मनोज जरांगेंची मोठी घोषणा; म्हणाले, दसऱ्याच्या दिवशी 12 वाजता…
Manoj Jarange Patil Press Conference : मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. दसऱ्याच्या दिवशी मेळावा घेणार असल्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी नेमकं काय म्हटलं? वाचा सविस्तर...
नारायण गडावर दसरा मेळावा होणार आहे. मी दर्शन घेण्यासाठी जाणार आहे. मराठा समाजाने प्रचंड संख्येने नारायण गडावर यायचं आहे. सर्वांनी एकजूट दाखवायची आहे. नारायण गडावर राजकीय बोलणे किंवा निर्णय होणार नाही. अशी एकजूट आणि शक्ती दाखवा, अशी की पुन्हा अशी एकजूट असणार नाही. मी दसरा मेळाव्याला जाणार आणि बोलणार पण आहे. दसरा मेळाव्याला तुफान वेगाने मराठा समाज येणार आहे. दसऱ्याच्या दिवशी 12 वाजता नारायण गडावर दसरा मेळावा होणार आहे. वेळ 12 वाजेची वेळ ठरलेली आहे, येणाऱ्या सर्व भक्तांना माझी विनंती आहे दर्शन जरी सर्वांचे झालं. तरी 2 वाजेपर्यंत गडावरच राहायचं आहे, असं मनोज जरांगे म्हणालेत.
तीच ती चर्चा नको, तोडगा काढा- जरांगे
नऊ दिवसांच्या उपोषणानंतर मनोज जरांगे पाटील यांच्यावर छत्रपती संभाजीनगरमध्ये उपचार सुरु आहेत. तिथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मला आणि माझ्या समजाला शक्ती दाखवण्याची गरज नाही. सरकारचा काय डाव आहे. बनवा बनवी आहे कळत नाही. सरकारने अभ्यासक बोलवायची काय गरज आहे, तुमचा काही ट्रॅप आहे. आमचेही अभ्यासक बोलावा, त्यांचाही विचार घ्या. माझ्या विरोधात रान उठवून काही होणार नाही. 40 वर्षांपासून तीच तीच चर्चा सुरू आहे, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.
प्रविण दरेकरांना प्रत्युत्तर
काल बोलताना मनोज जरांगे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली होती. अमित शाह यांना कत्तली करायच्या का? दादागिरीने यांना सत्तेची खुर्ची आणायची आहे. पण जनतेने राजकीय एन्काऊंटर केल्यास तुम्ही दिसणार नाही, अशा शब्दात मनोज जरांगेनी टीका केली. त्यावर प्रविण दरेकर यांनी मनोज जरांगेंवर टीका केली. त्याला आता मनोज जरांगेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. अमित शाह बोलले म्हणून आम्ही बोललो. आरक्षण प्रश्नावर मार्ग काढाय आचारसंहिता लागण्या अगोदर मराठा आरक्षण दिलं नाही. सर्व मागण्या मान्य केल्या नाही तर पश्चाताप होईल, असं म्हणत जरांगेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.