Ghati Hospital | धक्कादायक! नांदेडपाठोपाठ घाटी रुग्णालयात 24 तासात 10 रुग्णांचा मृत्यू

Ghati Hospital | इतके मृत्यू कशामुळे झाले?. शासकीय रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यूचं लोण छत्रपती संभाजीनगरपर्यंत पोहोचल आहे. नांदेडच्या शासकीय रुग्णालयात काल अशीच धक्कादायक घटना घडली होती.

Ghati Hospital |  धक्कादायक! नांदेडपाठोपाठ घाटी रुग्णालयात 24 तासात 10 रुग्णांचा मृत्यू
Ghati Hospital Sambhajinagar
Follow us
| Updated on: Oct 03, 2023 | 9:05 AM

छत्रपती संभाजीनगर (दत्ता कनवटे) : नांदेड पाठोपाठ छत्रपती संभाजीनगरमधून धक्कादायक बातमी आहे. शासकीय रुग्णालयाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. सोमवारी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात 24 तासात तब्बल 24 रुग्णांचा मृत्यू झाला. यात यात 12 नवजात बालकं होती. आता छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातही अशीच घटना घडली आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालयाचा कारभार नेमका कसा चालतो? तिथे आरोग्य सुविधा कशा आहेत? किती डॉक्टर्स आहेत? रुग्णसंख्या किती? नेमकी समस्या काय? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. घाटी रुग्णालय हे छत्रपती संभाजीनगरमधील एक मोठ आणि महत्त्वाच रुग्णालय आहे. 12 ते 14 जिल्हे या रुग्णालयावर अवलंबून आहेत. दररोज हजारो रुग्ण इथे उपचारासाठी येत असतात.

घाटी रुग्णालयात मागच्या 24 तासात 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 10 मृतांमध्ये 2 बालकांचा समावेश आहे. शासकीय रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यूचं लोण छत्रपती संभाजीनगरपर्यंत पोहोचल आहे. घाटी रुग्णालायत ज्या रुग्णांचा मृत्यू झालाय, त्यांना बाहेरच्या रुग्णालयातून रेफर करण्यात आलं होतं, अशी माहिती आहे. दरम्यान घाटी रुग्णालयात 15 दिवस पुरेल इतकाच औषधांचा साठा असल्याची माहिती आहे. काही महिन्यांपूर्वी कळव्याच्या एका रुग्णालयात एकाच रात्री तब्बल 17 रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. शासकीय रुग्णालयात इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्णांचे मृत्यू का होतायत? यामागे काय कारण आहेत? याचा शोध घेण महत्त्वाच आहे. नेमकी समस्या काय?

हाफकीनने औषधी खरेदी बंद केल्यामुळे राज्यभरातील शासकीय रुग्णालयात औषधांचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे अत्यवस्थ रुग्णांना वेळेत औषधे पुरवठा होत नसल्याने जीव गमवावा लागत आहे. असाच धक्कादायक प्रकार नांदेडमधल्या शासकीय रुग्णालयात पुढे आला आहे. राज्य सरकारने वेळीय याची दखल घेऊन आवश्यक पावल उचलली पाहिजेत. अन्यथा आरोग्य सुविधेअभावी निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागतील.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.