जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला, खळबळजनक घटना

आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात जितेंद्र आव्हाड सुखरुप बचावले आहेत. या हल्ल्याची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. जितेंद्र आव्हाड यांची गाडी एका सिग्नलवर थांबली असताना हल्ला करणाऱ्या तरुणांनी संधी साधली आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत हल्ला केला.

जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला, खळबळजनक घटना
जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला
Follow us
| Updated on: Aug 01, 2024 | 5:28 PM

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या चालत्या गाडीवर भर रसत्त्यात हल्ला झाला आहे. तीन अज्ञात इसमांनी जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला केला आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यावर जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या टीकेवरुन हा हल्ला करण्यात आला आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी विशाळगडावर झालेल्या अतिक्रमणच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. त्यांच्या संघटनेकडून विशाळगाडवर आंदोलनही करण्यात आलं होतं. या आंदोलनानंतर जितेंद्र आव्हाड यांनी संभाजीराजेंवर टीका केली होती. ही टीका संभाजीराजे छत्रपती यांच्या समर्थकांच्या जिव्हारी लागली होती. संभाजीराजे यांच्या स्वराज्य संघटनेकडून जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात संताप व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर जितेंद्र आव्हाड आज ठाण्याच्या दिशेला जात असताना तीन जणांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला. संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. मुंबईत पी डिमिलो रोड येथे ही घटना घडली आहे.

स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून एक व्हिडीओ जारी करण्यात आला आहे. या व्हिडीओत स्वराज्य संघटनेचा एक कार्यकर्ता आपण या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असल्याचं म्हणताना दिसतोय. “युवराज छत्रपतीराजे यांचं रक्त तपासावं लागेल की ते छत्रपती घराण्यातील आहे का, अशा प्रकारचं छत्रपतींच्या घराण्याशी बेताल वक्तव्य केलं, जितेंद्र आव्हाड तू मर्द असतास तर पळाला नसतास, तू पळालास, ही सर्वात मोठी बात महाराष्ट्राला समजली आहे की, तू पळपुटा आहेस. स्वराज्य संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली आहे”, अशी पहिली प्रतिक्रिया स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्याने दिली.

स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी हल्ला नेमका कसा केला?

जितेंद्र आव्हाड यांची गाडी एका सिग्नलवर थांबली होती. याच गोष्टीचा फायदा घेत स्वराज्य संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला केला. जितेंद्र आव्हाड यांच्या ताफ्यातील पोलीस गाडी त्यांच्या गाडीच्या अगदी पाठीमागे होती. पण त्याची पर्वा न करता आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज की म्हणत जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवर लाकडी दंडूकांनी हल्ला केला. त्यांनी आव्हाड यांच्या गाडीच्या काचा फोडण्याचा प्रयत्न केला.

जितेंद्र आव्हाड यांनी काय वक्तव्य केलं होतं?

“संभाजीराजेंना छत्रपती हे म्हणणं सोडून द्या. कारण त्यांना जो अधिकार होता, त्यांची जी वंशपरंपरा होती, ज्या वंशाचं रक्त ते पुढे घेऊन जात होते त्या रक्तात काय होतं आणि यांच्याकडे काय? हे तपासण्याची गरज आहे. शाहू महाराजांच्या घराण्यातील माणूस असं वक्तव्य करतो ज्यामुळे दंगल होऊ शकते तो शाहू महाराजांचा वारसदार होऊच शकत नाही”, असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.