प्राजक्त देशमुख यांच्या ‘देवबाभळी’ पुस्तकाला ‘साहित्य अकादमी युवा पुरस्कार’
नामवंत दिग्दर्शक व लेखक प्राजक्त देशमुख यांना साहित्य क्षेत्रात प्रतिष्ठेचा मानला जाणारा साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2020 जाहीर झाला आहे. त्यांच्या देवबाभळी या पुस्तकासाठी त्यांना हा सन्मान मिळाला आहे.
नाशिक : नामवंत दिग्दर्शक व लेखक प्राजक्त देशमुख यांना साहित्य क्षेत्रात प्रतिष्ठेचा मानला जाणारा साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2020 जाहीर झाला आहे. त्यांच्या देवबाभळी या पुस्तकासाठी त्यांना हा सन्मान मिळाला आहे. 50 हजार रुपये रोख रक्कम आणि ताम्रपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. त्रिसदस्यीय समितीने या पुरस्काराचे काम पाहिले होते. (Sahitya Akademi Youth award announced to Devbabhali book of Prajakt Deshmukh)
50 हजार रोख रक्कम,ताम्रपत्र असे पुरस्काराचे स्वरुप
मराठमोळे दिग्दर्शक आणि लेखक प्राजक्त देशमुख यांच्या देवबाभळी या दर्जेदार पुस्तकाची दखल घेण्यात आली आहे. त्यांच्या या पुस्तकाला साहित्य क्षेत्रात प्रतिष्ठेचा मानला जाणारा साहित्य अकादमी युवा पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्कारामुळे महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली आहे. 50 हजार रोख रक्कम तसेच ताम्रपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
सगळे श्रेय कुटुंबाचे
हा पुरस्कार 35 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या लेखकाला प्रदान करण्यात येतो. हा बहुमान मिळाल्यामुळे प्राजक्त देशमुख यांनी आनंद व्यक्त केला आहे. प्राजक्त देशमुख यांच्यासोबत बंगाली भाषेतील लेखक श्याम बंदोपाध्याय यांनादेखील हा पुरस्कार मिळाला आहे. पुराणपुराष या पुस्तकासाठी बंदोपाध्याय याना हा पुरस्कार दिला जातोय. हा पुरस्कार मिळाल्यानंतर या यशाचे श्रेय देशमुख यांनी त्यांची पत्नी, आई, वडील तसेच कुटुंबीयांना दिले आहे.
इतर बातम्या :
डिझेलवर चालणाऱ्या वाहनांचे उत्पादन कमी करा; नितीन गडकरींच्या कंपन्यांना सूचना