शिवाजी महाराज सर्वधर्मीय नव्हते, हिंदू धर्माच्या रक्षणासाठी होते…संभाजी भिडे यांचा दावा
Sambhaji Bhide On Shivaji Maharaj: शिवाजी महाराज सर्वधर्मीय नव्हते, शिवाजी महाराज हिंदू धर्माच्या रक्षणासाठी होते. शिवाजी महाराजांवर सर्वधर्म समभाव हे चिकटवले आहे, असे वक्तव्य शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केले.

Sambhaji Bhide On Shivaji Maharaj: इतिहासाचा अभ्यास कमी असणारे लोक छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत चुकीची माहिती देत आहे. शिवाजी महाराज या अलौकिक व्यक्तीचा राजकारणासाठी उपयोग करत आहेत. त्यांचा उपयोग राजकारणासाठी करुन घेण्याची हाव असलेले प्राध्यापक, व्याख्याते आणि शिक्षक हे भाडोत्री आहेत. स्वतः शहाजीराजे यांनीही हा देश हिंदुत्ववादी आणि हिंदूंचे राष्ट्र करायचे आहे, असे म्हटले होते. शिवाजी महाराज सर्वधर्मीय नव्हते, शिवाजी महाराज हिंदू धर्माच्या रक्षणासाठी होते. शिवाजी महाराजांवर सर्वधर्म समभाव हे चिकटवले आहे, असे वक्तव्य शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केले.
संभाजीराजे भोसले बोलतात ते 100 टक्के चूक
संभाजी भिडे म्हणाले, शिवाजी महाराजांचा उपयोग हे प्रत्येकजण स्वतःच्या स्वार्थासाठी कसा होईल, हे बघतोय त्यामुळे सगळा चौथा झाला आहे. रायगडवरील वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाला संभाजी भिडे गुरुजी यांनी समर्थन देत सांगितले की, संभाजीराजे भोसले बोलतात ते 100 टक्के चूक आहे. वाघ्या कुत्र्या बाबत आपण वाचलेली कथा सत्य आहे.
वाघ्या कुत्र्याने चितेत उडी घेतली हे सत्य आहे. त्यामुळे स्मारक करण्यात आले आहे. माणसे एकनिष्ठ नसतात, तेवढी कुत्री असतात. निदान आताच्या युगात देशाशी एकनिष्ठ राहायचे आहे, त्याचे प्रतिक म्हणून वाघ्या कुत्र्याचे स्मारक तिथे राहिले पाहिजे. स्वार्थासाठी कशीही मते बदलणाऱ्या माणसांना माझे मत पटणार नाही. पण त्यांना ही मते पटवण्याचा मी ध्यास घेतलेले नाही, असे भिडे गुरुजी यांनी सांगितले.




संभाजी भिडे गुरुजी ऑन वाघ्या कुत्रा
कुणाल कामरा प्रकरणावरून संभाजी भिडे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. कामरा याने नादान प्रकार चालवला आहे. त्यावरून विधानसभेत जो धुडगुस चाललाय ते लोकशाहीला शोभणारे नाही. आर. आर. पाटील यांनी डान्सबार बंदीच्या धाडसी निर्णय घेतला होता. आर. आर. आबांची हिमंत अलौकिक होती. कामरा नावाच्या पद्धतीचे हॉटेल चालवणे म्हणजे डान्सबारची सावत्र असणारी जुळी भावंडे आहे.