बीड मोर्चाबाबत जितेंद्र आव्हाड यांचा खळबळजनक व्हॉट्सअॅप चॅट रुपाली ठोंबरे यांच्याकडून शेअर, म्हणाल्या, उत्तर दया जितेंद्र भाऊ…
सरपंच देशमुख हत्या प्रकरणी निघालेल्या मोर्चात जितेंद्र आव्हाड कुटुंबाला न्याय देण्यासाठी आले होते की आग लावण्यासाठी? सांगून टाका जितेंद्र भाऊ आव्हाड. उत्तर दया...या कॅप्शनने स्क्रीनशॉट शेअर केला गेला आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या प्रकरणात आरोपींना अटक करण्यासाठी शनिवारी मोर्चा निघाला. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही सहभाग घेतला. या मोर्चात सहभागी होण्याबाबत जितेंद्र आव्हाड यांनी शिवराज नावाच्या व्यक्तीशी व्हॉट्सअॅप चॅट केला असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी केले आहे.
रुपाली पाटील ठोंबरे यांनी एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. हा स्क्रीनशॉट जितेंद्र आव्हाड यांचा असल्याचा दावा त्यांनी X च्या माध्यमातून केला आहे. त्यात त्यांनी म्हटले की, सरपंच देशमुख हत्या प्रकरणी निघालेल्या मोर्चात जितेंद्र आव्हाड कुटुंबाला न्याय देण्यासाठी आले होते की आग लावण्यासाठी? सांगून टाका जितेंद्र भाऊ आव्हाड. उत्तर दया…या कॅप्शनने स्क्रीनशॉट शेअर केला गेला आहे.
काय आहे त्या स्क्रीनशॉटमध्ये
उद्याचा मसाला रेडी ठेव शिवराज….मी पहिली तुझी भेट घेईन नंतर मोर्चाकडे जाईल… मुंड्या विरोधात आणि वाल्या विरोधात जे जे काही असेल ते सगळे गोळा कर. पैसे लागले तर मला फोन कर. पण मटेरियल तयार ठेव. तुझा फोन लागत नाही सकाळपासून प्रयत्न करतोय..
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात कुटुंबाला न्याय देण्यासाठी आले होते की आग लावण्यासाठी सांगून टाका जितेंद्र भाऊ आव्हाड.उत्तर दया जितेंद्र भाऊ@Awhadspeaks माहितीसाठी –@Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @mieknathshinde @DGPMaharashtra pic.twitter.com/3ANGzS6lI1
— Rupali patil thombare (@Rupalispeak) December 28, 2024
काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?
बीडमधील मोर्चामधून बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले होते की, बीडच्या राजकारणाला कधी जातीचा स्पर्श झाला नाही. बीडचा सत्यानाश पोलिस प्रशासनाने आणि पालकमंत्र्यांने केला आहे. या प्रकरणात आधीच अॅट्रसिटीचा गुन्हा दाखल झाला असता तर संतोष देशमुख यांचा मृत्यू झाला नसता. त्या वाल्मिकी कराडचा वाल्या झाला आहे. त्यामुळे त्याला वाल्या म्हणा.
दरम्यान, या शेअर चॅटनंतर जितेंद्र आव्हाड यांनी रुपाली पाटील यांना जोरदार टोला लगावला आहे. ते म्हणाले, रुपाली ताई चांगल्या वकील आहेत. त्यांना इतके माहीत नाही की चॅट शेअर करणे गुन्हा आहे. त्यामुळे त्यांच्या वकिली व्यवसायावर परिणाम होणार आहे. त्यांचे क्लॉयंट काय म्हणतील…, असे आव्हाड यांनी म्हटले आहे.
माझे ३.०७ ला भाषण संपले ३,.२६ ला हा चॅट आला. वैफल्यग्रस्त झालेले अस्वस्थ असलेले समर्थक काय करतात, त्याची उत्तम निशानी आहे. मग कसे म्हणता की धनंजय मुंडे यांच्या मागे आम्हाला काही नाही करायचे.आखी टीम कामाला लागली आहे, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.