केडीएमसीत पोस्टर बॉय विरुद्ध गल्ली बॉय; शिवसेना-भाजपमधील वाद पेटला

आगामी कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. (row between shiv sena and bjp in kalyan-dombivli)

केडीएमसीत पोस्टर बॉय विरुद्ध गल्ली बॉय; शिवसेना-भाजपमधील वाद पेटला
कल्याण डोंबिवली महानगरपालिका
Follow us
| Updated on: Jun 02, 2021 | 11:19 AM

अमजद खान, टीव्ही9 मराठी, कल्याण: आगामी कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांवर व्यक्तिगत टीका करण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेकडून भाजपच्या आमदाराला पोस्टर बॉयची उपमा देण्यात आली आहे. तर, भाजपने शिवसेनेला गल्ली बॉय म्हणून डिवचले आहे. त्यामुळे सध्या कल्याण-डोंबिवलीत पोस्टर बॉय विरुद्ध गल्ली बॉय असं चित्रं निर्माण झालं आहे. (row between shiv sena and bjp in kalyan-dombivli)

महापालिका निवडणुका जवळ येऊ लागल्याने शिवसेना आणि भाजपने एकमेकांवर टीकास्त्र सोडण्यास सुरुवात केली आहे. या राजकीय वादाने आता वैयक्तिक रुप घेतले असून हा वाद शहरात चर्चेचा विषय होत आहे. महापालिकेकडून लावण्यात आलेल्या घनकचरा व्यवस्थापन करावरून हा वाद पेटला आहे. भाजपने या कराला विरोध करत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच शिवसेना नेत्यांच्या विरोधात बॅनरबाजीही केली आहे. या बॅनरबाजीला शिवसेनेकडून सडेतोड उत्तर देण्यात आले आहे. शिवसेनेचे शहरप्रमुख राजेश मोरे आणि पदाधिकारी राजेश कदम यांनी भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांच्यावर सडकून टीका केली आहे. कोरोना काळात भाजप आमदार कुठे होते? ते केवळ पोस्टर बॉय आहेत. त्यामुळे त्यांना आमच्या नेत्यांवर टीका करण्याचा नैतिक आधार नाही, अशी घणाघाती टीका राजेश मोरे यांनी केली आहे.

महापालिकेत कोणत्या प्रश्नावर आवाज उठवलाय?

तर शिवसेनेच्या या टीकेला भाजपनेही सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. भाजप आमदाराना पोस्टरबॉय म्हणणारे गल्लीबॉय आहेत. शिवसेनेचे शहरप्रमुख राजेश मोरे आमदारावर टीका करतात. त्यांनी महापालिकेत कोणत्या नागरी प्रश्नांवर आवाज उठविलाय? आणि हे राजेश कदम कोण आहेत?, असा सवाल भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी केला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांपर्यंत या दोन्ही पक्षांमधील हा वाद आणखीनच चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.

पक्षीय बलाबल

एकूण जागा 122

शिवसेना- 52 भाजप- 42 काँग्रेस- 4 राष्ट्रवादी- 2 मनसे- 9 एमआयएम- 1 अपक्ष- 10 (row between shiv sena and bjp in kalyan-dombivli)

संबंधित बातम्या:

शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा लसीकरणाला उत्स्फुर्त प्रतिसाद, ठाण्यात दिवसभरात 195 जणांनी लस टोचली

धक्कादायक ! ठाणे महापालिका ग्लोबल कोविड सेंटरमधील 46 डॉक्टरांना कमी करणार?

शिक्षणात कल्याण पॅटर्नची ओळख, कल्याणदेखील शिक्षणाची पंढरी होणार, भाजप खासदाराचा दावा

(row between shiv sena and bjp in kalyan-dombivli)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.