मी आरडाओरडा केला, बंदूक काढायला सांगितली तेव्हा तो बेवडा… रुपाली पाटील यांनी शेअर केला भयानक अनुभव

धक्कादायक घटना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांच्यासोबतही घडली असून, तो धक्कादायक अनुभव त्यांनी सोशल मीडियावर शेअर करत पोस्ट लिहीली.

मी आरडाओरडा केला, बंदूक काढायला सांगितली तेव्हा तो बेवडा... रुपाली पाटील यांनी शेअर केला भयानक अनुभव
Follow us
| Updated on: Jun 30, 2024 | 11:29 AM

राज्यातील महिला सुरक्षित आहेत का, असा प्रश्न सध्या घडणाऱ्या अनेक घटनांमुळे लोकांना पडत आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी अनेक उपाययोजना करूनही त्यांना बऱ्याच वेळा त्रास सहन करावा लागतो. दारू पिऊन महिलांचा पाठलाग करणारे अनेक बेवडे महिलांना त्रास देत असतात, त्यामुळे महिलांना रस्त्यावर मोकळेपणे फिरण्यास, श्वास घेण्यासही भीती वाटते. ही परिस्थिती फक्त सामान्य लोकांपुरतीच नव्हे तर कधीकधी मोठ्या लोकांवरही, राजकारण्यांवरही असा प्रसंग गुदरतो. अशी एक धक्कादायक घटना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांच्यासोबतही घडली असून, तो धक्कादायक अनुभव त्यांनी सोशल मीडियावर शेअर करत पोस्ट लिहीली आहे. दोन बेवड्यांनी रुपाली पाटील आणि त्यांच्यासोबत असलेल्या महिलेचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. अखेर त्यांनी आरडोओरडा केल्यावर आणि ठणकावून जाब विचारल्यावर त्या बेवड्या इसमाने पळ काढला. याबद्दलची एक पोस्ट रुपाली पाटील यांनी लिहीली असून सक्षम व्हा असा सल्ला इतर स्त्रियांना दिला आहे. आपली सुरक्षा आपल्यालाच करावी लागते. वेळ प्रसंगी काली , दुर्गा अवतार घ्यावाच लागतो असे त्यांनी म्हटले. दारू पिऊन फिरणाऱ्या लोकांवर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणीही रुपाली पाटील ठोंबरे यांनी पोस्टमधून केली.

काय आहे रुपाली पाटील ठोंबरे यांची पोस्ट ?

रुपाली पाटील यांनी त्यांच्या अधिकृत फेसबूक अकाऊंटवरून थरारक प्रसंगाबद्दल पोस्ट शेअर केली आहे. त्यांची पोस्ट त्यांच्याच शब्दांत जशीच्या तशी…

रुपाली पाटील यांची पोस्ट

अत्यंत भयाण प्रसंग होता कालचा. सायंकाळी 7 ते 7.30 वेळ भोर येथील पिसावरे या गावात आमचे बंधू आण्णा बांदल यांच्या घराची वास्तुशांतीसाठी निघाले. मनीषाताई कावेडिया ,पूनम गुंजाळ सोबत होत्या.

भोर मधून नांद या गावाकडचा मधला रस्ता हा अत्यंत शांत आणि छोटे रस्ते आम्ही ज्या दिशेला जात होतो त्या विरुद्ध दिशेने टू व्हीलरवर दोन एसम गाडीला किक मारत होते.ते फुल प्यालेले होते. आम्ही आपलं पुढे निघालो महिला पाहून ते गाडीचा पाठलाग करत आमच्या मागे मागे जवळ जवळ दीड ते दोन किलोमीटर आले. ते मागे येतात हे समजताच, गाडी थांबवू नको, रस्त्यावर कोणी नाही असे मनिषाला सांगितले. व्हीलरची लाईट बंद करून हे दोन बेवडे गाडीच्या मागे येऊन टू व्हीलर आडवी घातली. महिला आहे हे दिसत असताना सुद्धा एका माणूस डायरेक्ट अंगावर आलाय

तेव्हा तातडीने मी गाडीतून उतरून त्याला जाब विचारायला सुरुवात केली. दोघे पूर्ण नशेतच होते मग डायरेक्ट आरडाओरडा सुर केला आणि काढ ती बंदूक असे म्हणाले तेव्हा कुठे बेवडा स्थिर झाला. त्यानंतर त्याला माझी ओळख कळली. मग रूपालीताई पाटील ठोंबरे आहेत म्हंटल्यावर त्याने तिथून पळ काढला. हे घडल्यावर क्षणभर मनात विचार आला माझ्या जागेवर जर इतर कोणी महिला असत्या तर या दोन बेवड्यांनी काय केलं असतं याचा विचार न केलेला बरं.

