नाशिक: छगन भुजबळ (chhagan bhujbal) हे ज्येष्ठ नेते असून ओबीसींचे (obc) नेतृत्व करत आहेत. त्याबद्दल मला आनंद आहे. भुजबळ हे शाहू, फुले आणि आंबेडकरांचा विचार घेऊन समतेचा लढा लढत आहे. समता परिषदेच्या माध्यमातून त्यांची लढाई सुरू आहे. मी नुसता वंशज छत्रपती घराण्याचा वशंज आहे. त्याचा मला सार्थ अभिमान आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांच्या विचारावर माझी वाटचालही सुरू आहे. पण छगन भुजबळ हेच शाहू महाराज यांच्या विचाराचे खरे वारसदार आहेत, असे गौरवोद्गार खासदार छत्रपती संभाजी छत्रपती (Sambhaji Chhatrapati) यांनी काढले. ओबीसी, एसटी, एससी आणि मराठा समाजाला एकत्र नांदू शकतो यासाठी आमचा प्रमाणिक प्रयत्न सुरू आहे, असंही संभाजी छत्रपती यांनी सागितलं. खासदार संभाजी छत्रपती यांनी पत्रकार परिषद घेऊन भुजबळांचे कौतुक केले.
खासदार संभाजी छत्रपती हे आज नाशिकमध्ये होते. यावेळी त्यांनी छगन भुजबळ यांच्या घरी जावून त्यांची भेट घेतली. त्यानंतर या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. त्यानंतर या दोन्ही नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला. शाहू महाराजांचे आणि नाशिककरांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. शाहू महाराज नाशिकला आले होते. तेव्हा मराठा विद्या प्रसारक मंडळाला त्यांनी मदत केली होती. पिंपळगाव बसवंत येथे गणपतराव मोरेंना त्यांनी ताकद दिली होती. 6 मे रोजी शाहू महाराजांची स्मृती शताब्दी आहे. त्यानिमित्ताने शाहू महाराजांचे विचार जगभर पोहोचवण्यावर आमची चर्चा झाली. छत्रपती शिवाजी महाराज यांचं अठरापगड जातीचं राज्य होतं. शाहू महाराजांनीही हीच भूमिका पुढे नेली. तोच विचार आम्हाला पुढे न्यायचा आहे, असं संभाजी छत्रपती यांनी सांगितलं.
मागे एकदा संभाजी महाराज नाशिकला येणार अस ठरलं होतं. त्यानुसार त्यांनी आज नाशिकला भेट दिली. त्यांच्यासोबत आज बऱ्याच विषयांवर चर्चा झाली. शाहू महाराजांच्या जयंतीबाबत चर्चा झाली. शाहू महाराज आमचे दैवत आहे. शरद पवार साहेबांशी चर्चा करून शाहूंच्या स्मृती शताब्दीचा कार्यक्रम मोठा करण्याचा प्रयत्न करू. प्रश्न सोडवण्यासाठी एकमेकांना सहकार्य केले पाहिजे. सत्यशोधक समाजाच्या लोकांना शाहू महाराजांनी मदत केली होती. देशभरात जे वातावरण आहे त्याबद्दल वेगळं सांगायला नको. फुले, शाहू, आंबेडकरांचे विचार या दलदलीतून देशाला वाचवू शकतात, असं छगन भुजबळ यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या:
Pune bouncer issue : …तर शाळेची मान्यता रद्द करणार; शिक्षण उपसंचालकांनी दिला इशारा
Maharashtra News Live Update : अकोल्यात मनसेला धक्का, मनसेचा ‘आदित्य’ आता शिवसेनेत