AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RSS सरसंघचालक मोहन भागवतांना कोरोनाची लागण, नागपुरातील रुग्णालयात दाखल

सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहेत. त्यांच्यावर डॉक्टरांचे एक पथक त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे. (RSS Mohan Bhagwat Corona Positive)

RSS सरसंघचालक मोहन भागवतांना कोरोनाची लागण, नागपुरातील रुग्णालयात दाखल
RSS Mohan Bhagwat
Follow us
| Updated on: Apr 10, 2021 | 7:57 AM

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांना कोरोनाची (Corona Virus) लागण झाली आहे. त्यांना नागपूरच्या किंग्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. (RSS Chief Mohan Bhagwat tested Corona Positive)

“राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना सध्या कोरोनाची सामान्य लक्षण दिसत आहेत. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ते सध्या नागपुरातील किंग्स रुग्णालयात उपचार घेत आहेत,” असे ट्वीट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अधिकृत ट्वीटरवरुन करण्यात आलं आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहन भागवत यांना रुग्णालयातील कोरोना वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहेत. त्यांच्यावर डॉक्टरांचे एक पथक त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे.

महिनाभरापूर्वी कोरोना लसीकरण

दरम्यान गेल्या महिन्यात 6 मार्चला मोहन भागवतांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता. मोहन भागवत यांच्यासह संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनीही कोरोना लस घेतली होती. नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी कोरोना लसीकरण केले होते. त्याच दिवशी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि त्यांच्या पत्नीनेही संस्थेत कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता.

नागपुरातील कोरोना स्थिती

नागपुरात काल दिवसभरात 6 हजार 489 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर 2 हजार 175 रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. काल दिवसभरात 64 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नागपुरात सध्या 49 हजार 347 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. नागपुरातील एकूण रुग्णसंख्या 2 लाख 66 हजार 224 वर पोहोचली आहे. त्यातील 2 लाख 11 हजार 236 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर नागपुरात आतापर्यंत 5 हजार 641 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (RSS Chief Mohan Bhagwat tested Corona Positive)

संबंधित बातम्या : 

बीएमसीकडून मुंबईत कोरोना लसीकरणाचं वेळापत्रक जाहीर, तुम्हाला कधी-कुठं लस घेता येणार? वाचा…

Maharashtra Corona Update : चिंता वाढली, गेल्या 24 तासांत 58 हजार 993 नवे रुग्ण, मृतांचा आकडा 300 पार

Maharashtra Weekend Lockdown | वीकेंड लॉकडाऊनमध्ये काय सुरु, काय बंद? तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे

पहलगामचं 'मिनी स्वित्झर्लंड' ओळख अन् तिथच अतिरेक्यांनी झाडल्या गोळ्या
पहलगामचं 'मिनी स्वित्झर्लंड' ओळख अन् तिथच अतिरेक्यांनी झाडल्या गोळ्या.
आता फक्त आठवणी अन् स्मशान शांतता; बैसरनमधून टीव्ही9चा ग्राऊंड रिपोर्ट
आता फक्त आठवणी अन् स्मशान शांतता; बैसरनमधून टीव्ही9चा ग्राऊंड रिपोर्ट.
बैसरन खोऱ्यातून टीव्ही9 मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट
बैसरन खोऱ्यातून टीव्ही9 मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट.
अटारी सीमेवर लागल्या रांगा; पाकिस्तानी नागरिकांना घेऊन वाहनांची गर्दी
अटारी सीमेवर लागल्या रांगा; पाकिस्तानी नागरिकांना घेऊन वाहनांची गर्दी.
भेदरलेल्या पाकिस्तानचा भारतावर निर्बंध लादण्याचा पोरकट प्रयत्न
भेदरलेल्या पाकिस्तानचा भारतावर निर्बंध लादण्याचा पोरकट प्रयत्न.
.. मग स्थानिक यंत्रणेकडे कशी नाही? सुप्रिया सुळेंचा सवाल
.. मग स्थानिक यंत्रणेकडे कशी नाही? सुप्रिया सुळेंचा सवाल.
जगात एकच मानव धर्म आहे, त्यालाच हिंदू धर्म म्हणतात - मोहन भागवत
जगात एकच मानव धर्म आहे, त्यालाच हिंदू धर्म म्हणतात - मोहन भागवत.
पहलगाम हल्ल्यात केंद्रीय सरकारने मान्य केली चूक
पहलगाम हल्ल्यात केंद्रीय सरकारने मान्य केली चूक.
पाणी रोखल्यानं पाकची तडफड का? सिंधू पाणी करार स्थगित, नेमकं काय होणार?
पाणी रोखल्यानं पाकची तडफड का? सिंधू पाणी करार स्थगित, नेमकं काय होणार?.
काश्मीरातून रुपाली ठोंबरे पुण्यात,अंधारेंनी मारली मिठी अन् अश्रू अनावर
काश्मीरातून रुपाली ठोंबरे पुण्यात,अंधारेंनी मारली मिठी अन् अश्रू अनावर.