महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा लेटरबॉम्ब, सचिन वाझे याने फडणवीसांना पाठवलेलं पत्र Tv9च्या हाती

सचिन वाझे याने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवलं आहे. या पत्रात त्याने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच त्याने पत्रात शरद पवार, जयंत पाटील यांचादेखील उल्लेख केला आहे. सचिन वाझे याने फडणवीसांना पाठवलेलं पत्र 'टीव्ही 9 मराठी'च्या हाती लागलं आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा लेटरबॉम्ब, सचिन वाझे याने फडणवीसांना पाठवलेलं पत्र Tv9च्या हाती
Follow us
| Updated on: Aug 05, 2024 | 7:13 PM

आगामी विधानसभा निवडणुकीच्या आधी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यामध्ये वाकयुद्ध रंगलेलं असताना आता सचिन वाझे याने नवा लेटर बॉम्ब टाकला आहे. याआधी मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करत लेटरबॉम्ब टाकला होता. परमबीर सिंह यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि राज्याच्या तत्कालीन पोलीस महासंचालकांना पत्र लिहून अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी घोटाळ्याचा धक्कादायक आरोप केला होता. या लेटरबॉम्बनंतर आता निलंबित एपीआय सचिन वाझे याच्या लेटरबॉम्बची माहिती समोर आली आहे. सचिन वाझे हा सध्या जेलमध्ये आहे. त्याने जेलमधून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्याने अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

निलंबित एपीआय सचिन वाझे याने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेलं पत्र ‘टीव्ही 9 मराठी’च्या हाती लागलं आहे. सचिन वाझे याच्या पत्रात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माझ्यावर केलेले आरोप चुकीचे आहेत, असं सचिन वाझे पत्रात म्हणाला आहे.

सचिन वाझेने पत्रात नेमकं काय म्हटलं आहे?

  • जयंत पाटील यांनी अवैध कामे करुन घेतली. तर अनिल देशमुखांनी पैसे घेतले, असा आरोप सचिन वाझेने पत्रात केला आहे.
  • अनिल देशमुख यांनी माझ्यावर केलेले आरोप चुकीचे आहेत, असं सचिन वाझे पत्रात म्हणाला आहे.
  • अनिल देशमुखांनी गृहमंत्री असताना पीए मार्फत पैसे घेतले, असा आरोप सचिन वाझेने केला आहे.
  • ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय देशमुख यांच्या बदलीसाठी 25 लाख घेतले, असा आरोप वाझेने केला आहे.
  • अनिल देशमुख यांनी सुखदा निवासस्थानी 25 लाख घेतले, असा आरोप सचिन वाझे याने केला आहे.
  • माझ्यावर अनिल देशमुख यांचा दबाव होता. त्या दबावाखाली मी अनेक कामं केली, असा दावा सचिन वाझे याने केला आहे.
  • सचिन वाझे याच्या पत्रात अनिल देशमुख, शरद पवार आणि जयंत पाटील यांचा उल्लेख करण्यात आला आहे.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'.
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?.
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक.
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!.
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?.
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.