‘महाराष्ट्राच्या खलनायकाला लोकांनी…’, सदाभाऊ खोत यांचा शरद पवारांवर निशाणा

रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष तथा भाजप आमदार सदाभाऊ खोत यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर शरद पवार यांच्यावर खोचक टीका केली आहे. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केलं आहे. खोत यांनी ईव्हीएमबाबतच्या बाबा आढाव यांच्या आंदोलनावरही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

'महाराष्ट्राच्या खलनायकाला लोकांनी...', सदाभाऊ खोत यांचा शरद पवारांवर निशाणा
सदाभाऊ खोत यांचा शरद पवारांवर निशाणा
Follow us
| Updated on: Nov 28, 2024 | 5:45 PM

रयत क्रांती संघटनेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. “मराठा समाजाला सर्वात जास्त कोणी दिले असेल तर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिलं असेल. मराठा समाजासाठी जे जे करता येईल ते देवेंद्र फडणवीस यांनी केलं. जशा कुत्र्याच्या छत्र्या पावसाळ्यात येतात तशा छत्र्या आंदोलनाच्या येतील. महाराष्ट्राचा खलनायकाला लोकांनी घरात बसवलं आहे”, अशी खोचक शब्दांत सदाभाऊ खोत यांनी नाव न घेता शरद पवार यांच्यावर टीका केली. सदाभाऊ खोत यांनी याआधीदेखील शरद पवारांवर जहरी टीका केली आहे. “देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे नेते आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे. महाराष्ट्रातल्या राजकारणातला चाणक्य देवेंद्र फडणीस आहेत. त्यांना केंद्रातील नेत्यांचा आशीर्वाद आहे, पाठिंबा आहे. प्रस्थापितांच्या बुडाला जाळ लावण्याचे काम देवा भाऊ यांनी केलं”, अशा शब्दांत सदाभाऊ खोत यांनी फडणवीसांचं कौतुक केलं.

सदाभाऊ खोत यांची नाना पटोले यांच्यावर टीका

सदाभाऊ खोत यांनी यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावरही उत्तर देताना टीका केली. “तंत्रज्ञान यायची सुरुवात झाली ती राजीव गांधी यांच्या काळामध्ये. ईव्हीएम हे सुद्धा काँग्रेसने आणलं होतं. तंत्रज्ञानाला विरोध करतात. तुम्हाला पुढची पिढी अडाणी ठेवायची आहे का? तुम्ही जिंकला की तुम्हाला चांगलं वाटतं आणि हरला की तुम्ही ईव्हीएमला दोष देतात. ये मशीनला बोलता येत नाही, चालता येत नाही म्हणून तुम्ही त्याला दोष देतात. महाविकास आघाडी ही सरदारांची आघाडी, जे सर्व्हे केलेत ते रस्त्यावरती लोकांचे सर्व्हे केले. मात्र घरातल्या माय माऊलींचा सर्व्हे केला नाही. कारण ते घरात जेवत नाहीत, बाहेर जेवतात”, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी नाना पटोले यांच्यावर केली.

सदाभाऊ खोत यांना मंत्रीपद मिळणार?

सदाभाऊ खोत यांना यावेळी मंत्रीपद मिळणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. “सरकार आलं याचा मला आनंद आहे. ग्रामीण भागातील लोकांना ताकद देण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी केलं. देवेंद्र फडणीस यांच्या पायाजवळ जरी जागा मिळाली तरी ते आमचं भाग्य असेल”, असं सदाभाऊ खोत म्हणाले.

सदाभाऊ खोत बाबा आढाव यांच्या आंदोलनावर काय म्हणाले?

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन सुरु केलं आहे. ते 95 वर्षांचे आहेत. त्यांनी तीन दिवसीय उपोषणाला सुरुवात केली आहे. या आंदोलनावरही सदाभाऊ खोत यांनी प्रतिक्रिया दिली. “बाबा आढाव यांनी या वयात आंदोलन करणे योग्य नाही आणि ते आंदोलन कोणासाठी करत आहेत, ज्यांनी महाराष्ट्र लुटला, देशाची राख रांगोळी यांनी केली, त्यांनी साधा मला पिण्याचे पाणी दिलं नाही, शेतीसाठी पाणी दिलं नाही, त्यांच्यासाठी त्यांनी आंदोलन करू नये. 60 वर्षे यांची सत्ता होती”, अशी प्रतिक्रिया सदाभाऊ खोत यांनी दिली.

'जिसका EVM उसकी...', संजय राऊत यांचं सूचक ट्वीट, नेमकं काय म्हटलं?
'जिसका EVM उसकी...', संजय राऊत यांचं सूचक ट्वीट, नेमकं काय म्हटलं?.
'दादा मुख्यमंत्री झाले तर मी स्वतः त्यांचं अभिनंदन करेन' - रोहित पवार
'दादा मुख्यमंत्री झाले तर मी स्वतः त्यांचं अभिनंदन करेन' - रोहित पवार.
एक दिवस असा येईल की ठाकरे रात्री २..., शिवसेनेच्या नेत्याची भविष्यवाणी
एक दिवस असा येईल की ठाकरे रात्री २..., शिवसेनेच्या नेत्याची भविष्यवाणी.
दादा मुख्यमंत्री झाले तर चांगलं..भुजबळांचा CM म्हणून फडणवीसांना विरोध?
दादा मुख्यमंत्री झाले तर चांगलं..भुजबळांचा CM म्हणून फडणवीसांना विरोध?.
'...म्हणून फडणवीसांना टार्गेट केलं जातंय', भुजबळांचा जरांगेंवर निशाणा
'...म्हणून फडणवीसांना टार्गेट केलं जातंय', भुजबळांचा जरांगेंवर निशाणा.
'... तर राजकीय संन्यास घेईल', शहाजी बापू पाटील नेमकं काय म्हणाले?
'... तर राजकीय संन्यास घेईल', शहाजी बापू पाटील नेमकं काय म्हणाले?.
कडूंनी काढली राणा दाम्पत्यांची औकात; म्हणाले, मला पाडण्याची त्यांची...
कडूंनी काढली राणा दाम्पत्यांची औकात; म्हणाले, मला पाडण्याची त्यांची....
'..यापुढे त्यांनी बाळासाहेबांचं नाव घेऊ नये', राऊतांचा शिंदेंवर घणाघात
'..यापुढे त्यांनी बाळासाहेबांचं नाव घेऊ नये', राऊतांचा शिंदेंवर घणाघात.
मुंबईकरांनो काळजी घ्या, हवेची गुणवत्ता खालावली, बघा कितीवर पोहोचला AQI
मुंबईकरांनो काळजी घ्या, हवेची गुणवत्ता खालावली, बघा कितीवर पोहोचला AQI.
हे अत्यंत दुर्देवी.., दादांच्या मुलानं राष्ट्रवादीच्या आमदाराला सुनावल
हे अत्यंत दुर्देवी.., दादांच्या मुलानं राष्ट्रवादीच्या आमदाराला सुनावल.