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांचा हा मतदारसंघ आहे. निवडणुकीनंतर पहिल्यांदाच अजित पवार हे रोहित पवार यांच्या मतदारसंघात आल्याने चर्चांना उधाण आलं होतं. पुतण्याच्या मतदारसंघात खिंडार पाडायला काका तर आले नाही ना? अशी चर्चा रंगली होती. पण तसं काही झालं नाही. मात्र, तरीही रोहित पवार यांनी आज एक ट्विट करून आपल्या काकांचं भरभरून कौतुक केलं आहे. हे कौतुक करताना प्रा. राम शिंदे यांच्यावर निशाणाही साधला आहे. अजितदादांनी काल तोंडावरच राम शिंदे यांची तोंडावरच बोलती बंद करून फुगा फोडल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. रोहित यांनी ट्विट करून काकांचं कौतुक केलं आहे.

रोहित पवार यांची पोस्ट जशीच्या तशी

माननीय अजितदादा हे परखड आणि स्पष्टवक्ते आहेत याची प्रचिती काल पुन्हा एकदा जामखेडमध्ये आली. विशेष म्हणजे अजितदादांनी काल तोंडावरच प्रा. राम शिंदे सरांची बोलती बंद केली. निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी एक दिवस आधी केवळ मतांसाठी कर्जत-जामखेडसाठी ‘खांडवी-कोंभळी’ एमआयडीसी मंजूर करुन आणल्याचं गाजर त्यांनी दाखवलं आणि हुजऱ्यांकडून स्वतःची पाठही थोपटून घेतली होती. पण काल जामखेडमध्ये बोलताना ‘‘कर्जत-जामखेडमध्ये MIDC आली का? नाही आली,’’ या एका वाक्यात प्रा. राम शिंदे सरांनी एमआयडीसी आणल्याच्या दाव्याचा फुगा अजितदादांनी एका क्षणात फोडला.. याबाबत अजितदादा आपलं खरंच मनापासून अभिनंदन!

पण कर्जत-जामखेडकरांच्यावतीने माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे की, मागच्या टर्ममध्ये पहिल्या अडीच वर्षांतच मी पाटेगाव-खंडाळा येथील एमआयडीसीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करुन घेतली आणि केवळ मंत्र्यांची अंतिम मंजुरी बाकी आहे.. त्यासाठी आम्ही सर्वांनी अनेकदा पाठपुरावाही केला, पण दुर्दैवाने महाविकास आघाडी सरकार गेलं. त्यानंतर कोणतेही प्रयत्न न करता केवळ श्रेय मिळावं म्हणून टपून बसलेल्या आणि नकारात्मक राजकीय विचारांच्या विषाणूंची लागण झालेल्या काही नेत्यांमुळं ही अंतिम मंजुरी रखडलीय. आपण स्वतः यात घालून ही एमआयडीसी मंजूर केली तर कर्जत-जामखेडचा लोकप्रतिनिधी म्हणून मी आपले उपकार कधीही विसरणार नाही. त्यासाठी आपण मदत कराल अशी कर्जत-जामखेडकर म्हणून आम्हाला अपेक्षा आणि विश्वास आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात कर्जत-जामखेडसाठी तुम्ही कोट्यवधी रुपये निधी दिल्याचा उल्लेखही दादा आपण यावेळी केलात. दादा तुम्ही हे खरंच सांगितलं आणि मलाही ते मान्य आहे, याबाबत माझ्या कर्जत-जामखेडकरांच्यावतीने मी आपला कायम आभारी आहे. विकासकामांच्या बाबतीत कोणताही भेदभाव न करणारे अशी आपली प्रतिमा आहे. त्यामुळं यापुढंही आपण विकास कामांसाठी कोणताही भेदभाव करणार नाहीत असा विश्वास आहे. याच विश्वासातून माझ्या मतदारसंघात सुरु असलेल्या कर्जत-जामखेडच्या उपजिल्हा रुग्णालयांसाठी निधी, चोंडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं संग्रहालय, घाट, कमानीसाठी निधी, खर्ड्यात सद्गुरु संतश्री गितेबाबा आणि सिद्धसंत श्री सितारामबाबा गडाच्या सुरु असलेल्या विकासकामासाठी निधी, जामखेडच्या आणि कर्जतच्या मी मंजूर करुन आणलेला व पूर्ण केलेल्या एसटी डेपोसाठी पुरेशा एसटी बस आणि मनुष्यबळ यासह इतर कामांसाठीही निधीची गरज आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या यंदाच्या ३०० व्या जयंतीसाठीही भरीव निधी आवश्यक आहे. याबाबत यापूर्वी मी आणि काल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनीही आपल्याला निवेदनं दिली आहेत. त्याचा विचार करुन ही कामं मार्गी लावण्यासाठी तातडीने भरीव निधी मंजूर करावा आणि पुन्हा एकदा कोणताही भेदभाव न करणारे दादा म्हणून आपलं कौतुक करण्याची आणि आभार मानण्याची संधी द्यावी, ही विनंती!

एका चांगल्या विचारांतून राजकारण करत असताना मा. अजितदादा आपण कधीही अडवाअडवीचं काम करत नाही. पण अलीकडे माझ्या मतदारसंघात महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर करुन आणलेला निधी अडवण्याचा, मंजूर केलेली कामं थांबवण्याचा, कार्यकर्त्यांना त्रास देण्याचा आणि फोडाफोडी करण्याचा व्हायरस पसरतोय, त्यावरही निष्णात राजकीय डॉक्टर म्हणून अजितदादा तुम्हीच योग्य ईलाज कराल, असा विश्वास आहे.

चोरीला गेलेलं बाळ सुखरूप आईच्या कुशीत, पोलिसांकडून 48 तासात शोध अन्...
चोरीला गेलेलं बाळ सुखरूप आईच्या कुशीत, पोलिसांकडून 48 तासात शोध अन्....
युद्धाची पूर्व तयारी, गृहमंत्रालयाचे सर्व राज्यांना आदेश; 7 मे रोजी...
युद्धाची पूर्व तयारी, गृहमंत्रालयाचे सर्व राज्यांना आदेश; 7 मे रोजी....
पाक पंतप्रधान गायब, पत्रकाराचा सवाल अन् उपपंतप्रधानांचं उत्तर बघा काय
पाक पंतप्रधान गायब, पत्रकाराचा सवाल अन् उपपंतप्रधानांचं उत्तर बघा काय.
मुंबईकरांनो... तुम्ही बेस्ट बसने प्रवास करतात? तुमच्यासाठी मोठी बातमी
मुंबईकरांनो... तुम्ही बेस्ट बसने प्रवास करतात? तुमच्यासाठी मोठी बातमी.
वैभवी देशमुखला मुख्यमंत्र्यांचं पत्र अन् बारावीचे गुण कळताच म्हणाले...
वैभवी देशमुखला मुख्यमंत्र्यांचं पत्र अन् बारावीचे गुण कळताच म्हणाले....
पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?
पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?.
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?.
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश.
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?.
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं.