रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांच्या गाडीचा भीषण अपघात
भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांच्या गाडीचा आज भीषण अपघात झाला आहे. या अपघातामुळे संजना जाधव यांच्या गाडीचं नुकसान झालं आहे. पण सुदैवाने गाडीतील चालक आणि संजना या थोडक्यात बचावल्या आहेत.
राज्यात अपघाताच्या घटना सातत्याने घडताना दिसत आहेत. या अपघातामध्ये अनेकांचा बळी देखील जातो. अपघाताच्या घटना होण्यामागे काही कारणं आहेत. नियमांचं पालन न करता वाहन चालवणे हे त्यापैकी एक आहे. अनेकजण मद्यपान करुन मोठमोठी वाहनं रस्त्याने चालवतात. त्यामुळे अशी माणसं नशेत भरधाव गाडी चालवून इतरांचे जीव धोक्यात टाकतात. त्यामुळे अशा प्रकारचं कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाते. पण तरीदेखील अनेकजण त्यातून धडा शिकताना दिसत नाहीत. विशेष म्हणजे चाळीसगावात आज अपघाताची बातमी समोर आली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांच्या गाडीचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. संबंधित वृत्त समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांच्या गाडीचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. संबंधित अपघाताची घटना ही धुळे-सोलापूर महामार्गावर चाळीसगावमध्ये घडली. या अपघातात संजना जाधव आणि गाडीचा चालक हा थोडक्यात बचावला आहे. एका पिकअप गाडीने समोरुन संजना जाधव यांच्या गाडीला धडक दिली. त्यामुळे ही अपघाताची घटना घडली. अपघाताच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
अपघात घडल्यानंतर लगेच स्थानिकांनी बचावासाठी धाव घेतली. तसेच रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांनीदेखील बचावासाठी धाव घेतली. यावेळी गाडीतील संजना जाधव आणि त्यांच्या गाडीचा चालक सुखरुप असल्याची माहिती समोर आली. तसेच संजना जाधव यांच्या गाडीला धडक देणारा पिकअप ड्रायव्हर सुद्धा सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, राज्यात सध्या प्रत्येक पक्षाकडून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु आहे. त्यामुळे नेतेमंडळी वेगवेगळ्या भागातील दौरे करत आहेत. यासाठी अनेक जण रस्तेमार्गाने प्रवास करतात. संजना जाधव या देखील राजकारणात सक्रीय आहेत. कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे संजना जाधव यांचे पती आहेत. कन्नड विधानसभा निवडणुकीत दोन्ही पती-पत्नी एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढणार असल्याची चर्चा वारंवार होत असते. अर्थात याबाबत काय-काय घडामोडी घडतात? ते आगामी काळात स्पष्ट होईल.