AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गौतमी पाटील हिच्याबद्दल अजित पवार बोलले; आता अब्दुल सत्तार म्हणतात, ज्यांचे वय डोळे मारायचे ते डोळे मारतात…

आयुक्तांनी तालुकास्तरावरुन सर्व‌ पिकांची माहिती घ्यावी. मी कृषीमंत्री झालो तेव्हापासून हे 11 वे संकट आहे. वस्तुनिष्ठ पंचानामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सरकार नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून मदत केली आहे, असं त्यांनी सांगितलं.

गौतमी पाटील हिच्याबद्दल अजित पवार बोलले; आता अब्दुल सत्तार म्हणतात, ज्यांचे वय डोळे मारायचे ते डोळे मारतात...
abdul sattarImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 30, 2023 | 6:44 AM

संभाजीनगर : गौतमी पाटीलने बैलासमोर नृत्य केलं तर तुला काय त्रास आहे. तिचं काम ती करतेय. तुम्हाला काय अडचण आहे? असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला होता. त्यावर राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी अजित पवार यांना चिमटे काढले आहेत. ज्यांचं वय डोळे मारायचे आहे ते डोळे मारतात, ज्यांनी लहानपणी डोळे मारले नाहीत, ते आता मारत आहेत, असा चिमटा अब्दुल सत्तार यांनी काढला. त्यामुळे एकच खसखस पिकली. अब्दुल सत्तार हे काल पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी अब्दुल सत्तार यांना तुम्ही गौतमी पाटीलला ओळखतात का? असा सवाल करण्यात आला. त्यावर कृषी महोत्सवात गौतमी पाटीलचा कार्यक्रम ठेवला होता. आता पुन्हा एकदा आम्ही गौतमीचा कार्यक्रम ठेवू आणि त्या कार्यक्रमाला अजित पवार यांना बोलावू. छत्रपती शिवरायांच्या काळापासून लावण्या चालतात. मी डान्सबारमध्ये कधी गेलो नाही. विजयसिंह मोहिते पाटील यांनी लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांना जिजाऊ पुरस्कार दिला होता, असं अब्दुल सत्तार म्हणाले. अजितदादा मेरे दोस्त है. गलतीया सबसे होती है. दोस्ती है. अब्दुल सत्तार की छप जाती है, अजित पवार की छुप जाती है, असा चिमटाही त्यांनी यावेळी काढला.

हे सुद्धा वाचा

ड्रोनने फवारणी

नॅनो युरियाची ड्रोनच्या माध्यमातून फवारणी करण्यात येईल. आम्ही हा नवीन प्रयोग करत आहोत. राहुरी आणि परभणी येथील कृषि विद्यापीठाला याची जबाबदारी देण्यात आली आहे. 10 मिलिमीटर किंवा 4-5 दिवस सलग पाऊस पडल्यास तो नुकसानीस पात्र राहील. शेतकऱ्यांना तीनदा नुकसान भरपाई देण्याची अपेक्षा आहे, मात्र एका सीजनमध्ये एकच नुकसान देण्याची तरतूद आहे. सोयाबीनचे 24 लाख 86 हजार हेक्टर क्षेत्र नियोजित करण्यात आले आहे. यासाठी 18 लाख 65 हजार क्विंटल बियाणे अपेक्षित आहेत, असं त्यांनी सांगितलं.

युरीयाचा बफर स्टॉक करणार

देशातील कोणत्याही राज्याने कांद्याला जितके अनुदान दिले नाही, तितके महाराष्ट्र राज्याने दिले आहे. सरकारने 12 लाख 37 हजार मेट्रिक टन खत मंजूर केले आहे. 7 लाख 47 हजार मेट्रिक टन खताची टंचाई भासणार नाही, युरियाचा बफर स्टॉक करणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

त्यांचा समावेश केला

गोपीनाथ मुंडे अपघात योजनेत मृत्यू होणाऱ्या गरोदर महिलांचा समावेश नव्हता. कृषी मंत्री झाल्यानंतर मी दवाखान्यात जाताना मृत्यू होणाऱ्या गरोदर महिलांचा या योजनेत समावेश केला. त्यामुळे या महिलांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

पंतप्रधान मोदींची हवाई दल प्रमुखांसोबत बैठक; काय झाली चर्चा?
पंतप्रधान मोदींची हवाई दल प्रमुखांसोबत बैठक; काय झाली चर्चा?.
कोस्टल रोडवर भीषण अपघात, चार ते पाच वाहनं एकमेकांना धडकली
कोस्टल रोडवर भीषण अपघात, चार ते पाच वाहनं एकमेकांना धडकली.
बारावीचा निकाल उद्या, राज्य शिक्षण मंडळ निकाल जाहीर करणार
बारावीचा निकाल उद्या, राज्य शिक्षण मंडळ निकाल जाहीर करणार.
संजय राऊत आणि शरद पवारांमध्ये रंगल्या गप्पा
संजय राऊत आणि शरद पवारांमध्ये रंगल्या गप्पा.
पेट्रोल पंपावर डिजीटल पेमेंट बंद, ग्राहक चिंतेत
पेट्रोल पंपावर डिजीटल पेमेंट बंद, ग्राहक चिंतेत.
हवा, पाणी, जमिनीवरून पाकिस्तानला घेरणार; भारत करणार क्षेपणास्त्र चाचणी
हवा, पाणी, जमिनीवरून पाकिस्तानला घेरणार; भारत करणार क्षेपणास्त्र चाचणी.
श्रीगंगागनगरमध्ये बॉर्डवर बीएसएफकडून पाकिस्तानी जवानाला अटक
श्रीगंगागनगरमध्ये बॉर्डवर बीएसएफकडून पाकिस्तानी जवानाला अटक.
लाडक्या बहिणींना 500 रुपये देणं ही फसवणूक; राऊतांची महायुतीवर टीका
लाडक्या बहिणींना 500 रुपये देणं ही फसवणूक; राऊतांची महायुतीवर टीका.
पीएम मुद्रा योजनेनं पालटलं कोट्यवधी भारतीयांचं नशीब; कसा करायचा अर्ज?
पीएम मुद्रा योजनेनं पालटलं कोट्यवधी भारतीयांचं नशीब; कसा करायचा अर्ज?.
शेतकरी ओळखपत्र नसेल तर मिळणार नाहीत लाभ; अशी करा नोंदणी..
शेतकरी ओळखपत्र नसेल तर मिळणार नाहीत लाभ; अशी करा नोंदणी...