मोठी बातमी : शरद पवार आणि एकनाथ शिंदे एकत्र येणार?; शिंदे गटाच्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण

Sanjay Shirsat on Sharad Pawar Eknath Shinde : शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीवर भाष्य केलं आहे. एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्याबाबत संजय शिरसाट यांनी मोठं विधान केलं आहे. शिरसाट काय म्हणाले? वाचा सविस्तर बातमी...

मोठी बातमी : शरद पवार आणि एकनाथ शिंदे एकत्र येणार?; शिंदे गटाच्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदे, शरद पवारImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Nov 21, 2024 | 2:10 PM

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होत आहे. परवा दिवशी निकाल जाहीर होणार आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवेगळी समीकरणं चर्चेत आली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे एकत्र येतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक यांनीही अशा प्रकारचं विधान केलं होतं. कधीही काहीही होऊ शकतं असं मलिक म्हणाले होते. आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते, आमदार संजय शिरसाट यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी सूचक विधान केलं आहे.

संजय शिरसाट काय म्हणाले?

शरद पवार यांच्यासोबत जायचं की नाही? याचा निर्णय एकनाथ शिंदेच करू शकतील. आम्हाला यावर भाष्य करता येणार नाही. एकनाथ शिंदेसाहेब योग्य दिशेने जात असतात. आम्ही त्यांचा शर्ट पकडून जाऊ. एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील. तो आम्हाला मान्य. ते जिकडं जातील तिकडं आम्ही त्यांच्यासोबत जाणार आहोत, असं शिरसाट म्हणाले.

मुख्यमंत्री कोण होणार?

महायुतीचे नेते एकत्रित बसून मुख्यमंत्री कोण हे ठरवणार आहेत. 75% सर्वे आमच्या बाजूने आहेत. एकनाथ शिंदेंच्या चेहऱ्यावर आम्ही निवडणूक लढत आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील, असा आम्हाला विश्वास आहे. नितीश कुमारांचं उदाहरण पाहिलं तर तरीही मुख्यमंत्री आहेत. वरिष्ठांनी तो निर्णय घ्यायचा आहे. सर्व सामान्यांची भावना ती आहे एकनाथ शिंदे ज्या भावनेनं काम करतात ते लोकांना आवडलं आहे. लाडकी बहिण योजना इतकी पावरफुल झाली की महिला आनंदी आहेत, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं.

यंदाच्या निवजणुकीत वोट जिहादचा मुद्दा चर्चेत आला आहे. यावर शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांचा व्होट जिहाद सुरू होता आमच धर्मयुध्द लढत होतो. आमचं धर्मयुध्द सक्सेस झालं आहे, बटेंगे तो कटेंगे, एक हैं तो सेफ हैं हे यशस्वी झालं आहे. भाजप आमचा मोठा भाऊ आहे, मोठा भाऊ छोट्याभावाल सहकार्य करतो, असं शिरसाट म्हणालेत.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.