महाविकास आघाडीच्या सभेपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून राष्ट्रवादीला धक्का
संभाजीनगरमध्ये होणाऱ्या महाविकास आघाडीच्या सभेची तयारी पूर्ण झाली आहे. या सभेसाठी संपूर्ण मराठवाड्यातून लोक येणार आहेत. दुपारपासूनच मैदानात लोकांनी जमण्यास सुरुवात झाली असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीला धक्का दिला आहे.
संतोष जाधव, धारशिव : महाविकास आघाडीच्या संभाजीनगर येथे होणाऱ्या जाहीर सभेला अवघे काही तास उरले आहेत. या सभेची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे. महाविकास आघाडीची प्रथमच एकत्र सभा असल्याने भव्य सभा मंडप तयार केले आहे. मराठावाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानात हजारो खुर्च्या टाकण्यात आल्या आहेत. सभेच्या ठिकाणीच 16 सीसीटीव्ही कॅमेरे तैनात करण्यात आले आहेत. सभेसाठी संपूर्ण मराठवाड्यातून लोक येणार आहे. दुपारपासूनच मैदानात लोकांनी जमण्यास सुरुवात झाली असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीला धक्का दिला आहे.
नेमके काय झाले
आरोग्यमंत्री डॉ तानाजी सावंत यांनी धाराशिव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. महाविकास आघाडीच्या सभेपूर्वी अनेक पदाधिकारी राष्ट्रवादी सोडणार आहे. हे सर्व जण शिवसेना पक्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहेत. धाराशिव जिल्ह्यात कळंब तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. 3 माजी नगराध्यक्ष, 6 माजी उपनगराध्यक्ष, 2 माजी नगरसेवक यांच्यासह जवळपास 25-30 पदाधिकारी शिवसेनेत जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हे सर्व शिवसेनेत जाणार आहे. ठाणे येथे हा प्रवेश सोहळा होणार आहे.
बघावं तिथे झेंडे
महाविकास आघाडीची ही पहिलीच संयुक्त सभा होत आहे. त्यामुळे संपूर्ण मराठवाड्यातील वातावरणात सभेचा फिवर तयार केला गेला आहे. संपूर्ण संभाजीनगरात तिन्ही पक्षाचे झेंडे लावण्यात आले आहेत. तसेच चौकाचौकात पोस्टर, बॅनर्स आणि होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. या शिवाय सभेची दवंडी दिली जात आहे. लोकांना सभेला येण्याचं आवतन दिलं जात आहे. सभेच्या माध्यमातून शिंदे सरकारचा पर्दाफाश होणार असल्याचं दवंडी देणारा सांगत आहे. परंतु त्यापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीला धक्का दिला आहे.
संध्याकाळी सहा वाजता सभा
संध्याकाळी 6 वाजल्यापासून या सभेला सुरुवात होणार आहे. सभेला महाविकास आघडीतील डझनभर बडे नेते राहणार उपस्थित राहणार आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार धनंजय मुंडे, अमित देशमुख, सुभाष देसाई, अनिल परब, सुनील प्रभू, राजेश टोपे आदी नेते या सभेला उपस्थित राहणार आहेत.
उद्धव ठाकरे यांचा आजचा दौरा
आज दुपारी 3.15 वाजता खाजगी विमानाने कलीना येथून छत्रपती संभाजी नगरच्या दिशेने रवाना
दुपारी 4.15 वाजता छत्रपती संभाजी नगर विमानतळ येथे आगमन
सायंकाळी 6.45 वाजता मराठवाडा सांस्कृतिक मंडळ ग्राउंडच्या दिशेने रवाना
सायंकाळी 7 वाजता मराठवाडा सांस्कृतिक मंडळ ग्राउंड येथे आगमन
रात्री 9 वाजता संभाजी नगर विमान तळाच्या दिशेने रवाना
रात्री 9.15 वाजता मुंबई च्या दिशेने रवाना