Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोकसभा निवडणुकीपूर्वी शिंदे गटाकडून मला मोठी ऑफर, भाजपने तर… चंद्रकांत खैरे यांचा खळबळजनक गौप्यस्फोट

Chandrakant Khaire attack on BJP-Shinde Group : शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदे गटाने आणि भाजपने मोठी ऑफर दिल्याचा दावा केला. त्यांच्या या गौप्यस्फोटाने एकच खळबळ उडाली आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी शिंदे गटाकडून मला मोठी ऑफर, भाजपने तर... चंद्रकांत खैरे यांचा खळबळजनक गौप्यस्फोट
चंद्रकांत खैरे
Follow us
| Updated on: Jan 28, 2025 | 2:21 PM

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदे गटाने आणि भाजपाने मोठी ऑफर दिल्याचा दावा केला. लोकसभा निवडणुकीत खैरे यांचा पराभव झाला होता. त्यानंतर पक्ष कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांना सोडून जाऊ नका म्हणून त्यांनी पक्ष कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांना सांष्टांग दंडवत घातला होता. तर आता त्यांनी अजून एक गौप्यस्फोट करत मोठी खळबळ उडवून दिली आहे.

चंद्रकांत खैरे यांचा खळबळजनक गौप्यस्फोट

लोकसभा निवडणुकीच्या आधी संजय शिरसाट यांनी मला ऑफर दिली होती. शिंदे गटाकडून लोकसभा निवडणुक लढवा, आम्ही सर्व खर्च करू अशी ऑफर दिल्याचा दावा त्यांनी केला. संजय शिरसाठ यांनी शिंदे गटात येण्याची ऑफर दिल्याचा दावा चंद्रकांत खैरे यांनी केला. त्यांच्या या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे.

हे सुद्धा वाचा

भाजपाने दिली राज्यपाल पदाची ऑफर

तर भाजकापडूनही आपल्याला राज्यपाल पदाची ऑफर देण्यात आल्याचा दावा खैरे यांनी केला. हरिभाऊ बागडे यांच्याप्रमाणे राज्यपाल करण्याची ऑफर देण्यात आल्याचे ते म्हणाले. राज्यपाल पदासाठी आपल्याला दिल्लीतून ऑफर आल्याचा चंद्रकांत खैरे यांनी दावा केला. त्यामुळे शिंदे गट आणि भाजपा उद्धव ठाकरे गट फोडण्याच्या तयारीत होते, असे सूतोवाच त्यांनी केले.

राजकारणात काहीही होऊ शकते

विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे गटाने शिंदे गटाविरोधात आक्रमकपणा दाखवतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधातील धार कमी केल्याचे दिसून आले. उद्धव सेनेने मध्यंतरी फडणवीस यांचे कौतुक केले. तर देवेंद्र फडणवीस आणि उध्दव ठाकरे एकत्र येण्यावर राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं असं चंद्रकांत खैरे यांनी वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

दोघांनी बांधला कौतुकाचा पुल

दरम्यान 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त मंत्री संजय शिरसाट आणि चंद्रकांत खैरे यांची भेट झाली. यावेळी दोघांमध्ये चांगलीच चर्चा झाल्याचे दिसले. दोघांमधील हास्यविनोद हा चर्चेचा विषय ठरला. दोघांनी एकमेकांना काय कानमंत्र दिला यावर राजकीय वर्तुळात खमंग चर्चा झाली.

फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?.
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है.
अमीर खानने घेतली धनंजय देशमुखांची भेट
अमीर खानने घेतली धनंजय देशमुखांची भेट.
कामराच्या गाण्यावरून ठाकरे vs शिंदेंच्या सेनेची जुगलबंदी, बघा व्हिडीओ
कामराच्या गाण्यावरून ठाकरे vs शिंदेंच्या सेनेची जुगलबंदी, बघा व्हिडीओ.
शेतकऱ्यांना दिलासा; भरपाई म्हणून मिळणार 53 हजार 727 कोटी
शेतकऱ्यांना दिलासा; भरपाई म्हणून मिळणार 53 हजार 727 कोटी.
आरोपी फहीम खानच्या घरावर फिरवला बुलडोजर
आरोपी फहीम खानच्या घरावर फिरवला बुलडोजर.
रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवणार? श्रीमंत कोकाटेंनी म्हटलं...
रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवणार? श्रीमंत कोकाटेंनी म्हटलं....
हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला कसा? उद्धव ठाकरेंचा प्रश्न
हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला कसा? उद्धव ठाकरेंचा प्रश्न.