आंबा प्रकरण : संभाजी भिडेंना नाशिक कोर्टाकडून जामीन

नाशिक : श्री शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांना वादग्रस्त वक्तव्याच्या प्रकरणात कोर्टाने जामीन दिला आहे. नाशिक कोर्टात आज संभाजी भिडे हजर झाले होते. त्यांना 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर नाशिक कोर्टाने जामीन दिला. माझ्या बागेतील आंबे खाल्ल्याने अपत्यप्राप्ती होते, असा अजब दावा संभाजी भिडे यांनी केला होता. त्याप्रकरणी त्यांच्याविरोधात नाशिक कोर्टात खटला सुरु होता. संभाजी […]

आंबा प्रकरण : संभाजी भिडेंना नाशिक कोर्टाकडून जामीन
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:52 PM

नाशिक : श्री शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांना वादग्रस्त वक्तव्याच्या प्रकरणात कोर्टाने जामीन दिला आहे. नाशिक कोर्टात आज संभाजी भिडे हजर झाले होते. त्यांना 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर नाशिक कोर्टाने जामीन दिला. माझ्या बागेतील आंबे खाल्ल्याने अपत्यप्राप्ती होते, असा अजब दावा संभाजी भिडे यांनी केला होता. त्याप्रकरणी त्यांच्याविरोधात नाशिक कोर्टात खटला सुरु होता.

संभाजी भिडे हे कोर्टात हजेरीसाठी येणार असल्याने कोर्टाच्या परिसरात नाशिक पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त केला गेला होता. संभाजी भिडे यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना भेटण्यासाठी कोर्टाच्या परिसरात मोठी गर्दी केली होती.

प्रकरण काय आहे?

नाशिकमध्ये जून महिन्यात एक सभा झाली. त्या सभेत श्री शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांचं भाषण झालं. या भाषणात संभाजी भिडे यांनी अत्यंत अजब दावा केला. या दाव्यानंतर सर्वच स्तरातून त्यांची खिल्ली उडवण्यात आली. अंधश्रद्धा पसरवत असल्याचाही त्यांच्यावर आरोप झाला. त्यानंतर त्यांच्यावर तक्रार दाखल करण्यात आली. त्या तक्रारीवरच आज नाशिकच्या कोर्टात सुनावणी होणार आहे.

संभाजी भिडेंनी काय दावा केला होता?

“भगवंताची कृपा आहे ही मला एक कोय मिळाली. त्या कोईचं रोपटं करुन आता त्याचं झाडं झालं. ते आंब्याचं झाड माझ्याकडे आहे. त्याची काय मजा आहे, ते सांगतो तुम्हाला. अहो, लग्न होऊन 8-8, 10-10, 12-12 वर्ष झालेल्यांना सुद्धा पोर होत नाही, अशा स्त्री-पुरुषांनी, पती पत्नींनी ती फळं खाल्ली, तर निश्चित पोर होईल. असं झाड आहे माझ्याकडे. रोज आंबे आणून, माझ्याही बागेत, शेतात ते लावले. मी आता तुम्हाला सोडलं तर माझ्या आईशिवाय कोणाला सांगितलं नाही, ते आंबे कसे आहेत. मी आतापर्यंत 180 पेक्षा जास्त जणांना, पती-पत्नींना, जोडप्यांना खायला दिलेत. ती पद्धत शिकवली, पथ्य सांगितलं आणि 150 पेक्षा जास्त जणांना मुलं झाली. ज्यांना मुलगा हवा असेल, त्यांना मुलगाच होईल. अपत्य नसेल तर होते. असा हा आंबा आहे. म्हणजे त्याचा अर्थ नपुंसकत्वावर तोडगा आणि वंध्यत्वावरचा ताकद देणारा तो आंबा आहे.”, असे संभाजी भिडे म्हणाले होते.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.