साई संस्थानचं विश्वस्त मंडळ अखेर जाहीर, अध्यक्षपदी आमदार आशुतोष काळेंची वर्णी

विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा आमदाराची वर्णी लागली आहे. अहमदनगरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे हे साईबाबा विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष असणार आहेत. तर उपाध्यक्षपती अॅड. जगदीश सावंत यांची निवड करण्यात आली आहे.

साई संस्थानचं विश्वस्त मंडळ अखेर जाहीर, अध्यक्षपदी आमदार आशुतोष काळेंची वर्णी
साई संस्थान विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी आमदार आशुतोष काळे
Follow us
| Updated on: Sep 16, 2021 | 10:56 PM

शिर्डी : साईबाबा संस्थानचं विश्वस्त मंडळ अखेर जाहीर करण्यात आलं आहे. विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा आमदाराची वर्णी लागली आहे. अहमदनगरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे हे साईबाबा विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष असणार आहेत. तर उपाध्यक्षपती अॅड. जगदीश सावंत यांची निवड करण्यात आली आहे. (Board of Trustees of Shirdi Saibaba Sansthan announced)

विश्वस्त मंडळात कोण-कोण?

1. आमदार आशुतोष अशोकराव काळे – अध्यक्ष 2. अॅड. जगदीश हरिश्चंद्र सावंत – उपाध्यक्ष 3. अनुराधा गोविंदराव अदिक – सदस्य 4. अॅड. सुहास जनार्दन अहेर – सदस्य 5. अविनाश अप्पासाहेब धनवटे – सदस्य 6. सचिन रंगराव गुजर – सदस्य 7. राहुल कनाल – सदस्य 8. सुरेश गोरक्षनाथ वाबळे – सदस्य 9. जयंतराव पुंडलिकराव जाधव – सदस्य 10. महेंद्र गणपतराव शेळके – सदस्य 11. एकनाथ भागचंद गोंदकर – सदस्य 12. सभापती, शिर्डी नगर पंचायत

कोण आहेत आशुतोष काळे?

35 वर्षीय आशुतोष काळे हे अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार आहेत. माजी आमदार अशोकराव काळे यांचे ते पुत्र, तर माजी खासदार शंकरराव काळे यांचे ते नातू. त्यांच्याकडे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्याही अध्यक्षपदाची धुरा आहे. आता त्यांची शिर्डी साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी लागली.

काँग्रेस-राष्ट्रवादीत रस्सीखेच

साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष कोण असणार यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीत गेल्या काही दिवसांपासून रस्सीखेच सुरु होती. मुंबईच्या सिद्धीविनायक ट्रस्टचं अध्यक्षपद शिवसेनेकडे गेल्याने शिर्डीच्या साईबाबा संस्थान अध्यक्षपदासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांमध्ये वाटाघाटी सुरु होत्या. अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सहा आमदार असल्यामुळे विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदावर राष्ट्रवादीने दावा केला होता.

शिर्डी साई संस्थान आणि वाद 

साईबाबांचे भाविक देशा-विदेशात पोहचले असताना भारतीय पोषाखातच साईमंदिरात यावे अशा फलकानं उपस्थित झालेला वाद, 25 हजार भरा आणि काकड आरती करा, दर्शनावरून शिर्डी ग्रामस्थ आणि बगाटे यांच्यात झालेला वाद अशा अनेक प्रसंगी शिर्डी संस्थान वादात सापडलंय. अशातच भाविकांप्रमाणेच पत्रकार कोरोना नियमांचं अवलंब करत वृतांकन करत असताना समितीने आगळीक केली होती.

पत्रकारांसाठी या समितीने जाचक नियमावली करण्याचा घाट घातला होता. उच्च न्यायालयाने नेमणूक केलेल्या समितीने पत्रकारांसाठी 11 कलमी नियमावली तयार केली. महत्वाचं म्हणजे त्याचा ठराव करत उच्च न्यायालयासमोर ठेवण्यात आला होता.

इतर बातम्या :

राहुल गांधींनी राऊतांना विचारलं, एका वाक्यात शिवसेना काय ते सांगा? आणि राऊतांनी थेट उत्तर दिलं

आमदार रोहित पवारांच्या ‘स्वराज्य ध्वज’ यात्रेचा रथ गडचिरोली जिल्ह्यातून रवाना

Board of Trustees of Shirdi Saibaba Sansthan announced

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.