राष्ट्रवादी फोडणार नाही, शिवसेना वाढवणार : सचिन अहिर

राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘मातोश्री’वर शिवसेनेत प्रवेश केला.  यावेळी त्यांनी आपण राष्ट्रवादी फोडण्याचं काम करणार नाही, पण शिवसेना वाढवण्याचं काम नक्की करु, असंही सुचक वक्तव्य केलं.

राष्ट्रवादी फोडणार नाही, शिवसेना वाढवणार : सचिन अहिर
Follow us
| Updated on: Jul 25, 2019 | 12:47 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) मुंबईतून मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘मातोश्री’वर शिवसेनेत प्रवेश केला.  यावेळी त्यांनी आपण राष्ट्रवादी फोडण्याचं काम करणार नाही, पण शिवसेना वाढवण्याचं काम नक्की करु, असंही सुचक वक्तव्य केलं.

सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशावेळी सचिन अहिर यांचे समर्थक आणि शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सचिन अहिर म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे यांनी जे स्वप्न पाहिलं ते शहरांच्या विकासाचं स्वप्न पुढे नेण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी प्रामाणिकपणे केलं आहे. महाराष्ट्रात शहरांची संख्या वाढत असून त्यामुळे नागरिकांचे प्रश्न देखील वाढत आहेत. ते प्रश्न सोडवण्यासाठी आदित्य ठाकरेंकडे एक स्वप्न आहे. त्या स्वप्नात मी त्यांची साथ देईल. आदित्या ठाकरेंकडे राजकारणाचं स्पिरिट आहे. मी त्यांच्यावर याआधी टीका केली होती, मात्र त्यांनी खिलाडूवृत्ती दाखवली. ते त्यांच्या विचारातून महाराष्ट्राच्या संस्कृतीचं जतन करत आहेत.”

उद्धव ठाकरेंचे आशिर्वाद माझ्यासोबत असल्याचं म्हणत अहिर यांनी उद्धव ठाकरेंना कोणताही पक्ष फोडायचा नसून शिवसेना वाढवायची असल्याचंही सांगितलं. होतं. तसेच त्याच विचाराने माझे सर्व कार्यकर्ते मोठ्या जिद्दीने आणि जोमाने काम करतील. राज्यभरातील माझे कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेशास उत्सुक आहेत. त्यांच्यासाठी वेगळा कार्यक्रम घेऊ, असंही नमूद केलं.

यावेळी आदित्य ठाकरे यांनीही आपली भूमिका मांडली. आदित्य ठाकरे म्हणाले, “काही दिवसांपासून सचिन अहिर यांच्याशी चर्चा सुरु होती. त्यावेळी महाराष्ट्रात काम करायचं असेल तर सोबत काम करावे लागेल हे लक्षात आलं. त्यानंतर सचिन अहिर यांनी शिवसेनेत काम करण्याची इच्छा व्यक्ती केली आणि मग मी त्यांची उद्धव ठाकरे यांच्याशी भेट करुन दिली. त्या भेटीनंतर त्यांनी हा निर्णय घेतला. याचा शिवसेना मोठा फायदा होईल. शिवसेनेची आणि महाराष्ट्राची स्वप्नं त्यामुळे पूर्ण होतील.”

‘शरद पवार हृदयात, तर शरीरात उध्दव आणि आदित्य राहतील’

यावेळी अहिर यांनी आपण हा निर्णय शरद पवार यांना सांगितला नसल्याचंही नमूद केलं. ते म्हणाले, “मी गेल्या आठवड्यात शरद पवारांना भेटलो. त्यांना माझ्या मतदारसंघाची माहिती दिली. मात्र, हा निर्णय मी त्यांना सांगू शकलो नाही. शरद पवार माझ्या ह्रदयात आहेत, तर उद्धव आणि आदित्य माझ्या शरीरात राहतील. आम्ही राष्ट्रवादी तोडण्याचं काम करणार नाही, तर शिवसेना पक्ष वाढवण्याचं काम करु. माझे कार्यकर्ते मोठया जिद्दीने व जोमाने काम करतील आणि महाराष्ट्रात सत्तेत येतील.”

दरम्यान, सचिन अहिर म्हणाले, “आदरणीय पवारसाहेबांची (Sharad Pawar)साथ मिळाली. ती न सुटणारी साथ आहे. राजकारणात काही वेळी काही निर्णय घ्यावे लागतात. ते योग्य आहेत की नाही हे काळ ठरवतो. आदित्यसारख्या तरुणाशी माझी चर्चा झाली. वेगळ्या प्रकारचं विकासाचं काम करण्याचं काम त्याच्या मनात आहे. त्याची जिद्द आहे. अशावेळी राज्यभरातील अशा तरुणांना साथ देणं, उद्धव ठाकरे, बाळासाहेबांचं स्वप्न साकार करण्याची संधी माझ्यासारख्याला मिळत आहे. त्यामुळे निर्णय घेतला.”

‘मन जिंकायची आहेत, त्यात पहिलं मन जिंकलं’

उद्धव ठाकरे म्हणाले, “राजकारण हे राजकारण असतं. शिवसेना पक्ष फोडण्याचं काम करत नाही. आम्ही माणसाचं मन जोडण्याचं काम करतो. यातून आम्ही मराठी माणसाची आणि हिंदूंची ताकद वाढवत आहोत. राजकारण करताना मी नीतिमत्ता सोडणार नाही. नीतीमत्ता गहाण सोडून वागणार नाही. मात्र पक्ष वाढवण्यासाठी जे करावं लागेल तेच करेल. मन जिंकायची आहेत, त्यात पहिलं मन जिंकलं आहे. निवडणूक जिंकण्यासाठी जनतेसमोर जावं लागतं. जनतेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आदित्य फिरतो आहे. शिवसेना आणि भाजप दोन्ही यात्रा वेगळ्या वाटल्या, तरी युतीच्या विजयासाठी आहेत.”

सचिन अहिर कोण आहेत?

  • सचिन अहिर मुंबईतील राष्ट्रवादीचे मोठे नेते आहे.
  • 1999 मध्ये सचिन अहिर पहिल्यांदा आमदार झाले
  • मामा अरुण गवळी यांनी सचिन अहिर यांना शिवडी विधानसभा मतदारसंघातून निवडून आणलं.
  • काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या आघाडी सरकारमध्ये  2009 मध्ये सचिन अहिर गृहनिर्माण राज्यमंत्रीपदी विराजमान झाले.
  • त्यांच्याकडे वाहतूक आणि पर्यावरणासोबतच संसदीय कामकाजाचाही अतिरिक्त भार देण्यात आला होता.
  • 2014 च्या विधानसभा निवडणुकीत सचिन अहिर यांचा पराभव झाला.
  • शिवसेनेचे आमदार सुनिल शिंदे यांनी वरळी मतदारसंघात अहिर यांचा पराभव केला.
  • यानंतर सचिन अहिर यांना राष्ट्रवादीने मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती.
  • अहिर यांनी मुंबईतील गिरणी कामगारांच्या प्रश्नांवर राष्ट्रीय मिल मजदूर संघात काम केले आहे.
  • तसेच इंटक कामगार युनियनचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.