Sadabhau Khot : राष्ट्रवादीनं कसं लुटावं? यासाठी विद्यापीठ खोलावं, जगभरातून लोक येतील, सदाभाऊ खोत यांचा टोला
हे नामधारी आहेत सरकार बारामतीवाल्यांचे आहे, अशी खोचक टीका केली आहे. तसेच राष्ट्रवादीने कसं लुटावं याचं एक विद्यापीठ सुरू करावं. राष्ट्रवादीने भ्रष्टवादी विद्यापीठ महाराष्ट्रात सुरू करावं, जगातले लोक इथे ऍडमिशन घेतील, असा टोला त्यांनी लगावला आहे.
सिंधुदुर्ग : गेल्या अनेक दिवसांपासून भाजपचे सहयोगी आणि रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) अवकाळीतल्या गारा बरसाव्या तसे राष्ट्रवादीवर बसरत आहे. कधी शरद पवार (Sharad Pawar), कधी अजित पवार (Ajit Pawar), तर कधी अमोर मिटकरी हे सादाभाऊ खोत यांचं ठरलेलं टार्गट आहे. आजही त्यांनी कोकणातून आक्रोश यात्रेला सुरूवात केली आहे. त्यावेळीही त्यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधण्याच्या एकही चान्स सोडला नाही. तसेच त्यांनी ठाकरे सरकारच्या कारभारावरूनही जोरदार टीका केली आहे. या राज्यात अनेक प्रश्न आहेत. बारा बलुतेदार,शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी आत्महत्या करत आहेत. त्यांना राज्य सरकारकडून जी मदत व्हायला हवी होती ती झाली नाही. म्हणून जागर शेतकऱ्यांचा आक्रोश महाराष्ट्राचा या अभियानाला सुरवात कोकणातून केली आहे. सोलापुरात 17 किंवा 21 मेला समारोप देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करणार आहे, अशी माहितीही यावेळी त्यांनी दिली.
राष्ट्रवादीने लुटीच्या प्रशिक्षणाचे विद्यापीठ खोलावे
तसेच हे सरकार मातोश्री वरून नाही तर सिल्व्हर ओक वरून चालतं. बाप मुख्यमंत्री आहे तर लेकरू पर्यटनमंत्री आहे. यांना कोकणाचा विकास का करता येत नाही. हे नामधारी आहेत सरकार बारामतीवाल्यांचे आहे, अशी खोचक टीका केली आहे. तसेच राष्ट्रवादीने कसं लुटावं याचं एक विद्यापीठ सुरू करावं. राष्ट्रवादीने भ्रष्टवादी विद्यापीठ महाराष्ट्रात सुरू करावं, जगातले लोक इथे ऍडमिशन घेतील, असा टोला त्यांनी लगावला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सदाभाऊ खोत आणि राष्ट्रवादी नेते यांच्यात शाब्दीक युद्ध सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांचा उल्लेख राष्ट्रवादीच्या तमाशाच्या फडातला नाच्या असा केला आहोता. त्यावरूनही दोघांमध्ये बराच शाब्दिक वाद रंगला होता.
नौटंकी बंद करा नायतर जनता तुडवेल
तसेच शिवसेना नेत्या भावना गवळी यांना समन्स बजबला आहे त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वाव मार्गाने संपत्ती असलेल्यांनी चौकशीला सामोरे जावं. कर नाही त्याला डर कसला. यांना आभाळावर,चंद्रावर जाता येत नाही म्हणून बरं आहे, नाहीतर तिथल्याही जमिनी यांनी लाटल्या असत्या. वाव मार्गाने संपत्ती आल्याचे सिद्ध झाल्यास त्या व्यक्तीला चौकात फटके दिले पाहिजेत, अशी सडकून टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे. राज ठाकरेंच्या सभेवरून बोलताना, सरकारलाच हे वाद वाढवायचे आहेत.त्याचे कारण सरकारला आपलं अपयश झाकता येत नाही. तुमच्या सभेला लाखोंची गर्दी चालते आणि दुसऱ्यांच्या सभेला 15 हजारांची गर्दी. सभेला जाणारे लोक आपल्या खर्चाने जाणार आहेत. ही नौटंकी सरकारने आता बंद करावी नाहीतर जनता पायाखाली तुडवेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.