सदाभाऊ खोत बारामती न्यायालयात साक्षीसाठी हजर, राजू शेट्टींच्या ‘टायमिंग’ने भेट टळली!
माजी मंत्री सदाभाऊ खोत बारामती न्यायालयात साक्षीसाठी हजर झाले आहेत. | Sadabhau Khot In baramati Court While Raju Shetty will appear in afternoon
बारामती : माजी मंत्री सदाभाऊ खोत बारामती न्यायालयात साक्षीसाठी हजर झाले आहेत. आज सकाळीच साडे अकरा वाजता त्यांनी बारामती न्यायालयात साक्ष देण्यासाठी हजेरी लावली. मात्र राजू शेट्टींच्या टायमिंगने एकेकाळच्या कट्टर मित्रांची भेट टळली आहे. (Sadabhau Khot In baramati Court While Raju Shetty will appear in afternoon)
बारामतीत आंदोलनादरम्यान गुन्हे
खासदार राजू शेट्टी यांनी 2012 साली ऊसदरासाठी पंढरपूर ते बारामती पदयात्रा काढली होती. त्यावेळी बारामतीतच ठिय्या मांडत त्यांनी उपोषणाला सुरुवात केली होती. या आंदोलनात राजू शेट्टी यांच्यासह सदाभाऊ खोत आणि अन्य विविध नेत्यांनी सहभाग घेतला होता. बारामतीच्या शारदा प्रांगणात हे ऐतिहासिक आंदोलन झालं होतं. या आंदोलन काळात राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांच्यासह अनेक आंदोलकांवर भडकाऊ भाषण करणे, शासकीय मालमत्तेचं नुकसान करणे अशा विविध कलमांखाली गुन्हे दाखल होते.
आज या आंदोलनातील सर्वच आरोपींना हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले होते. त्यामध्ये राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांचाही समावेश आहे. सदाभाऊ खोत हे आज न्यायालयात हजर झालेत. तर माजी खासदार राजू शेट्टी हे दुपारनंतर न्यायालयात हजर राहण्याची शक्यता आहे..
जुन्या सहकाऱ्यांची भेट टळली.
बारामतीत 2012 साली झालेल्या आंदोलनावेळी राजू शेट्टी, सदाभाऊ खोत हे एकत्र होते. पवारांच्या बारामतीत झालेल्या या आंदोलनानं राज्यभरात ऊसदराचं राजकारण पेटलं होतं. विशेष म्हणजे या आंदोलनाला पाठिंबा म्हणून गावोगावी आंदोलनही झाली होती. आज या आंदोलनप्रकरणी न्यायालयाने समन्स बजावल्यानंतर सदाभाऊ आणि राजू शेट्टी हे एकाच वेळी हजर राहणं अपेक्षित होतं. परंतु सदाभाऊ सकाळी हजर झाले तर राजू शेट्टी दुपारनंतर न्यायालयात येणार असल्यानं या जुन्या जोडीची भेट सध्या तरी टळलीय, असंच म्हणावी लागेल.
(Sadabhau Khot In baramati Court While Raju Shetty will appear in afternoon)
हे ही वाचा :
यवतमाळमध्ये पोलिओऐवजी 12 चिमुकल्यांना सॅनिटायजर्स पाजलं, आरोग्यमंत्री टोपेंची कडक कारवाई
चिठ्ठी घेऊन येणाऱ्याला 25 हजार द्या, कळंबा जेल शिपायाच्या सॉक्समध्ये दोन चिठ्ठ्या