ज्यांच्याकडे मानाचा तूरा, त्यांचाच जातीवाद, जरांगेंनी डागली तोफ, देशमुख कुटुंबिय गडावर पोहचण्यापूर्वीच नामदेव शास्त्रींवर चोहो बाजूने हल्ला बोल
Manoj Jarange attack on Namdev Shashtri : मंत्री धनंजय मुंडे यांची पाठराखण करताना भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी केलेले वक्तव्य त्यांचाच अंगलट येण्याची चिन्हं दिसत आहेत. त्यांच्यावर चोहोबाजूने टीकेची झोड उठली आहे.

मंत्री धनंजय मुंडे यांची पाठराखण करताना भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांना संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्याचा पुळका आल्याने ते वादात सापडले आहेत. खंडणीखोर मारेकऱ्यांची कड घेतल्याने त्यांच्यावर चोहोबाजूंनी टीकेची झोड उठली आहे. आध्यात्मिक क्षेत्रात उच्च पदावरील महाराजांच्या वायफळ बडबडीने संतापाची लाट उसळली आहे. त्यातच आता मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा महाराजांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संतोष देशमुख यांचे कुटुंब गडावर पोहचत असतानाच त्यांनी महंतावर तोफ डागली आहे.
आरोपींना आनंद वाटला असेल
नामदेव शास्त्री आरोपींच्या समर्थन करत आहे, संतोष देशमुख यांचा हत्या केली म्हणून आरोपींना आनंद वाटला असेल, असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केली. धनंजय देशमुख आणि शास्त्री यांच्या भेटीवर त्यांनी प्रतिक्रिया दिली. तो त्यांचा वैयक्तिक विषय आहे कुटुंबाने जावो, महाराजांना जे बोलायचं होतं ते बोलून गेले जातिवादाचा नवीन अंक देऊन गेले, अशी सडकून टीका त्यांनी महंतावर केली.




राज्यात जातीवादाच नवीन अंक
ज्यांच्याकडे मानाचा तूरा आहे, तिथेही जातीवाद होऊ शकतो हा नवीन अंक राज्याला पाहायला मिळत आहे, अशी खरमरीत टीका मनोज जरांगे पाटील यांनी नामदेश शास्त्री यांच्यावर केली आहे. तुम्हाला आरोपींना मारलेली चापट दिसली. पण संतोष देशमुख यांचे रक्त दोन अडीच महिने कोणाला दिसले नाही, अशी टीका त्यांनी केली.
शास्त्री, तुमची चूक झाली
आम्ही तुमचा सन्मान करतो, पण आपण आपलं बघावं. दुसर्याकडे डोकवून पाहू नका, स्वत:ची चूक झाकण्यासाठी डिवचू नका, तुमच्याकडून चूक झाली आहे, एका समाजाला एका बाजूला नेण्याचं काम झालं आहे, असे जरांगे पाटील यांनी शास्त्रींना सुनावले. जातीय सलोखा बिघडला, पण धनंजय मुंडेच्या टोळीमुळे चौथा अंक पाहायला मिळाला, आरोपींच्या बाजूने मोर्चे निघाले, जातिवादाचा अंक भयंकर आहे, जातिवादाचा चौथा नवीन अंक राज्याला पाहायला मिळाला, अशी टीका जरांगे यांनी केली.
भुजबळांवर टीका
छगन भुजबळ यांनी आणखी तरी माझ्या नादाला लागू नये, समजून घ्या, शहाणे व्हा, मला खेटू नका, असे जरांगे म्हणाले. गेल्या वर्षी या दोघांमध्ये मोठा वाद दिसून आला होता. पण विधानसभेनंतर दोघांमधील शीतयुद्ध संपल्याचे दिसत असताना बुलडाण्यातील एका कार्यक्रमात भुजबळांनी जरांगेंवर टीका केली होती.