रत्नागिरीत वक्फ बोर्डाच्या कार्यालयाच्या उद्घाटनावेळी गोंधळ, आंदोलकांनी मंत्री उदय सामंत यांना दाखवले काळे झेंडे

रत्नागिरीत आज वक्फ बोर्डाच्या कार्यालयाच्या उद्घाटनावेळी मोठा वाद झालेला बघायला मिळाला. मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते वक्फ बोर्डाच्या कार्यालयाचं उद्घाटन आयोजित करण्यात आलेलं. पण यावेळी हिंदुत्ववादी संघटनाचे कार्यकर्ते तिथे जमले. त्यांनी उदय सामंत यांना काळे झेंडे दाखवत जोरदार घोषणाबाजी केली.

रत्नागिरीत वक्फ बोर्डाच्या कार्यालयाच्या उद्घाटनावेळी गोंधळ, आंदोलकांनी मंत्री उदय सामंत यांना दाखवले काळे झेंडे
रत्नागिरीत वक्फ बोर्डाच्या कार्यालयाच्या उद्घाटनावेळी गोंधळ, आंदोलकांनी मंत्री उदय सामंत यांना दाखवले काळे झेंडे
Follow us
| Updated on: Oct 07, 2024 | 4:42 PM

रत्नागिरीत वक्फ बोर्डाच्या कार्यालयाच्या उद्घाटनावेळी आज मोठा राडा झालेला बघायला मिळाला. सकल हिंदू समाज आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री उदय सामंत यांना काळे झेंडे दाखवले. रत्नागिरी वक्फ बोर्ड कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाला सकल हिंदू समाजाचा आणि भाजपचा तीव्र विरोध होता. त्यामुळे पोलिसांच्या चोख बंदोबस्तात वक्फ बोर्डाच्या कार्यालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. पण वक्फ बोर्डाच्या कार्यालयाच्या बाहेर उद्घाटनासाठी जाणाऱ्या पालकमंत्री उदय सामंत यांना आंदोलकांनी काळे झेंडे दाखवले. यामुळे पोलीसही सतर्क झाले. पोलिसांनी आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते कार्यालयाच्या बाहेर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उदय सामंत यांना आंदोलकांची गर्दी बघून कार्यक्रम उरकावा लागला. उदय सामंत कार्यालयाच्या उद्घाटनानंतर बाहेर आले, त्यावेळी देखील आंदोलकांनी त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

नेमकं काय घडलं?

रत्नागिरीत वक्फ बोर्डाच्या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या वेळी रत्नागिरीत मोठा गोंधळ बघायला मिळला. मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते वक्फ बोर्डाच्या कार्यालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला. पण भाजप आणि सकल हिंदू समाजाचा या कार्यक्रमास विरोध आहे. त्यामुळे सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी हातात काळे झेंडे दाखवून या विरोधात निदर्शने दिली. यावेळी आंदोलकांनी मंत्री उदय सामंत यांनादेखील काळे झेंडे दाखवले. उदय सामंत आले त्यावेळेला सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी केली. वक्फ बोर्डाचं कार्यालय रद्द करावं, अशी मागणी त्यांनी केली.

सकल हिंदू समाजाची भूमिका काय?

सकल हिंदू समाजाच्या आंदोलकांनी यावेळी प्रतिक्रिया दिली. “आमचं एकच म्हणणं आहे की, वक्फ बोर्डाने भारत मातेचं आणि हिंदू समाजाच्या जमिनी आजपर्यंत ताब्यात घेतल्या आहेत. हे वक्फ बोर्ड विधेयक 8 मार्च 2024 ला प्रलंबित असताना देखील रत्नागिरी सारख्या सुसंस्कृत शहरामध्ये वक्फ बोर्डाचं कार्यालय आणणं त्यामुळे हिंदू समाजाचा त्यास जाहीर निषेध आहे. आम्हाला प्रशासनाने आंदोलनाचा अधिकारही दिला आहे”, अशी प्रतिक्रिया आंदोलकांनी दिली.

'तेवढ्याच उंचीवरून उडी मारून दाखवावी', राज ठाकरेंना झिरवळांचं चॅलेंज
'तेवढ्याच उंचीवरून उडी मारून दाखवावी', राज ठाकरेंना झिरवळांचं चॅलेंज.
'काँग्रेस उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होऊ देणार नाही तर...'
'काँग्रेस उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होऊ देणार नाही तर...'.
'तुम्ही फक्त खोटे छत्रपती होऊ शकतात', कोल्हेंच्या टीकेवर कोणाचा पलटवार
'तुम्ही फक्त खोटे छत्रपती होऊ शकतात', कोल्हेंच्या टीकेवर कोणाचा पलटवार.
नवजात बालकं आणि अर्भकांचा हृदयरोग : एक गंभीर सार्वजनिक आरोग्य समस्या
नवजात बालकं आणि अर्भकांचा हृदयरोग : एक गंभीर सार्वजनिक आरोग्य समस्या.
रामराजे निंबाळकर तुतारी हाती घेणार? शरद पवार यांनी काय दिले संकेत?
रामराजे निंबाळकर तुतारी हाती घेणार? शरद पवार यांनी काय दिले संकेत?.
सूरज चव्हाणची tv9 मराठीशी खास बातचित; लग्नाचा प्लान अन् कशी हवी मुलगी?
सूरज चव्हाणची tv9 मराठीशी खास बातचित; लग्नाचा प्लान अन् कशी हवी मुलगी?.
भरधाव वेगाने हा उंदीरमामा पालकमंत्री झाला, उत्तम जानकरांचा रोख कोणावर?
भरधाव वेगाने हा उंदीरमामा पालकमंत्री झाला, उत्तम जानकरांचा रोख कोणावर?.
ठाकरे सेनेला धक्का, किरण सामंत यांना तिकीट मिळणार? उदय सामंत म्हणाले..
ठाकरे सेनेला धक्का, किरण सामंत यांना तिकीट मिळणार? उदय सामंत म्हणाले...
साहित्यिकांमधील धमक कमी झालीय; राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
साहित्यिकांमधील धमक कमी झालीय; राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?.
बुजुर्ग म्हणावं तेच त्यांच्या नादी... राज ठाकरेंचा शरद पवारांवर निशाणा
बुजुर्ग म्हणावं तेच त्यांच्या नादी... राज ठाकरेंचा शरद पवारांवर निशाणा.