रश्मी ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना अडीच वर्ष कोंडून ठेवलं; बड्या नेत्याचा मोठा आरोप

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. अनेक नेते एकमेकांवर आरोपप्रत्यारोप करत आहेत. आता आरोपप्रत्यारोपाची पातळी ही कुटुंबापर्यंत येऊन ठेपली आहे. शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी थेट रश्मी ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. रश्मी ठाकरे भोळ्या दिसतात, पण त्या कपटी आहेत, अशी टीका सदा सरवणकर यांनी केली आहे.

रश्मी ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना अडीच वर्ष कोंडून ठेवलं; बड्या नेत्याचा मोठा आरोप
rashmi thackerayImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 21, 2024 | 7:07 PM

राज्यात निवडणूक प्रचाराची प्रचंड रणधुमाळी सुरू आहे. रणरणत्या उन्हातही सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचं रान उठवून दिलं आहे. आरोपप्रत्यारोपाचे बॉम्ब फोडले जात आहेत. गौप्यस्फोट होत आहेत. गोपनीय चर्चा उघड केल्या जात आहेत. तसेच खालच्या पातळीवर जाऊन टीकाही केली जात आहे. उमेदवारच नव्हे तर पक्ष, पक्ष नेते आणि त्यांच्या कुटुंबीयांवरही टीका केली जात आहे. शिंदे गटाचे नेते, आमदार सदा सरवणकर यांनीही उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. दिसतात भोळ्या, पण त्या अतिशय कपटी आहेत, अशी घणाघाती टीका सदा सरवणकर यांनी केली आहे.

आमदार सदा सरवणकर यांनी मतदारांशी संवाद साधताना हे विधान केलं आहे. त्यांचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अतिशय विचित्र व्यक्तीमत्त्व, दिसतंय भोळं पण अतिशय कपटी. मुलाला पुढे आणण्यासाठी मातोश्रीने केलेला हा अट्टाहास. उद्धव ठाकरेंना घरात कोंडू ठेवलं होतं. नवऱ्याला घरात कोंडू ठेवायचं आणि मुलाला पुढे आणायचं. त्यानंतर त्याला मुख्यमंत्री बनवायचं हे त्यामागचं आईचं कारण होतं. मुलाला मुख्यमंत्री बनवण्याचं आईचं प्लान होतं, असं सदा सरवणकर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

ठाकरे-फडणवीस यांच्यात जुंपली

दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून आदित्य ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदावरून जोरदार शाब्दिक चकमकी सुरू आहेत. उद्धव ठाकरे यांनी एका वृत्तपत्राला मुलाखत दिली होती. त्यात देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंना मी तयार करतो. आदित्य तयार झाल्यावर त्याला मुख्यमंत्री करतो आणि मी केंद्रात जाऊन अर्थमंत्री होतो, असं म्हटलं होता, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला होता. उद्धव ठाकरे यांच्या या दाव्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर जोरदार टीका केली होती. मी असलं कोणतंच आश्वासन दिलं नव्हतं. आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करायला वेड लागलं का? उद्धव ठाकरे भ्रमिष्ट झाले आहेत. त्यांनी अमित शाह यांच्यासोबत चर्चा झाली होती की माझ्याशी हे एकदा ठरवावं, असा पलटवार देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यानंतर सदा सरवणकर यांनी आणखी एक बॉम्ब फोडून खळबळ उडवून दिली आहे.

काय घडलं?

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत युती करून राज्यात सत्ता स्थापन केली होती. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले होते. तर आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री झाले होते. त्यामुळे ठाकरे गटात नाराजी होती. सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली नसल्याने पक्षात खदखद होतीच. शिवाय काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाणं शिवसेनेच्या आमदारांना पटलेलं नव्हतं. त्यामुळे अखेर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात 40 आमदारांनी बंड केलं होतं. नंतर या गटाने भाजपसोबत युती करून राज्यात सत्ता स्थापन केली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यानंतरही 2019च्या निवडणुकीत झालेल्या चर्चांवर अजूनही चर्चा होताना दिसत आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.