एखादा मोठा गुन्हा नक्कीच घडला असता हे असे दारू पिऊन जी विकृत लोक फिरतात नशेत गुन्हे करतात यांचा बंदोबस्त करणं गरजेचं आहे यांच्यावर कठोर कारवाई करणे गुन्हे दाखल करणे गरजेचे आहे. दारू पिऊन रस्त्यावर अशा पद्धतीने महिलांना, लोकांना त्रास होईल असे वागणे आणि यातूनच गुन्हे घडणे हे प्रकार मोठ्या प्रमाणात घडतात त्यामुळे यांच्यावर आळा बसणे अत्यंत गरजेचे आहे यांना कायद्याची भीती बसणे सुद्धा गरजेची आहे🙏

मी त्यानंतर गाडीतून कंट्रोलला फोन करून घडलेली घटना सांगितली त्याचा गाडीचा नंबर त्यांचा फोटो तोही पाठवला अशा घटना कुठल्याही सर्वसामान्य महिलेसोबत,लोकांसोबत घडू शकतो याच्यातून मोठा गुन्हा होऊ शकतो त्यासाठी कारवाई होणे गरजेचे आहे. बेवडे जाताना फोटो ,गाडी नंबर फोटो काढला असल्या बेवद्या लोकांना सोडायचे नाही चंगच बांधला.

दारू पिऊन फिरणाऱ्या लोकांवर कारवाई झालीच पाहिजे त्यातूनच गुन्हे घडण्यास हिंमत मिळते.

माझ्या माता,भगिनी,मैत्रिणींनो सक्षम व्हा, प्रसंगातून युक्त्या वापरून आपले रक्षण करा आपली सुरक्षा,रक्षण आपल्यालाच करावे लागते. वेळ प्रसंगी काली ,दुर्गा अवतार घ्यावाच लागतो म्हणून काल आम्ही महिला बचावलो.

Non Stop LIVE Update
विधानसभेला शिंदेच महायुतीचा चेहरा असणार? 'त्या' बॅनरवरून चर्चा
विधानसभेला शिंदेच महायुतीचा चेहरा असणार? 'त्या' बॅनरवरून चर्चा.
पंकजा मुंडेंना विधानपरिषदेवर संधी पण कोणता एक उमेदवार पडणार?
पंकजा मुंडेंना विधानपरिषदेवर संधी पण कोणता एक उमेदवार पडणार?.
विधानपरिषदेत शिवीगाळ, भर सभागृहात दानवेंनी कोणाला वापरली अर्वाच्य भाषा
विधानपरिषदेत शिवीगाळ, भर सभागृहात दानवेंनी कोणाला वापरली अर्वाच्य भाषा.
मुंबई पदवीधर मतदारसंघात अनिल परब vs किरण शेलारांमध्ये लढत, आघाडीवर कोण
मुंबई पदवीधर मतदारसंघात अनिल परब vs किरण शेलारांमध्ये लढत, आघाडीवर कोण.
नाहीतर भिडेंच्या मिशा कापणार, 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावरून कुणी घेरल?
नाहीतर भिडेंच्या मिशा कापणार, 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावरून कुणी घेरल?.
विधान परिषदेसाठी भाजपकडून ही 5 नावं जाहीर, मुंडेंसह कोणाची लागली वर्णी
विधान परिषदेसाठी भाजपकडून ही 5 नावं जाहीर, मुंडेंसह कोणाची लागली वर्णी.
पंकजा मुंडेंचं भाजपकडून पुनर्वसन, विधान परिषदेची उमेदवारी मिळाली
पंकजा मुंडेंचं भाजपकडून पुनर्वसन, विधान परिषदेची उमेदवारी मिळाली.
हे काय मॅच जिंकणार! विधानसभेत त्यांच्या...'त्या' दाव्यावर कुणाचा टोला?
हे काय मॅच जिंकणार! विधानसभेत त्यांच्या...'त्या' दाव्यावर कुणाचा टोला?.
आम्ही 13 जुलैपर्यंतच वाट बघणार, त्यानंतर...जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम
आम्ही 13 जुलैपर्यंतच वाट बघणार, त्यानंतर...जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम.
मनोज जरांगे साहेब, जरा शब्दांना...शिंदे गटाच्या महिला नेत्यानं सुनावलं
मनोज जरांगे साहेब, जरा शब्दांना...शिंदे गटाच्या महिला नेत्यानं सुनावलं.