आधी 500 कोटी, आता 121 कोटी, साई संस्थान पुन्हा सरकारवर मेहरबान
शिर्डी : शिर्डीतील श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट पुन्हा एकदा राज्य सरकारवर मेहरबान झाल्याचे समोर आले आहे. राज्याच्या तिजोरीत खडखडाट असताना, साई संस्थान मदतीला धावले आहे. आधी 500 कोटींचं बिनव्याजी कर्ज दिल्यानंतर, आता अवघ्या काही दिवसातच साई संस्थानने पुन्हा सरकारच्या मदतीला धावून गेले असून, यावेळी तब्बल 121 कोटी रुपयांची मदत केली आहे. साई संस्थानने यावेळी राज्य […]
शिर्डी : शिर्डीतील श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट पुन्हा एकदा राज्य सरकारवर मेहरबान झाल्याचे समोर आले आहे. राज्याच्या तिजोरीत खडखडाट असताना, साई संस्थान मदतीला धावले आहे. आधी 500 कोटींचं बिनव्याजी कर्ज दिल्यानंतर, आता अवघ्या काही दिवसातच साई संस्थानने पुन्हा सरकारच्या मदतीला धावून गेले असून, यावेळी तब्बल 121 कोटी रुपयांची मदत केली आहे.
साई संस्थानने यावेळी राज्य सरकारच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 50 कोटी रुपयांची मदत, तर सरकारच्या हॉस्पिटलसाठी 71 कोटी रुपयांची मदत दिली आहे. म्हणजेच, एकूण 121 कोटींची यावेळी साई संस्थानकडून देण्यात आली. गेल्याच आठवड्यात साई संस्थानने राज्य सरकारला 500 कोटींचं बिनव्याजी कर्ज दिले होते. त्यामुळे दोन आठवड्यात साई संस्थाने एकूण 621 कोटींची मदत राज्य सरकारला केली आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून गरीब-गरजूंना गंभीर आजारांवेळी मदत केली जाते. या निधीतून एका रुग्णाला 3 लाखांपर्यंतची मदत दिली जाते. गेल्या चार वर्षात मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 477 कोटींची मदत रुग्णांना देण्यात आली. तब्बल 48 हजार 489 रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून केली गेली.
राज्या, देशासह जगभरात साईबाबांचे भक्त आहेत. हे साईभक्त रोज शेकडोंच्या संख्येने शिर्डीत साईबाबांच्या दर्शनसाठी येत असतात. त्यावेळी आपल्या मनाने अगदी फुलाच्या पाकळीपासून ते कोट्यवधींच्या वस्तूंपर्यंत दान करत असतात. यातूनच साई संस्थान विविध सामाजिक उपक्रम राबवत असतो. शिवाय, गरजूंना मदतही करत असतो.
देशातील महत्वाची मंदिरं आणि त्यांच वार्षिक उत्पन्न :
- तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर : वार्षिक उत्पन्न – 10 ते 12 कोटी रुपये
- पद्मनाभस्वामी मंदिर केरळ वार्षिक उत्पन्न 20 अब्ज रुपये
- तिरुमला वेंकटेश्वर मंदिर, तिरुमला : वार्षिक उत्पन्न 650 कोटी रुपये
- वैष्णो देवी मंदिर कटरा, जम्मू आणि काश्मीर : वार्षिक उत्पन्न 500 कोटी रुपये
- सिद्धिविनायक मंदिर मुंबई : वार्षिक उत्पन्न 125 कोटी रुपये