Chhatrapati Sambhajinagar East Constituency : छत्रपती संभाजीनगर पूर्व मतदारसंघात कुणाचा उदय? अतुल सावे साधणार विजयाची हॅटट्रिक की जरांगे फॅक्टर बदलवणार समीकरण?

Maharashatra Vidhansabha Election 2024 : छत्रपती संभाजीनगरमधील पूर्व मतदारसंघात यंदा चांगलाच धुमाकूळ दिसू शकतो. या मतदारसंघात भाजपचे अतुल सावे यांनी आतापर्यंत दोनदा कमळ फुलवले. यंदा पक्षाने त्यांनाच पसंती दिली आहे. महाविकास आघाडी आणि एमआयएमने अद्याप पत्ते उघडले नाहीत. जरांगे फॅक्टरची या मतदारसंघात जोरदार चर्चा आहे.

Chhatrapati Sambhajinagar East Constituency : छत्रपती संभाजीनगर पूर्व मतदारसंघात कुणाचा उदय? अतुल सावे साधणार विजयाची हॅटट्रिक की जरांगे फॅक्टर बदलवणार समीकरण?
पूर्वेत कोणता उमेदवार मारणार बाजी?
Follow us
| Updated on: Oct 24, 2024 | 3:06 PM

छत्रपती संभाजीनगर शहरात तीन मतदारसंघ आहेत. मध्य, पूर्व आणि पश्चिम मतदारसंघात वेगवेगळी समीकरणं आहेत. यातील पूर्व मतदारसंघासाठी भाजपने तिसऱ्यांदा मंत्री अतुल सावे यांच्यावर विश्वास दाखवला. या मतदारसंघात सावे यांनी दोनदा कमळ फुलवले आहे. त्यांच्यामागे राजकारणाचा मोठा वारसा आहे. महाविकास आघाडी आणि एमआयएमने अद्याप पत्ते उघडले नसले तरी त्यांनी मतदारसंघात जोरदार फिल्डिंग लावली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या फॅक्टरची चर्चा पण या मतदारसंघात रंगली आहे. या मतदारसंघात दलित, मुस्लीम मते महत्त्वाची आहेत. तर मराठा, ओबीसी मतदारांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरातील पूर्व मतदारसंघात (Chhatrapati Sambhajinagar East Constituency) आता कुणाचा उदय होणार याची चर्चा सुरू झाली आहे.

काँग्रेसचा मतदारसंघ केला काबीज

छत्रपती संभाजीनगर हा तसा काँग्रेसचा परंपरागत मतदारसंघ होता. छत्रपती संभाजीनगर हा शिवसेनेचा बालेकिल्ला असताना सुद्धा पूर्वेतील जनता कायम काँग्रेसच्या पाठीशी राहिली. पण मराठवाड्यात एमआयएमची लाट आली. त्यात 2014 मध्ये काँग्रेसच्या हातून हा मतदारसंघ निसटला. एमआयएमच्या एंट्रीमुळे दलिती आणि मुस्लीम मतांचे विभाजन झाले. तर हिंदू मतदार अतुल सावे यांच्या पाठीशी राहिले. माजी शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांना या मतदारसंघात पराभव स्वीकारावा लागला होता. तेव्हापासून भाजपने या मतदारसंघावर पकड ठेवली आहे. 2019 मध्ये मुस्लीम उमेदवार जास्त होते. त्याचा फटका एमआयएमला (MIM) बसला. यावेळी अतुल सावे हॅटट्रिक साधण्यासाठी मैदानात उतरले आहेत.

हे सुद्धा वाचा

महाविकास आघाडीचे वेट अँड वॉच

महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसकडे जाण्याची दाट शक्यता आहे. तर दुसरीकडे एमआयएम महाविकास आघाडीत प्रवेशासाठी इच्छुक आहे. एमआयएमने अद्याप त्यांची पत्ते उघडली नाहीत. पण आज अथवा उद्या एमआयएम उमेदवाराची घोषणा करू शकते. माजी खासदार इम्तियाज जलील यांनी नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसोबतच पूर्व आणि मध्य विधानसभेवर अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. या लोकसभेवेळी त्यांना या मतदारसंघातून चांगली मतं मिळाली होती. त्यामुळे अतुल सावे यांच्यासमोर या मतदारसंघात सर्वच बाजूंनी आव्हानं आहेत.

जरांगे फॅक्टरची चर्चा का?

गृहनिर्माणमंत्री अतुल सावे यांच्याकडे जालना आणि बीडचे पालकमंत्री पद होते. गेल्या वर्षी मनोज जरांगे यांच्या अंतरावाली सराटीत आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज झाला होता. त्यानंतर हे आंदोलन राज्यभर पेटले. त्यावेळी सावे हे जालना जिल्ह्याचे पालकमंत्री होते. या घटनेनंतर सावे हे आंदोलनाशी आणि आंदोलनकर्त्यांशी फटकून वागल्याचा आरोप करण्यात आला. त्यांनी ओबीसी आंदोलनाला जितक्या भेटी दिल्या. तितक्यावेळी ते अंतरवाली सराटीत आले नसल्याचा मराठा आंदोलकांचा त्यांच्यावर रोष आहे. अतुल सावे (Atul Save) यांचे ओबीसी समीकरण त्यांना यावेळी तारुन नेते का? की एमआयएम, महाविकास आघाडी त्यांचा पराभव करणार हे लवकरच दिसून येईल. पूर्वेत यावेळी नवीन उमेदवाराचा उदय होणार असल्याचे भाकीत पण करण्यात येत आहे. विशेषतः मुस्लीम आणि दलित मतदार कुणाच्या पारड्यात मतदान टाकतो याची चर्चा आहे. इम्तियाज जलील यांनी काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. या सर्व घडामोडींचा पूर्वमध्ये मोठा परिणाम दिसू शकतो.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.